अंबरनाथ : अंबरनाथमध्ये रेल्वेच्या पुलावर भर दिवसा तरुणीची हत्या झाली. तरुणीवर धारदार शस्त्राने सपासप वार करण्यात आले. या प्रकरणी पोलिसांनी हल्लेखोराला पकडले आहे.
तरुणाच्या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या तरुणीला रुग्णालयात नेण्यात आले. पण तोपर्यंत वेळ टळून गेली होती. डॉक्टरांनी तपासणी करुन तरुणीचा मृत्यू झाल्याचे जाहीर केले.
ज्या तरुणीची हत्या झाली ती आणि एका तरुणासोबत अंबरनाथमध्ये रेल्वेच्या पुलावरुन जात होती. पुलावरुन जात असताना तरुण आणि तरुणी यांच्यात कुठल्यातरी मुद्यावरुन वाद झाला. यानंतर तरुणाने धारदार शस्त्राने तरुणीवर एकामागून एक वार केले. धारदार शस्त्राने सपासप वार झाल्यामुळे गंभीर जखमी झालेल्या तरुणीला रुग्णालयात नेण्यात आले. डॉक्टरांनी तपासणी करुन तरुणीचा मृत्यू झाल्याचे सांगितले. या प्रकरणात तरुणीवर वार करणाऱ्या तरुणाला पोलिसांनी पकडले आहे. शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे पोलीस तरुणाची कसून चौकशी करत आहेत.