Thursday, September 3, 2026

CM Devendra Fadnavis : पक्ष सांगेल तेव्हा दिल्लीत जाईन!

CM Devendra Fadnavis : पक्ष सांगेल तेव्हा दिल्लीत जाईन!

- २०२९ पर्यंत माझे नेते मला महाराष्ट्रातच ठेवणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची स्पष्टोक्ती

मुंबई : राज्याच्या राजकारणात गेल्या काही महिन्यांपासून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांच्या दिल्लीवारीबाबत सुरू असलेल्या चर्चांवर खुद्द मुख्यमंत्र्यांनीच पूर्णविराम दिला आहे. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत बोलताना त्यांनी स्पष्ट केले की, माझे नेते २०२९ पर्यंत मला महाराष्ट्रातच ठेवणार असून, माझा पक्ष जेव्हा आदेश देईल, त्याच दिवशी मी दिल्लीला जाईन. मात्र, सद्यस्थितीत अशा प्रकारच्या चर्चा बातमी निर्मितीसाठी केल्या जात असल्याचे त्यांनी मिश्कीलपणे सांगितले. (CM Devendra Fadnavis)

मागील काही दिवसांपासून फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांच्या दिल्लीतील हालचालींवरून राजकीय वर्तुळात विविध तर्कवितर्क लावले जात होते. यावर भाष्य करताना मुख्यमंत्री म्हणाले की, काहींना वाटते की दिल्लीत गेल्यास आपले प्रमोशन होईल, तर काहींना वाटते की 'बला' टळून जाईल. मात्र, कोणाला काहीही वाटले तरी माझे नेते आणि पक्ष जो निर्णय घेईल, त्यानुसारच पावले उचलली जातील. दरम्यान, महायुतीमधील नेते एकनाथ शिंदे आणि गणेश नाईक यांच्यातील कथित वादावर बोलताना, "दोघेही मोठे नेते आहेत आणि त्यांच्यात समन्वय साधण्याचे काम माझ्यासारख्या छोट्या नेत्याला करावे लागते," अशी मिश्किल टिपण्णी त्यांनी केली. (CM Devendra Fadnavis)

या मुलाखतीत त्यांनी विरोधकांचाही चांगलाच समाचार घेतला. उद्धव ठाकरे, संजय राऊत, रोहित पवार यांच्यासह विरोधकांवर टीका करताना ते म्हणाले की, हे सर्व नेते 'पेपर टायगर' असून त्यांना मीडियाच्या बाहेर येऊन प्रभावी विरोध करता येत नाही. माझा स्वतःचा डीएनए विरोधी पक्षाचा असून, विरोध कसा करावा आणि तो जनतेपर्यंत कसा न्यावा, याची शिकवणी मी या नेत्यांना द्यायला तयार आहे, अशा शब्दांत मुख्यमंत्र्यांनी विरोधकांवर निशाणा साधला. (CM Devendra Fadnavis)

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >