- १३ आणि १४ सप्टेंबरला विविध कार्यक्रम; एशियाटिक सोसायटी, हिंदी राजभाषा संमेलनाला उपस्थित राहणार
मुंबई : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह १३ आणि १४ सप्टेंबरला मुंबईच्या दोन दिवसांच्या दौऱ्यावर येत असून, या दौऱ्यात फोर्टमधील दि एशियाटिक सोसायटीला भेट तसेच वाशी येथे होणाऱ्या अखिल भारतीय राजभाषा संमेलनाला उपस्थिती लावणार आहेत. प्राच्यविद्या संशोधनाचा समृद्ध वारसा जपणाऱ्या एशियाटिक सोसायटीच्या भेटीत शाह संस्थेच्या पदाधिकाऱ्यांशी आणि सदस्यांशी संवाद साधणार असून, दुर्मीळ पोथ्यांच्या प्रदर्शनालाही ते भेट देतील. त्यानंतर सोमवारी वाशीतील सिडको प्रदर्शन केंद्रात होणाऱ्या सहाव्या अखिल भारतीय राजभाषा संमेलनात ते सहभागी होतील. शनिवारी रात्री उशीरा मुंबईत त्यांचे आगमन होईल. (Amit Shah Mumbai Visit)
नवी दिल्ली: १८ व्या ब्रिक्स परिषदेच्या निमित्ताने १२ सप्टेंबर २०२६ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अबू धाबीचे युवराज शेख खालिद बिन मोहम्मद यांची ...
एशियाटिक सोसायटीला ‘राष्ट्रीय महत्त्वाची संस्था’ असा विशेष दर्जा देण्याची मागणी गेल्या चार वर्षांपासून केंद्राकडे प्रलंबित आहे. शाह यांच्या भेटीच्या पार्श्वभूमीवर हा प्रश्न मार्गी लागण्याच्या अपेक्षांना पुन्हा चालना मिळाली आहे. संस्थेच्या पदाधिकाऱ्यांकडून याबाबतही शाह यांच्यासमोर भूमिका मांडली जाण्याची शक्यता आहे. शाह यांच्या भेटीदरम्यान संस्थेतील दुर्मीळ पोथ्यांचे प्रदर्शन आयोजित करण्यात येणार आहे. त्यात पाच खंडांमध्ये प्रसिद्ध झालेल्या पा. वा. काणे यांच्या ‘भारतीय धर्मशास्त्राचा इतिहास’ या ग्रंथाचे संस्थेने जतन केलेले संदर्भसाहित्यही महत्त्वाचे ठरणार आहे. भारतीय दंड संहितेच्या उगमाशी धर्मशास्त्राचा संबंध असल्याचे मानले जात असल्याने या साहित्याला विशेष महत्त्व असल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान, एशियाटिक सोसायटीची अलीकडील निवडणूकही चर्चेत आली होती. जुलैमध्ये झालेल्या निवडणुकीत ‘एशियाटिक टुमारो’ या गटाने विजय मिळवला आणि भाजपचे माजी खासदार डॉ. विनय सहस्रबुद्धे अध्यक्ष झाले. त्यांच्या निमंत्रणानंतर शाह यांचा संस्थेचा दौरा निश्चित झाला आहे. (Amit Shah Mumbai Visit)
Nashik Crime News : दाखल गुन्ह्यात अटक करून पोलीस कोठडी न घेता थेट न्यायालयात हजर करण्यासाठी १० हजार रुपयांची लाच स्वीकारणाऱ्या पोलीस हवालदाराला न्यायालयाने ...
शाह यांच्या मुंबई दौऱ्याचा दुसरा टप्पा वाशीतील हिंदी राजभाषा संमेलनाचा असेल. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर १४ सप्टेंबरपासून वाशीतील सिडको प्रदर्शन केंद्रात सहावे अखिल भारतीय राजभाषा संमेलन आयोजित करण्यात आले आहे. हे संमेलन १४ आणि १५ सप्टेंबर असे दोन दिवस चालणार असून, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची त्याला प्रमुख उपस्थिती असेल. देशभरातील हिंदी भाषिक साहित्यिक, संस्था, अधिकारी आणि प्रतिनिधी या संमेलनात सहभागी होणार आहेत. केंद्र व राज्य सरकारमधील वरिष्ठ मंत्री आणि अधिकारीही उपस्थित राहण्याची शक्यता आहे. गणेशोत्सव आणि गणपती विसर्जनाच्या काळातच हा कार्यक्रम होत असल्याने वाशीतील सिडको प्रदर्शन केंद्राचा परिसर कार्यक्रमासाठी राखीव ठेवण्यात आला आहे. दहा हजारांहून अधिक वाहनांसाठी पार्किंगची व्यवस्था करण्याचे नियोजन करण्यात आले असून, गर्दी आणि वाहतूक नियंत्रणासाठी अतिरिक्त पोलीस बंदोबस्तही ठेवण्यात येणार आहे. (Amit Shah Mumbai Visit)






