- श्री सिद्धिविनायक आणि लालबागच्या राजाचे घेणार दर्शन
मुंबई : भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन बुधवारी मुंबई दौऱ्यावर येणार असून, ते सिद्धिविनायक मंदिर आणि लालबागचा राजा येथे दर्शन घेऊन गणरायाची पूजा करणार आहेत. तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार यांच्या निवासस्थानी बाप्पाचे आशीर्वाद घेणार आहेत, अशी माहिती मुंबई भाजपचे अध्यक्ष आणि आमदार अमीत साटम यांनी दिली. (Nitin Nabin)
- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे; सरकार चार पावले पुढे येत असेल तर आंदोलकांनीही सकारात्मक भूमिका घ्यावी मुंबई : "मराठा समाजाच्या मागण्यांबाबत सरकार ...
साटम यांनी सांगितले की, नितीन नबीन सकाळी सुमारे १०.२० वाजता छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या टर्मिनल-२ येथे दाखल होतील. यावेळी भाजपचे पदाधिकारी, नेते आणि कार्यकर्त्यांकडून त्यांचे भव्य स्वागत करण्यात येणार आहे. मुंबईत आगमन झाल्यानंतर नितीन नबीन सर्वप्रथम सिद्धिविनायक मंदिरात जाऊन दर्शन घेतील. त्यानंतर ते लालबागचा राजा येथे दर्शनासाठी जातील. त्यानंतर ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या निवासस्थानी जाऊन बाप्पाचे आशीर्वाद घेणार आहेत, असे आमदार अमीत साटम यांनी सांगितले. (Nitin Nabin)
- मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय; लाडकी बहीण, शेतकरी कर्जमाफीसह २५ योजनांचा समावेश मुंबई : सरकारच्या योजना आणि धोरणांचा निधी खर्च झाला म्हणजे त्यांची ...
त्यानंतर नितीन नबीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा निवासस्थानी दुपारचे भोजन घेणार असल्याचे साटम यांनी सांगितले. भोजनानंतर भाजपचे ते वांद्रे पूर्व येथील वांद्रे रेक्लमेशन परिसरातील गणपती मंडळाला भेट देतील. त्यानंतर ते छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरून पुण्याकडे रवाना होतील, अशी माहिती साटम यांनी दिली. (Nitin Nabin)






