मुंबई : रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन तालुक्यातील दिवेआगार (Diveagar) समुद्रकिनाऱ्यावर पर्यटनासाठी गेलेल्या विद्यार्थ्यांवर काळाने घाला घातल्याची अत्यंत दुर्दैवी घटना समोर आली आहे. आळंदी येथील 'विनर्स अॅकडमी'चे 8 विद्यार्थी समुद्रकिनाऱ्यावर बुडाल्यामुळे त्यांचा मृत्यू झाला आहे. या मन हेलावून टाकणाऱ्या दुर्घटनेमुळे आळंदीसह राज्यभरात शोककळा पसरली आहे.(Chief Minister Devendra Fadanvis)
मुख्यमंत्र्यांकडून श्रद्धांजली व प्रशासनाला निर्देश
या दुर्घटनेबद्दल तीव्र दुःख व्यक्त करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या शोकसंदेशात म्हटले आहे:
"रायगड जिल्ह्यातील दिघी सागरी, दिवेआगार येथे समुद्रकिनारी पर्यटनासाठी आलेल्या विनर्स अॅकडमी, आळंदीच्या 8 विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू झाल्याची घटना अत्यंत दु:खद आणि पीडादायक आहे. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. या सर्व कुटुंबीयांच्या दु:खात आम्ही सहभागी आहोत."
विद्यार्थ्यांचे पार्थिव तातडीने आळंदी येथे त्यांच्या घरी पोहोचवण्यासाठी स्थानिक प्रशासन आणि संबंधित अधिकारी तात्काळ समन्वय साधून मदतकार्य करत आहेत.
दुष्काळी परिस्थिती पाहून ट्रिगर-वनमध्ये न आलेल्या तालुक्यांचाही समावेश करणार मुंबई : दुष्काळी परिस्थितीमुळे अडचणीत आलेल्या शेतकऱ्यांना ...
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याकडून तात्काळ दखल
दिवेआगार समुद्रकिनाऱ्यावर घडलेल्या या घटनेची माहिती मिळताच उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी तातडीने सूत्रे हलवली. त्यांनी रायगड जिल्हाधिकाऱ्यांशी दूरध्वनीवरून संवाद साधून संपूर्ण घटनेची सविस्तर माहिती घेतली. बचावकार्य, मदतकार्य आणि सद्यस्थितीवर प्रशासनाने पूर्ण सतर्कतेने लक्ष ठेवावे, असे स्पष्ट निर्देश त्यांनी दिले आहेत. तसेच, दुर्घटनेतील मृतांच्या शोकसंतापलेल्या कुटुंबीयांप्रती तीव्र संवेदना व्यक्त करत प्रशासनाने सर्व आवश्यक ती मदत आणि कायदेशीर कार्यवाही ताबडतोब पूर्ण करावी, अशा सूचनाही त्यांनी दिल्या आहेत. पर्यटनासाठी गेलेल्या या तरुण विद्यार्थ्यांच्या अचानक जाण्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.(Chief Minister Devendra Fadanvis)






