Saturday, November 28, 2026

Sunetra Pawar : अजितदादांच्या कार्यशैलीचा वारसा ! सुनेत्रा पवार पहाटेच बारामतीत, विकासकामांचा घेतला आढावा

बारामती : उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजितदादा पवार सध्या बारामती दौऱ्यावर असून, त्यांनी शनिवारी (२८ नोव्हेंबर) भल्या पहाटेच शहरातील सुरू असलेल्या विविध विकासकामांची पाहणी केली. यावेळी संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांना सोबत घेत त्यांनी विकासकामांच्या प्रगतीचा आढावा घेतला. तसेच कामे निर्धारित वेळेत आणि दर्जेदार पद्धतीने पूर्ण करण्याच्या स्पष्ट सूचना अधिकाऱ्यांना दिल्या.

बारामती शहरात सध्या विविध विकासप्रकल्पांची कामे सुरू आहेत. या कामांचा प्रत्यक्ष आढावा घेण्यासाठी सुनेत्रा पवार यांनी सकाळीच पाहणी दौरा केला. यावेळी त्यांनी कामांची सद्यस्थिती, प्रगती आणि काम पूर्ण होण्याच्या कालमर्यादेबाबत अधिकाऱ्यांकडून माहिती घेतली.

विकासकामे केवळ वेळेत पूर्ण होणे पुरेसे नाही, तर ती दर्जेदार आणि टिकाऊ असणेही तितकेच महत्त्वाचे आहे, असे सुनेत्रा पवार यांनी स्पष्ट केले. कामांच्या गुणवत्तेशी कोणत्याही प्रकारची तडजोड खपवून घेतली जाणार नाही. सर्व संबंधित विभागांनी एकमेकांशी समन्वय ठेवून कामे निर्धारित वेळेत पूर्ण करावीत. तसेच प्रत्येक कामाच्या दर्जावर काटेकोर लक्ष द्यावे, असे निर्देश त्यांनी अधिकाऱ्यांना दिले.

दरम्यान, लोकनेते अजितदादा पवार यांच्या कार्यशैलीप्रमाणे पहाटेपासूनच विकासकामांचा प्रत्यक्ष आढावा घेत सुनेत्रा पवार यांनी बारामतीच्या विकासाला गती देण्यावर भर दिला. या पाहणी दौऱ्यावेळी संबंधित विभागांचे अधिकारी आणि पदाधिकारी उपस्थित होते.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >