- कुडाळ, मालवण ग्रामीण रुग्णालय विशेषज्ञासह, रिक्तपद भरती आणि विकास कामांना गती देण्याचे आरोग्यमंत्र्यांचे निर्देश
मुंबई : कुडाळ-मालवण विधानसभा मतदारसंघातील ग्रामीण रुग्णालयांमध्ये विशेषज्ञ डॉक्टरांची भरती करण्यासह अन्य मनुष्यबळाची कमतरता दूर करून विकास कामांना गती देण्याचे निर्देश सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांनी बुधवारी दिले. मुंबईतील आरोग्य सेवा आयुक्तालयात आरोग्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित या बैठकीला आमदार निलेश राणे उपस्थित होते. (Nilesh Rane)
कुडाळ व मालवण तालुक्यातील आरोग्य सेवा अधिक सक्षम करण्याच्या दृष्टीने आज झालेल्या बैठकीत विविध प्रश्नांवर चर्चा करण्यात आली. या बैठकीस सार्वजनिक आरोग्य विभागाचे सचिव डॉ. निपुण विनायक, आरोग्य सेवा आयुक्त संजय काटकर, नागरी आरोग्य अभियान आयुक्त डॉ. सुनील भोकरे, आरोग्य विभागाचे अवर सचिव महेंद्र केंद्रे, सहसंचालक डॉ. सुनिता गोल्हाईत, कोल्हापूर परिमंडळ उपसंचालक डॉ. दिलीप माने, यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.(Nilesh Rane)
- वैद्यकीय महाविद्यालय, कणकवली बसस्थानकासह आरोग्य आणि मत्स्यविकासाच्या कामांचा आढावा - आमदार निलेश राणे आणि दीपक केसरकर यांची विशेष उपस्थिती मुंबई : ...
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वाढते पर्यटन लक्षात घेता उत्तम दर्जाच्या आरोग्यसुविधा उपलब्ध करून देनेबाबत शासन सकारात्मक असल्याचे आरोग्यमंत्र्यांनी सांगितले. कुडाळ ग्रामीण रुग्णालय तसेच मालवण ग्रामीण रुग्णालयाचे श्रेणीवर्धन करण्याबाबत चर्चा झाली. (Nilesh Rane)
मालवण ग्रामीण रुग्णालयाचे श्रेणीवर्धन करणे बाबत प्रस्ताव सादर करावा, मुख्यमंत्री महोदय यांच्या परवानगीने प्रस्तावास मंजुरी घेऊ. तसेच सध्या कार्यरत असलेल्या कुडाळ प्राथमिक आरोग्य केंद्रात विशेषतज्ञ व रिक्त पदे भरून चांगली आरोग्य व्यवस्था तयार करण्याचा प्राधान्य देण्यात येईल. कोकणात सेवा देत असलेल्या निवासी शासकीय डॉक्टरांसाठी उत्तम निवास व्यवस्था उपलब्ध करून देणेबाबतचे निर्देश आरोग्य मंत्र्यांनी या बैठकीत निर्देश दिले. (Nilesh Rane)
मुंबई : गडचिरोली जिल्ह्यातील सेमाना येथे प्रस्तावित मत्स्यालयाची उभारणी अत्याधुनिक, नाविन्यपूर्ण आणि आकर्षक पद्धतीने करावी. पारंपरिक स्वरूपाचे ...
कुडाळ मालवण विधानसभा क्षेत्रातील प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या देखभाल दुरुस्तीबाबत प्राधान्यक्रम ठरवून तात्काळ कार्यवाही सुरु करण्याच्या, तसेच महिला रुग्णालयात कुशल व कुशल कर्मचाऱ्यांची पदभरती करण्याबाबत आवश्यक ती कार्यवाही करण्याचे सूचना आरोग्यमंत्र्यांनी या बैठकीत दिल्या. (Nilesh Rane)






