मीरा रोडमध्ये भराव टाकून तलाव बुजवण्याचा प्रयत्न!

भाईंदर (वार्ताहर) : मीरा-भाईंदर महापालिका हद्दीतील मीरा गावठाण येथील नैसर्गिक तलावात मातीचा भराव टाकून तो बुजविण्याचा प्रयत्न सुरू झाल्याची माहिती बातमीद्वारे तसेच प्रत्यक्ष भेटून दिल्यावर सुद्धा कोणतीही कारवाई न केल्यामुळे तहसीलदार कार्यालय तो तलाव चोरी होण्याची वाट पाहत आहे का? अशी चर्चा आहे.


संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या मागील बाजूस निसर्गरम्य परिसरात वसलेल्या मीरा गावठाणमध्ये नैसर्गिक तलाव असून गेल्या काही दिवसांपासून या तलावाच्या एका बाजूला श्री हरिकृपा हॉस्पिटल असा फलक लावण्यात आला आणि त्याच बाजूने रोज रात्री उशिरापासून पहाटेपर्यंत माती भराव केला जात होता. त्यामुळे तलावाची रुंदी कमी कमी होत गेली आहे. तलावाच्या अवघ्या एक किलोमीटर अंतरावर असलेल्या तलाठी कार्यालयाकडून याकडे डोळेझाक केली जात असल्याचा आरोप स्थानिकांचा आहे.


या संदर्भात प्रसिद्ध झालेली बातमी तहसीलदार यांच्या निदर्शनास आणून दिली गेली. तसेच प्रत्यक्ष भेट घेऊन पाठपुरावा केला गेला. याला एक महिना होऊन गेला तरीसुद्धा कोणतीही कारवाई होत नसल्याने तहसीलदार कार्यालय तो तलाव चोरी होण्याची वाट पाहत आहे का? अशी चर्चा आहे.


‘...माहिती घेतो’


या प्रकरणी अपर तहसीलदार डॉ. नंदकिशोर देशमुख यांच्याशी याबाबत संपर्क साधला असता त्यांनी संबंधित तलाठी यांच्याकडून माहिती घेऊन नंतर प्रतिक्रिया देतो, असे सांगितले. त्यानंतर सुद्धा सातत्याने फोन करूनही तहसीलदार डॉ. नंदकिशोर देशमुख यांनी फोन उचलला नाही.

Comments
Add Comment

Mumbai Water Update: मुंबईकरांचं पाण्याचं टेन्शन मिटलं! भातसा तलावात ९७.४० टक्के पाणीसाठा, सध्याची परिस्थिती काय?

मुंबई: मुंबईकरांच्या दृष्टीने महत्त्वाची बातमी आहे. मुंबईला पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करणाऱ्या सातही प्रमुख

Mumbai Accident News : शिवडी वर्कशॉपमध्ये भीषण अपघात; SUVच्या धडकेत ३२ वर्षीय कामगाराचा मृत्यू

मुंबई : शिवडीतील ‘कोलगेट जेटी’ परिसरातील एका ऑटोमोबाईल वर्कशॉपमध्ये एसयूव्हीच्या धडकेत ३२ वर्षीय कामगाराचा

Devendra Fadnavis : छत्रपतींचे अनुयायी हिंदू सणांमध्ये विघ्न आणणार नाहीत! मनोज जरांगे पाटील यांच्या मुंबईत धडकण्याच्या इशाऱ्यावर प्रतिक्रिया - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी गणेशोत्सवाच्या काळात मुंबईत आंदोलनासाठी येण्याचा

Maharashtra Sea Development : सागरी विकासात महाराष्ट्र जगाचे नेतृत्व करणार!

- मंत्री नितेश राणेंचा उद्योग क्षेत्राला विश्वास; जहाजबांधणीपासून जलवाहतुकीपर्यंत गुंतवणुकीसाठी महाराष्ट्र

Ganeshotsav Decoration 2026: वांद्रे येथे साकारलेय प्रसिद्ध सोमनाथ मंदिराची हुबेहूब प्रतिकृती, भव्य दिव्य देखाव्याने जिंकले मन

मुंबई: मुंबईतील अनेक प्रसिद्ध गणेशोत्सव मंडळे दरवर्षी ऐतिहासिक आणि आकर्षक मंदिरांची प्रतिकृती साकरतात.

BMC News : एकाच पदावर १० ते १२ वर्षांपासून काम करणाऱ्यांच्या त्वरीत बदली करा

महापालिका स्थायी समिती अध्यक्षांचे निर्देश मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई महापालिकेतील विविध खाते आणि