- मंत्री नितेश राणे यांच्या उपस्थितीत सामंजस्य करार; ५० खोल्यांचे आलिशान हॉटेल, २४ महिन्यांत उभारणीचे नियोजन
मुंबई : देवगड तालुक्यातील कुणकेश्वर येथे ताज हॉटेल्स ब्रँडच्या ‘ट्री ऑफ लाइफ’ या ब्रँडचे आलिशान हॉटेल उभारण्यात येणार आहे. या हॉटेलच्या उभारणीसंदर्भातील करार मंत्रालयात मत्स्यव्यवसाय आणि बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या दालनात मंगळवारी करण्यात आला. ५० खोल्यांचे हे हॉटेल २४ महिन्यांत पूर्ण करण्याचे नियोजन असून, त्यामुळे देवगडसह सिंधुदुर्गच्या पर्यटनाला चालना मिळण्याची अपेक्षा आहे. (Nitesh Rane)
View this post on Instagram
सिंधुदुर्गमध्ये शिरोडा-वेळागरनंतर आता कुणकेश्वर येथे ताज हॉटेल उभारले जाणार असल्याने जिल्ह्यातील पर्यटन क्षेत्राला आणखी एक सुविधा उपलब्ध होणार आहे. या प्रकल्पामुळे स्थानिक पातळीवर रोजगाराच्या तसेच व्यवसायाच्या नव्या संधी निर्माण होतील आणि जिल्ह्याच्या दरडोई उत्पन्नात वाढ होण्यास मदत होईल, अशी माहिती मंतर राणे यांनी दिली. (Nitesh Rane)
मुंबई : उबाठा गटाच्या माजी नगरसेविका विशाखा राऊत (Vishakha Raut) यांना सर्वोच्च न्यायालयाकडून मोठा कायदेशीर फटका बसला आहे. बोगस जात प्रमाणपत्र प्रकरणामुळे ...
कोकणच्या निसर्गसौंदर्याला जागतिक दर्जाच्या पर्यटन सुविधांची जोड देऊन सिंधुदुर्गला देश-विदेशातील पर्यटकांचे प्रमुख पर्यटन केंद्र बनविण्याच्या दिशेने हे आणखी एक महत्त्वाचे पाऊल असल्याचे राणे यांनी सांगितले. या वेळी सिंधुदुर्गच्या जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे, ताज ग्रुपचे तन्वीर जाहीदी, दत्तात्रय हिरे आणि रोहन रानडे उपस्थित होते. (Nitesh Rane)






