Mumbai To Sawantwadi : गणेशोत्सवात कोकणवासियांना मोठे गिफ्ट! मुंबई ते सावंतवाडी दैनिक एक्सप्रेस सेवा आजपासून सुरू; हिरवा झेंडा दाखवून शुभारंभ

मुंबई : गणेशोत्सवाच्या ऐन तोंडावर कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी आणि स्थानिक रहिवाशांसाठी एक अत्यंत आनंदाची बातमी समोर आली आहे. मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (Chhatrapati Shivaji Maharaj Terminus) ते सावंतवाडी रोड (Sawantwadi Road) दरम्यान धावणाऱ्या नवीन नियमित (दैनिक) एक्सप्रेस ट्रेनचा आज औपचारिक शुभारंभ करण्यात आला. कोकण रेल्वे मार्गावरील वाढती गर्दी आणि प्रवाशांची दीर्घकाळापासूनची मागणी लक्षात घेऊन ही नवी रेल्वे सेवा सुरू करण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू झालेल्या या दैनिक रेल्वेमुळे मुंबई-कोकण प्रवास अधिक गतिमान, आरामदायी आणि सोयीस्कर होणार आहे.



छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे आयोजित एका विशेष कार्यक्रमात या नव्या एक्सप्रेसला हिरवा झेंडा दाखवून रवाना करण्यात आले. या कार्यक्रमाला केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव (Ashvini Vaishnav) आणि केंद्रीय वाणिज्य व उद्योग मंत्री पीयूष गोयल (Piyush Goyal) यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे (VC) हजेरी लावली. तर प्रत्यक्ष कार्यक्रमाच्या ठिकाणी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, (Eknath Shinde) मत्स्योद्योग व बंदरे मंत्री नितेश राणे, (Nitesh Rane) विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर आणि महापौर रितू तावडे यांच्यासह अनेक वरिष्ठ अधिकारी व लोकप्रतिनिधी उपस्थित होते. खासदार नारायण राणे आणि पालकमंत्री नितेश राणे यांनी या रेल्वे सेवेसाठी केंद्राकडे सातत्याने पाठपुरावा केला होता, ज्याला अखेर मोठे यश मिळाले आहे.



कोकणवासियांसाठी ठरणाऱ्या महत्त्वाच्या बाबी


ही ट्रेन नियमितपणे दररोज धावणार असल्याने ऐन सणासुदीच्या काळात प्रवाशांची होणारी धावपळ थांबणार आहे. सावंतवाडी आणि दक्षिण कोकणातील प्रवाशांना मुंबईला येण्या-जाण्यासाठी आता हक्काची आणि थेट गाडी उपलब्ध झाली आहे. आधुनिक सुविधांनी सज्ज असलेल्या या ट्रेनमुळे प्रवासाचा वेळ वाचेल आणि प्रवाशांचा प्रवास अधिक सुखकर होईल. गणपती उत्सवाच्या काळातच ही बहुप्रतिक्षित रेल्वे सेवा सुरू झाल्याने संपूर्ण कोकणात आनंदाचे वातावरण पसरले असून चाकरमान्यांनी सरकार आणि रेल्वे प्रशासनाचे आभार मानले आहेत.

Comments
Add Comment

Ganpati 2026 Special Train: कोकणवासियांसाठी गणपती विशेष ट्रेन, कुठून कधी धावणार? वाचा संपूर्ण वेळापत्रक

मुंबई: गणेशोत्सवानिमित्त नोकरदारांची आपल्या गावी जाण्यासाठी सध्या एकच गर्दी पाहायला मिळत आहे. रेल्वे, एसटी बस,

Ganesh Utsav 2026 Konkan toll waiver : गणेशभक्तांच्या कोकण प्रवासाला टोलमाफी; अटल सेतू’सह प्रमुख महामार्गांवर पथकर सवलत

मुंबई : गणेशोत्सवासाठी कोकणात आपल्या मूळ गावी जाणाऱ्या लाखो गणेशभक्तांना राज्य शासनाने मोठा दिलासा दिला आहे.

Satellite Phone: खोल समुद्रातील मच्छिमारांसाठी सॅटेलाईट फोन सुविधा; महाराष्ट्र शासनाचा मोठा निर्णय

खोल समुद्रात मासेमारीसाठी जाणाऱ्या मच्छिमारांच्या सुरक्षिततेसाठी महाराष्ट्र शासनाने महत्त्वाचे पाऊल उचलले

Kokan Railway : गणेशभक्तांसाठी रेल्वेची खास भेट! कोकण मार्गावर विशेष गाड्या आणि नवीन थांबे; पाहा पूर्ण वेळापत्रक

मुंबई : गणेशोत्सव (Ganeshotsav) अवघ्या काही आठवड्यांवर येऊन ठेपला असताना कोकण (Konkan) गाठणाऱ्या चाकरमान्यांसाठी मोठी

Mumbai Seaplane : मुंबई-रत्नागिरी सी-प्लेन सेवेला वेग; कोकण पर्यटनासाठी मोठे पाऊल

मुंबई : कोकणातील पर्यटनाला नवी चालना देण्यासाठी मुंबई (Mumbai) आणि रत्नागिरीदरम्यान (Ratnagiri) सी-प्लेन सेवा सुरू

Matsya Sampada Yojana : मुख्यमंत्री मत्स्यसंपदा योजनेचा लाभ अधिकाधिक मच्छिमारांपर्यंत पोहोचवा; नितेश राणेंचे निर्देश

मुंबई : मुख्यमंत्री मत्स्यसंपदा योजनेची (Matsya Sampada Yojana) प्रभावी अंमलबजावणी करून राज्यातील अधिकाधिक मच्छिमारांना