थिएटरमध्ये तुफान कमाई केल्यानंतर 'हनुमान अंश' OTT वर रिलीज होणार, कुठे होणार रिलीज; जाणून घ्या तारीख
Hanuman Ansh Movie OTT Released: दोन कोटींच्या बजेटमध्ये निर्मिती झालेल्या 'हनुमान अंश' चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर 450 कोटींची कमाई करत सर्वांचेच लक्ष वेधलेय. हा ब्लॉकबस्टर चित्रपट आता ओटीटीवर रिलीज होण्यासाठी सज्ज झाला आहे.
November 8, 2026 05:00 PM
फोटो सौजन्य: सोशल मीडिया
मुंबई: विशाल चतुर्वेदी दिग्दर्शित, 'हनुमान अंश' चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धमाकेदार कमाई करत सर्वांचेच लक्ष वेधले. 2 कोटींच्या बजेटमध्ये तयार झालेल्या चित्रपटाने भारतासह संपूर्ण जगभरामध्ये 450 कोटींची कमाई केली आहे. नीम करोली बाबांच्या जीवनावर आधारित असलेल्या चित्रपटाने सर्वांचेच लक्ष वेधले आहे. फक्त भारतामध्येच नाही तर, संपूर्ण जगभरातल्या चाहत्यांनी प्रेक्षकांच्या मनावर गारूड घातलं. जर तुम्ही अजूनही विशाल चतुर्वेदी यांचा 'हनुमान अंश' चित्रपट अजूनही पाहिला नसेल, तर, तुम्ही आता ओटीटीवर पाहू शकणार आहेत. चित्रपटाची ओटीटी रिलीज डेट आता समोर आली आहे.
कतरिना कैफ आणि विकी कौशल यांनी त्यांचा मुलगा विहानसोबत पहिला स्पष्ट फोटो शेअर करत चाहत्यांना यावर्षी दिवाळीचे खास सरप्राईज दिले आहे. विहानच्या ...
नीम करोली बाबांच्या जीवनावर आधारित असलेला 'हनुमान अंश' चित्रपट बॉक्स ऑफिसवर 7 ऑगस्ट रोजी भारतासह संपूर्ण जगभरामध्ये रिलीज झाला होता. सुरुवातीचे काही दिवस चित्रपटाची कमाई संथ होती, मात्र तिसऱ्या आठवड्यापासून प्रेक्षकांनी चित्रपटाला दमदार प्रतिसाद दिला. चित्रपटाने दिलेल्या दमदार प्रतिसादामुळे चित्रपटाच्या कमाईमध्ये भरघोस वाढ झालेली पाहायला मिळाली. विशेष म्हणजे, हा चित्रपट थिएटरमध्ये जवळपास तीन महिने सुरू होता. बॉक्स ऑफिसवर दमदार कमाई केल्यानंतर, 'हनुमान अंश' चित्रपट तुम्हाला सोनी लिव्ह (Sony LIV) या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रेक्षकांना पाहता येणार आहे.
दरम्यान, सोनी लिव्ह या ओटीटी प्लॅटफॉर्मने स्वत: सोशल मीडियावर व्हिडिओ शेअर करत 'हनुमान अंश' चित्रपटाच्या ओटीटी प्रदर्शनाची तारीख जाहीर केली आहे. हा चित्रपट येत्या 27 नोव्हेंबरपासून सोनी लिव्ह (Sony LIV) या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रेक्षकांना चित्रपट पाहता येणार आहे.चित्रपटाचे कथानक 'लक्ष्मण दास' नावाच्या एका तरुणाभोवती फिरते. आईच्या निधनानंतर दुःखात बुडालेल्या लक्ष्मणचा देव आणि जीवनाचा खरा अर्थ शोधण्याचा प्रवास या कथेत दाखवण्यात आला आहे. हा प्रवास त्याला शेवटी नीम करोली बाबांपर्यंत घेऊन जातो. चित्रपट प्रेक्षकांना भूकेलेल्यांना अन्न देणे, गरजूंना मदत करणे आणि कोणतीही अपेक्षा न ठेवता माणसांची सेवा करणे हीच खरी भक्ती आहे, हा संदेश देतो.
Big Boss 20: लोकप्रिय रिऍलिटी शो 'बिग बॉस 20' प्रेक्षकांचे मनोरंजन करत असून टीआरपीच्या शर्यतीत अव्वल स्थानी आहे. रोज घडणारे अनपेक्षित ट्विस्ट, ड्रामा, वादविवाद ...
शोभिनाय सत्या (Shobhinaw Satyaa) ने चित्रपटामध्ये नीम करोली बाबाची भूमिका साकारली आहे. त्यांच्या जीवनावर आधारित असलेल्या ह्या चित्रपटाचे कथानक ‘डिव्हाइन डिटूर : दॅट चेंज्ड माय लाइफ’ या पुस्तकापासून घेतले आहे. चित्रपटाचे लेखन, दिग्दर्शन आणि निर्मिते विशाल चतुर्वेदी यांनी केली आहे. ‘स्वयंभू मीडिया नेटवर्क’च्या बॅनरखाली चित्रपटाची निर्मिती करण्यात आली आहे. चित्रपटाने कमावलेल्या नफ्यामुळे चित्रपटाची फक्त भारतीय सिनेसृष्टीतच नाही तर, जगभरामध्ये सुद्धा जोरदार चर्चा होताना दिसत आहे. बॉक्स ऑफिसवर दमदार कमाई केल्यानंतर ‘हनुमान अंश’ चित्रपट ओटीटी रिलीजसाठी सज्ज झाला आहे. ज्या प्रेक्षकांना 'हनुमान अंश' चित्रपट थिएटरमध्ये पाहता आला नाही, त्यांना घरबसल्या 27 नोव्हेंबरपासून सोनी लिव्ह या ओटीटीवर चित्रपट पाहण्याची संधी मिळणार आहे.