Saturday, September 26, 2026

माजी क्रिकेटपटू विनोद कांबळी वृद्धाश्रमात? व्हायरल व्हिडिओमध्ये स्वतःच दिली माहिती, म्हणाला...

माजी क्रिकेटपटू विनोद कांबळी वृद्धाश्रमात? व्हायरल व्हिडिओमध्ये स्वतःच दिली माहिती, म्हणाला...
भारताचा माजी स्टार फलंदाज सचिन तेंडुलकर आणि डावखुरा फलंदाज विनोद कांबळी यांची मैत्री क्रिकेटविश्वात सर्वश्रूत आहे. या दोघांनी शालेय, देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर आपल्या भागीदारीने नावलौकिक मिळवला आहे. पण विनोद कांबळीच्या क्रिकेट कारकिर्दीला ब्रेक लागला आणि आयुष्याचे फासे उलटे पडले. मध्यंतरी त्याची प्रकृती ढासळल्याने रुग्णालयात उपचारही झाले. त्यानंतर ठणठणीत होऊन घरी परतला. असं असताना सोशल मीडियावर त्याचा आणखी एक व्हिडीओ समोर आला आहे. त्यामुळे त्याच्या चाहत्यांना चिंता लागून आहे. हा व्हिडीओ मनाला चटका लावणारा आहे. या व्हिडीओत माजी क्रिकेटपटू विनोद कांबळी एका वृद्धाश्रमात दिसत आहे. तसेच व्हायरल होत असलेल्या छोटा व्हिडीओत विनोद कांबळी आपल्या मनातील भावना सांगत आहे. असं असलं तरी या व्हिडीओची पुष्टी प्रहार डॉन इन करत नाही.

काय म्हणाला विनोद कांबळी?

विनोद कांबळी व्हायरल होत असलेल्या व्हिडीओत स्वत:च सांगत आहे की, तो ठाण्याच्या निदान नावाच्या सेंटरमध्ये आहे. तिथली स्वच्छता आणि सुविधांची त्याने स्तुती केली. तसेच इथे खूप सारं प्रेम आणि आपलेपणा मिळत असल्याचं सांगितलं. विनोद कांबळी व्हिडीओत म्हणाला की, मी विनोद कांबळी आहे. येथे मला खूप सारं प्रेम मिळालं आहे आणि येथे असं अजिबात वाटत नाही की मी घरापासून लांब आहे. विनोद कांबळी या वृद्धाश्रमातील सुविधांची स्तुती करत असला तरी त्याने या सेंटरमध्ये असणं क्रीडाप्रेमींसाठी धक्का आहे.

विनोद कांबळीची प्रकृती खालावली!

विनोद कांबळीला गेल्या काही महिन्यांपासून विविध आजारांनी ग्रासलं आहे. त्यामुळे त्याची तब्येत कमालीची घसरली आहे. 2024 या वर्षी त्याला युरिन इन्फेक्शन, स्नायूंचा ताण आणि मेंदूशी संबंधित काही समस्या होत्या. त्यासाठी त्याला ठाण्यातील रुगणालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यानंतर त्याची प्रकृती सुधारली होती. इतकंच काय आयपीएल 2026 सामना पाहण्यासाठी आला होता. तसेच एका जाहिरातीतही काम केलं होतं. त्यामुळे विनोद कांबळी आता बरा होत असल्याने क्रीडाप्रेमींनी आनंद व्यक्त केला होता. मात्र आता या व्हिडीओमुळे पुन्हा चिंता वाढली आहे.
Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >