मुंबई : उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आणि माजी आमदार सुरेशकुमार जेथलिया यांचे झोपेतच हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं आहे. परतूर येथील निवासस्थानी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. जेथलिया यांच्या निधनाची बातमी समजताच परतूर-मंठा मतदारसंघासह संपूर्ण जालना जिल्ह्यात शोककळा पसरली असून कार्यकर्ते, समर्थक आणि नागरिकांनी हळहळ व्यक्त केली आहे.
दरम्यान, सुरेशकुमार जेथलिया यांच्या अचानक झालेल्या निधनाने परतूर-मंठा मतदारसंघाने एक अभ्यासू, विकासाभिमुख आणि लोकांशी घट्ट नाळ जुळलेला नेता गमावल्याची भावना व्यक्त होत आहे.






