Friday, September 18, 2026

SSC HSC Board Exam 2027 : दहावी-बारावीच्या बोर्ड परीक्षांचे वेळापत्रक जाहीर; जाणून घ्या तारखा

SSC HSC Board Exam 2027 : दहावी-बारावीच्या बोर्ड परीक्षांचे वेळापत्रक जाहीर; जाणून घ्या तारखा

SSC HSC Board Exam 2027 : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने २०२७ मध्ये होणाऱ्या दहावी आणि बारावीच्या बोर्ड परीक्षांचे वेळापत्रक जाहीर केले आहे. राज्यातील पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण या नऊ विभागीय मंडळांमार्फत या परीक्षा घेतल्या जाणार आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांना आता अभ्यासाचे नियोजन करण्यासाठी परीक्षांच्या तारखांची माहिती उपलब्ध झाली आहे.

बारावीची परीक्षा 8 फेब्रुवारीपासून

इयत्ता बारावीच्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (HSC) परीक्षेची लेखी परीक्षा सोमवार, 8 फेब्रुवारी 2027 पासून सुरू होणार आहे. ही परीक्षा मंगळवार, 16 मार्च 2027 पर्यंत चालणार आहे.

दहावीची परीक्षा 15 फेब्रुवारीपासून

इयत्ता दहावीच्या माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (SSC) परीक्षेला सोमवार, 15 फेब्रुवारी 2027 पासून सुरुवात होणार असून गुरुवार, 11 मार्च 2027 रोजी लेखी परीक्षा संपणार आहे.

प्रात्यक्षिक परीक्षा कधी होणार?

लेखी परीक्षांपूर्वी बारावीच्या विद्यार्थ्यांच्या प्रात्यक्षिक, श्रेणी, तोंडी आणि अंतर्गत मूल्यमापनाच्या परीक्षा बुधवार, 20 जानेवारी ते शनिवार, 6 फेब्रुवारी 2027 या कालावधीत होणार आहेत. दहावीच्या विद्यार्थ्यांच्या प्रात्यक्षिक, श्रेणी, तोंडी आणि अंतर्गत मूल्यमापनाच्या परीक्षा गुरुवार, 28 जानेवारी ते शनिवार, 13 फेब्रुवारी 2027 या कालावधीत आयोजित करण्यात येणार आहेत.

सविस्तर विषयवार वेळापत्रक नंतर

मंडळाने सध्या परीक्षांच्या कालावधीची माहिती जाहीर केली आहे. विषयनिहाय सविस्तर वेळापत्रक संबंधित विभागीय मंडळांच्या अधिकृत संकेतस्थळांवर उपलब्ध करून देण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांनी अंतिम अधिकृत वेळापत्रक तपासून त्यानुसार अभ्यासाचे नियोजन करावे, असे आवाहन मंडळाकडून करण्यात आले आहे. परीक्षांच्या तारखा आधीच जाहीर झाल्यामुळे विद्यार्थ्यांना अभ्यास, सराव आणि पुनरावृत्तीचे वेळापत्रक तयार करण्यासाठी पुरेसा वेळ मिळणार आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >