विजय तीन, मॅचविनर पाच


सलग तिसऱ्या विजयासह पाकिस्तानची सेेमीफायनल नक्की




दुबई (वृत्तसंस्था): सुपर १२ फेरीमध्ये (ग्रुप २) अफगाणिस्तानला हरवत विजयाची हॅट्रिक नोंदवतानाच पाकिस्तानने आयसीसी टी-ट्वेन्टी वर्ल्डकप स्पर्धेची उपांत्य फेरी जवळपास निश्चित केली. यंदाच्या विश्वचषक स्पर्धेत सलग तीन विजय मिळवणारा तो पहिला संघ आहे. तीन
विजयांत पाच मॅचविनर हे पाकिस्तानच्या सलग विजयांचे प्रमुख वैशिष्ट्य आहे.


कर्णधार बाबर आझमच्या (५१) अर्धशतकानंतर आसिफ अलीने (नाबाद २५) एकाच षटकात मारलेल्या चार षटकारांमुळे पाकिस्तानने शुक्रवारी अफगाणिस्तानचा पाच विकेट आणि सहा चेंडू राखून पराभव केला. अफगाणिस्तानचे १४८ धावांचे लक्ष्य पाकिस्तानने १९ षटकांत पाच विकेटच्या बदल्यात पार केले. आझम आणि आसिफपूर्वी, डावखुरा फिरकीपटू इमाद वासिमने प्रभावी मारा करताना प्रतिस्पर्ध्यांना
१४८ धावांमध्ये रोखण्यात मोलाची भूमिका बजावली.


पाकिस्तानने अफगाणिस्तानच्या आधी, न्यूझीलंड आणि परंपरागत प्रतिस्पर्धी भारतावर मात केली आहे. किवींविरुद्ध मध्यमगती गोलंदाज हॅरिस रौफ आणि मोहम्मद रिझवान चमकला. वेगवान गोलंदाज शाहीन शाह आफ्रिदीने भारताची दाणादाण उडवली. त्यानंतर कर्णधार बाबरने मोहम्मद रिझवानसह प्रतिस्पर्ध्यांचे आव्हान पूर्ण केले.


बाबरने टाकले कोहलीला मागे


टी-ट्वेन्टी प्रकारात झटपट एक हजार धावा करणारा कर्णधार पाकिस्तानचा सलामीवीर बाबर आझमने सातत्य राखताना आणखी एक अर्धशतक झळकावत टी-ट्वेन्टी प्रकारात कर्णधार म्हणून एक हजार धावा पूर्ण केल्या. त्याने २६ डावांमध्ये ही करामत साधली. बाबरने भारताचा कर्णधार विराट कोहलीला (३० डाव) मागे टाकले. या दोघांसह दक्षिण आफ्रिकेचा फाफ डु प्लेसिस (३१ डाव), ऑस्ट्रेलियाचा अॅरोन फिंच (३२ डाव) तसेच न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसनने (३६ डाव) कर्णधार म्हणून एक हजार धावा पूर्ण केलेल्या आहेत.

Comments
Add Comment

Indian cricket team : टीम इंडियाच्या सपोर्ट स्टाफमध्ये मोठा बदल; फिजिओ......नोटीस पीरियडवर

नवी दिल्ली: भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील तीन सामन्यांच्या टी-२० मालिकेला रविवारपासून सुरुवात होत असतानाच,

Harshit Rana : हर्षित राणाच्या दुखापतीने टीम इंडियाला धक्का; अफगाणिस्तान मालिका अन् एशियन गेम्स हुकले

नवी दिल्ली : भारताचा वेगवान गोलंदाज हर्षित राणा दुखापतीमुळे अफगाणिस्तानविरुद्धच्या टी-२० आंतरराष्ट्रीय

Duleep Trophy Final : १३ वर्षांनंतर ईस्ट झोनकडे दुलीप ट्रॉफीचे विजेतेपद; इशान किशनच्या ऐतिहासिक द्विशतकासह दमदार कामगिरी

चेन्नई : दुलीप ट्रॉफी २०२६ च्या अंतिम सामन्यात इशान किशनच्या नेतृत्वा

Junior Women's Asia Cup 2026 : भारताचा पाकिस्तानवर १९-० असा ऐतिहासिक आणि दणदणीत विजय, उपांत्य फेरीत दिमाखात प्रवेश

मोकी (चीन) :  महिला ज्युनियर आशिया कप २०२६ च्या उपांत्यपूर्व फेरीत भा

Friendly match against India : ब्राझीलच्या २६ सदस्यीय स्टार फुटबॉल संघाची घोषणा, कार्लो अँसेलोटी यांच्याकडे मुख्य प्रशिक्षकपद

नवी दिल्ली : पाच वेळा विश्वचषक विजेता असलेला ब्राझीलचा फुटबॉल संघ ३ ऑ

Asian Games 2026 : भारतीय संघात मोठा बदल, दुखापतग्रस्त जेमिमा रॉड्रिग्जच्या जागी प्रतिका रावलला संधी

नवी दिल्ली : येत्या आशियाई क्रीडा स्पर्धा २०२६ साठी भारतीय महिला क्रि