अहवालात महाराष्ट्रानंतर दुसऱ्या स्थानी असलेल्या कर्नाटकमध्ये २०२४ - २५ या आर्थिक वर्षातील पहिल्या नऊ महिन्यांत फक्त १६ हजार ६५१ कोटी रुपयांची परकीय गुंतवणूक आली आहे. सोप्या शब्दात सांगायचे तर अहवालात दुसऱ्या स्थानी असलेल्या कर्नाटकपेक्षा महाराष्ट्रात एक लाख २२ हजार ७८३ कोटी रुपये एवढी जास्त परकीय गुंतवणूक आली आहे. परकीय गुंतवणुकीत महाराष्ट्र देशात आघाडीवर आहे. देशातले कोणतेही राज्य महाराष्ट्राच्या आसपास पण नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक्स पोस्ट करुन ही माहिती दिली. देशात सर्वाधिक परकीय गुंतवणूक आकर्षित करण्यात महाराष्ट्र आघाडीवर आहे आणि या यशाचे श्रेय महायुतीतील सर्व घटक पक्षांचे आहे; असेही मुख्यमंत्री म्हणाले.गेल्या 10 वर्षांतील विक्रमी परकीय गुंतवणूक महाराष्ट्रात आली केवळ 9 महिन्यात !
केंद्र सरकारच्या डीपीआयआयटीने परकीय गुंतवणुकीचा डिसेंबर 2024 अखेरचा अहवाल जाहीर केला असून, गेल्या 10 वर्षांतील सर्वाधिक वार्षिक परकीय गुंतवणूक ही अवघ्या 9 महिन्यात महाराष्ट्राने प्राप्त केली आहे.… pic.twitter.com/wPkpWvY4yU — Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) March 7, 2025






