दोन्ही जिल्ह्यांतील रखडलेले प्रकल्प मार्गी लावणार


  • केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यामुळेच विकासाला गती

  • रेल्वे फाटक नजीक भुयारी मार्ग जमीन मोजणीचा शुभारंभ


वैभववाडी (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग - रत्नागिरी जिल्ह्यातील विकासाची प्रलंबित कामे व रखडलेले प्रकल्प केंद्रीय सूक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योगमंत्री नारायण राणे यांच्या माध्यमातून मार्गी लावण्यासाठी आम्ही लोकप्रतिनिधी कटिबद्ध आहोत. दहा वर्षांचे अथक प्रयत्न व पाठपुराव्यानंतर कोकिसरे रेल्वे फाटक भुयारी मार्गाच्या कामाला सुरुवात होत आहे. भुयारी मार्गाचे काम हे स्थानिक जमीन मालकांना विश्वासात घेऊन होणार आहेत. जमीन मालकांवर अन्याय होणार नाही, असा विश्वास माजी आमदार प्रमोद जठार यांनी व्यक्त केला.


कोकिसरे रेल्वे फाटक येथे मंजूर असलेल्या भुयारी मार्गाच्या संयुक्त जमीन मोजणी कामाचा शुभारंभ कोकिसरे येथे प्रमोद जठार यांच्या हस्ते पार पडला. यावेळी वैभववाडी भाजपाध्यक्ष नासीर काझी, सभापती अक्षता डाफळे, उपसभापती अरविंद रावराणे, माजी सभापती भालचंद्र साठे, दिलीप रावराणे, जिल्हा बँक संचालक गुलाबराव चव्हाण, सज्जन रावराणे, जि. प. सदस्य सुधीर नकाशे, राजेंद्र राणे, बंड्या मांजरेकर, कोकिसरे सरपंच दत्ताराम सावंत, रोहन रावराणे, संजय सावंत, प्रदीप नारकर, किशोर दळवी, दाजी पाटणकर, सुनील रावराणे, प्रकाश पांचाळ, प्रदीप जैतापकर, राजू पवार, अवधूत नारकर व ग्रामस्थ, जमीन मालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


जठार म्हणाले, या रेल्वे मार्गावरून दर दिवशी साठ गाड्या ये - जा करतात. त्यामुळे तब्बल नऊ ते दहा तास फाटक बंद करावा लागतो. कोल्हापूरला जाण्यासाठी किंवा आजारी, गरोदर मातांना या फाटकाचा नेहमी त्रास सहन करावा लागतो. पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्याकडे या कामाचा आम्ही सतत पाठपुरावा केला. केंद्राने या कामाला तब्बल ६५ कोटी दिले आहेत. हळवल उड्डाण पुलाचा वाईट अनुभव लोकप्रतिनिधींना होता. त्यामुळे येथे सर्व नियोजनबद्ध परवानग्या मिळविण्यात आम्ही यशस्वी झालो, असे जठार यांनी सांगितले.


ते पुढे म्हणाले, मोजणी झाल्यानंतर टेंडर प्रोसिजर होईल, व फेब्रुवारी-मार्च महिन्यात भुयारी मार्गाच्या प्रत्यक्ष कामाला सुरुवात होईल. यावेळी काही जमीन मालकांनी आपल्याला मोजणीच्या नोटीस आल्या नसल्याचे सांगितले. नोटीस आल्या नसल्या तरी त्या सर्वांना येणार, कोणावरही अन्याय होणार नाही. याबाबत आणखी समस्या असल्यास नासीर काझी, भालचंद्र साठे, सुधीर नकाशे यांच्याशी संपर्क साधावा असे जठार यांनी सांगितले. यावेळी नारकर वाडीतील यशवंत नारकर, दीपक नारकर, योगेश नारकर, अतुल नारकर, आनंद नारकर, संजय नारकर, गणपत तानवडे व इतर ग्रामस्थ उपस्थित होते.

Comments
Add Comment

Ganpati Special Train: गावी जाणाऱ्या गणेशभक्तांना रेल्वेकडून मोठा दिलासा, मुंबई- कोकण मार्गावर धावणार १२ विशेष गाड्या

मुंबई: गणेशोत्सवासाठी मुंबईहून कोकणामध्ये जाणाऱ्या प्रवाशांच्या दृष्टीने महत्त्वाची बातमी आहे. मध्य

Nitesh Rane News: गणेशभक्तांना घेऊन पहिली ‘मोदी एक्सप्रेस’ कोकणच्या दिशेने रवाना, मंत्री नितेश राणे यांनी दाखवला हिरवा झेंडा

मुंबई: गणेशोत्सवासाठी कोकणच्या दिशेने निघालेल्या चाकरमान्यांच्या प्रवासाला यंदाही ‘मोदी एक्सप्रेस’ची साथ

Ganpati 2026 Special Train: कोकणवासियांसाठी गणपती विशेष ट्रेन, कुठून कधी धावणार? वाचा संपूर्ण वेळापत्रक

मुंबई: गणेशोत्सवानिमित्त नोकरदारांची आपल्या गावी जाण्यासाठी सध्या एकच गर्दी पाहायला मिळत आहे. रेल्वे, एसटी बस,

Ganesh Utsav 2026 Konkan toll waiver : गणेशभक्तांच्या कोकण प्रवासाला टोलमाफी; अटल सेतू’सह प्रमुख महामार्गांवर पथकर सवलत

मुंबई : गणेशोत्सवासाठी कोकणात आपल्या मूळ गावी जाणाऱ्या लाखो गणेशभक्तांना राज्य शासनाने मोठा दिलासा दिला आहे.

Mumbai To Sawantwadi : गणेशोत्सवात कोकणवासियांना मोठे गिफ्ट! मुंबई ते सावंतवाडी दैनिक एक्सप्रेस सेवा आजपासून सुरू; हिरवा झेंडा दाखवून शुभारंभ

मुंबई : गणेशोत्सवाच्या ऐन तोंडावर कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी आणि स्थानिक रहिवाशांसाठी एक अत्यंत आनंदाची

Satellite Phone: खोल समुद्रातील मच्छिमारांसाठी सॅटेलाईट फोन सुविधा; महाराष्ट्र शासनाचा मोठा निर्णय

खोल समुद्रात मासेमारीसाठी जाणाऱ्या मच्छिमारांच्या सुरक्षिततेसाठी महाराष्ट्र शासनाने महत्त्वाचे पाऊल उचलले