निकृष्ट दर्जाची कामे खपवून घेणार नाही


उंबर्डे - फोंडा रस्ता दुरुस्ती कामाच्या शुभारंभावेळी नितेश राणे यांचा इशारा




वैभववाडी (प्रतिनिधी) : दुरवस्थेमुळे चर्चेचा विषय ठरलेल्या उंबर्डे - फोंडा रस्ता डागडुजी कामाला सुरुवात होत आहे. या रस्त्याचे काम दर्जेदारपणे करून घेण्याची जबाबदारी ही स्थानिक नागरिक व लोकप्रतिनिधी यांची आहे. निकृष्ट दर्जाची कामे खपवून घेणार नाही. अशी कामे होत असतील तर ती तात्काळ थांबवा, अशा सूचना आमदार नितेश राणे यांनी उपस्थित नागरिकांना दिल्या.


उंबर्डे - फोंडा रस्ता डागडुजी कामाचा शुभारंभ आमदार नितेश राणे यांच्या हस्ते पार पडला. यावेळी भाजप तालुकाध्यक्ष नासीर काझी, पंचायत समिती उपसभापती अरविंद रावराणे, माजी वित्त व बांधकाम सभापती जयेंद्र रावराणे, भालचंद्र साठे, दिलीप रावराणे, जिल्हा बँक संचालक गुलाबराव चव्हाण, राजेंद्र राणे, स्नेहलता चोरगे, सीमा नानिवडेकर, प्राची तावडे, उपनगराध्यक्ष रोहन रावराणे, किशोर दळवी, आबा दळवी, संताजी रावराणे, संजय सावंत, रज्जब रमदुल, बाबालाल लांजेकर, उमर रमदुल, उदय मुद्रस, दशरथ दळवी, सुनील भोगले, प्रकाश पाटील, तसेच कार्यकारी अभियंता शेवाळे, उपकार्यकारी अभियंता कांबळे, कनिष्ठ अभियंता सुतार, दुडिये, ठेकेदार व भाजप पदाधिकारी उपस्थित होते.


उंबर्डे - फोंडा हा रस्ता सर्वांसाठी चर्चेचा विषय राहीला आहे. या रस्त्याची अक्षरशः चाळण झाली आहे. रस्त्याने चालणे देखील मुश्कील झाले आहे. या रस्त्याच्या डागडुजीसाठी एकूण ६ कोटींचा निधी मंजूर आहे. परंतु कोरोना काळात अनेक अडचणीमुळे हे काम थांबले होते. प्रत्येक बैठकीत काम मंजूर आहे इतकं उत्तर अधिकाऱ्यांकडून दिले जात होते.


या पार्श्वभूमीवर वैभववाडी येथे आमदार नितेश राणे यांनी बांधकाम खात्याच्या अधिकाऱ्यांची रस्ते दुरवस्थेबाबत बैठक घेतली. या बैठकीत नासीर काझी, भालचंद्र साठे व राजेंद्र राणे यांनी या रस्त्याच्या दुरवस्थेबाबत लक्ष वेधले. दरम्यान शेवाळे यांनी निधी मंजूर आहे. लवकरच काम सुरू होईल असे तोकडे उत्तर दिले. आमदार नितेश राणे यांनी थेट अधिकाऱ्यांना भुमीपूजनाची तारीख व वेळ दिली. त्यामुळे यंत्रणा खडबडून जागी झाली. उंबर्डे येथे हा भूमिपूजन सोहळा पार पडला. काम कधी पासून सुरू करणार? असा प्रश्न नितेश राणे यांनी अधिकारी व ठेकेदार यांना केला. १० नोव्हेंबर पासून काम सुरू करणार असल्याचे ठेकेदार सुधाकर साळुंखे व देवानंद पालांडे यांनी सांगितले.


यावेळी उंबर्डे ग्रामस्थ व भाजप कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Comments
Add Comment

Nitesh Rane News: सिंधुदुर्गमधील नुकसानीसाठी स्वतंत्र निकषांचा विचार करा- पालकमंत्री नितेश राणे यांची कृषिमंत्र्यांकडे मागणी

मुंबई: "सिंधुदुर्ग जिल्हा दुष्काळाच्या ट्रिगर-१ मध्ये येत असून, जिल्ह्यातील पिकांच्या नुकसानीचे तातडीने

Ganpati Special Train: गावी जाणाऱ्या गणेशभक्तांना रेल्वेकडून मोठा दिलासा, मुंबई- कोकण मार्गावर धावणार १२ विशेष गाड्या

मुंबई: गणेशोत्सवासाठी मुंबईहून कोकणामध्ये जाणाऱ्या प्रवाशांच्या दृष्टीने महत्त्वाची बातमी आहे. मध्य

Nitesh Rane News: गणेशभक्तांना घेऊन पहिली ‘मोदी एक्सप्रेस’ कोकणच्या दिशेने रवाना, मंत्री नितेश राणे यांनी दाखवला हिरवा झेंडा

मुंबई: गणेशोत्सवासाठी कोकणच्या दिशेने निघालेल्या चाकरमान्यांच्या प्रवासाला यंदाही ‘मोदी एक्सप्रेस’ची साथ

Ganpati 2026 Special Train: कोकणवासियांसाठी गणपती विशेष ट्रेन, कुठून कधी धावणार? वाचा संपूर्ण वेळापत्रक

मुंबई: गणेशोत्सवानिमित्त नोकरदारांची आपल्या गावी जाण्यासाठी सध्या एकच गर्दी पाहायला मिळत आहे. रेल्वे, एसटी बस,

Ganesh Utsav 2026 Konkan toll waiver : गणेशभक्तांच्या कोकण प्रवासाला टोलमाफी; अटल सेतू’सह प्रमुख महामार्गांवर पथकर सवलत

मुंबई : गणेशोत्सवासाठी कोकणात आपल्या मूळ गावी जाणाऱ्या लाखो गणेशभक्तांना राज्य शासनाने मोठा दिलासा दिला आहे.

Mumbai To Sawantwadi : गणेशोत्सवात कोकणवासियांना मोठे गिफ्ट! मुंबई ते सावंतवाडी दैनिक एक्सप्रेस सेवा आजपासून सुरू; हिरवा झेंडा दाखवून शुभारंभ

मुंबई : गणेशोत्सवाच्या ऐन तोंडावर कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी आणि स्थानिक रहिवाशांसाठी एक अत्यंत आनंदाची