मुंबईतील १२ हजार गणेश मंडळांना गणेशोत्सव समन्वय समितीचे आवाहन ! मुंबई (विशेष प्रतिनिधी) : हिंदू संस्कृती आणि सण परंपरेला सातत्याने प्रोत्साहन ...
दरवर्षी प्रमाणे मंडळाने यंदाही देशातील प्रसिद्ध आणि ऐतिहासिक मंदिरांच्या हुबेहूब प्रतिकृती साकारून गणेशोत्सवाच्या माध्यमातून धार्मिक व सांस्कृतिक वारशाची ओळख मुंबईकरांना करून देण्याचं काम केले आहे. गणेशोत्सवाच्या निमित्ताने मुंबईकरांना देशातील ऐतिहासिक, धार्मिक आणि स्थापत्यवैभवाची माहिती मिळावी, हा या उपक्रमामागील प्रमुख उद्देश असल्याची प्रतिक्रिया मंडळाचे अध्यक्ष जितेंद्र राऊत यांनी दिली. दरम्यान, गणेश मंडळाने गेल्या काही वर्षांत गणेशोत्सवाच्या आरासीतून देशातील विविध प्रसिद्ध देवस्थानांची ओळख मुंबईकरांना करून दिली आहे. यापूर्वी मंडळाने शिर्डीचे साई मंदिर, तुळजापूरचे श्री तुळजाभवानी मंदिर, पंढरपूरचे श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर, केदारनाथ मंदिर तसेच गोव्यातील श्री शांतादुर्गा मंदिर यांसारख्या प्रसिद्ध मंदिरांच्या भव्य आणि हुबेहूब प्रतिकृती साकारल्या होत्या.
Mumbai : गणेशोत्सवाच्या काळात क ...
मंडळाच्या या उपक्रमाला दरवर्षी भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतो. केवळ मनोरंजनाचा उत्सव न राहता गणेशोत्सवाच्या माध्यमातून भारतीय संस्कृती, अध्यात्म, इतिहास आणि स्थापत्यकलेची माहिती जनसामान्यांपर्यंत पोहोचविण्याचा मंडळाचा प्रयत्न आहे. यंदाच्या गणेशोत्सवातून मंडळ भाविकांना सोमनाथ मंदिराचा इतिहास, भगवान शिवाविषयीची श्रद्धा आणि मंदिराचे स्थापत्यवैभव यांची माहिती देणार आहे. धार्मिक स्थळांकडे केवळ श्रद्धेच्या दृष्टीने न पाहता त्यामागील इतिहास, कला, स्थापत्य आणि सांस्कृतिक परंपरा समजून घेण्याचा संदेशही या आरासीतून दिला जाणार आहे, अशी माहिती मंडळाच्या अध्यक्षांनी दिली आहे.
महापालिका स्थायी समिती अध्यक्षांचे निर्देश मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई महापालिकेतील विविध खाते आणि विभागांमध्ये जे अधिकारी १० ते १२ वर्षांपासून ...
गुजरातच्या सौराष्ट्र प्रदेशातील प्रभास पाटण येथे अरबी समुद्राच्या किनाऱ्यावर वसलेले सोमनाथ मंदिर हे भगवान शिवाच्या बारा ज्योतिर्लिंगांपैकी पहिले ज्योतिर्लिंग म्हणून श्रद्धेचे प्रमुख केंद्र मानले जाते.या ऐतिहासिक मंदिराची रचना, शिखर, सभामंडप, कोरीवकाम आणि परिसराचे सौंदर्य यांचा बारकाईने अभ्यास करून गणेशोत्सव मंडळाच्या वतीने त्याची भव्य प्रतिकृती साकारण्यात येणार आहे. त्यामुळे भाविकांना मुंबईतच सोमनाथ मंदिराच्या स्थापत्यवैभवाची अनुभूती घेता येणार आहे. तसेच या संपूर्ण परिसरात करण्यात आलेली रोषणाई हेही दरवर्षी प्रमाणे तरुणांचे आकर्षक ठरेल, अशी माहिती अध्यक्ष जितेंद्र राऊत यांनी दिली आहे.