पुण्याचा अभिजित कटके ‘हिंदकेसरी’चा मानकरी

हैदराबाद : महाराष्ट्र केसरी कुस्तीपटू अभिजित कटके रविवारी हिंदकेसरी किताबाचा मानकरी ठरला. त्याने ५१ व्या हिंदकेसरी कुस्ती स्पर्धेच्या फायनलमध्ये हरियाणाच्या सोमवीरला धूळ चारली. पुण्याच्या अभिजितने ५-० अशा फरकाने फायनल जिंकून किताबावर नाव कोरले. हैदराबाद येथे भारतीय शैली कुस्ती महासंघाने आयोजित या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यादरम्यान महाराष्ट्र केसरी अभिजित कटकेची कामगिरी लक्षवेधी ठरली.


अभिजित पुण्यातील शिवरामदादा तालीम येथे सराव करतो. यापूर्वी अभिजितने महाराष्ट्र केसरी, भारत केसरी किताब जिंकला आहे. दोन्ही किताब मिळवणाऱ्या दीनानाथ सिंह, दादुमामा चौगुले, हरिश्चंद्र बिराजदार, विनोद चौगुले, अमोल बुचडे यांच्या पंक्तीत तो विराजमान झाला आहे. मान्यवरांच्या हस्ते अभिजित कटकेला चांदीची गदा देऊन गौरवण्यात आले.

Comments
Add Comment

असं कसं झालं! गोलंदाजाने टाकलेला बॉल एक टप्पा घेत थेट षटकार, पण मिळाल्या 5 धावा Video पाहा

क्रिकेटच्या तिन्ही फॉर्मेटमध्ये विक्रम रचणं आणि मोडणं, हे काय नवीन राहिलेलं नाही. आजवर अनेक विक्रम रचले गेले आणि

रोहित शर्माने तिसऱ्या वनडे सामन्यात 92 धावा केल्यानंतरही सुनील गावस्कर नाखुश; असं कारण देत म्हणाले...

भारत आणि वेस्ट इंडिजविरुद्धच्या वनडे मालिकेत रोहित शर्माची बॅट चांगलीच तळपली. रोहित शर्माने आपल्या खेळीने

IND vs WI T20: प्लेइंग 11 मध्ये वैभव सूर्यवंशी असेल की नाही? गौतम गंभीरने एका वाक्यात विषय संपवला

एशियन गेम्स 2026 स्पर्धेत भारताने श्रेयस अय्यरच्या नेतृत्वात जेतेपद पटकावलं आणि सुवर्ण पदकावर नाव कोरलं. भारताने

वनडे वर्ल्डकप 2027 स्पर्धेसाठी भारताचा अर्धा संघ निश्चित! आकाश चोप्राने 6 नाव केली जाहीर

आयसीसी वनडे वर्ल्डकप स्पर्धेचं बिगुल वाजलं आहे. आयसीसीने या स्पर्धेचं वेळापत्रक जाहीर केलं असून दोन गटातील

भारताने वेस्ट इंडिजविरुद्धची वनडे मालिका जिंकली, पण एक चूक महागात पडली; संपूर्ण संघाला भरावा लागला दंड

भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात तीन सामन्यांची वनडे मालिका पार पडली. या मालिकेतील पहिल्या दोन सामन्यात भारताने

IND vs WI: भारत वेस्ट इंडिज टी20 सामन्यासाठी खास पिच, इंग्लंडच्या रिचर्सच्या आधारावर देखरेख!

भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात 6 ऑक्टोबरपासून पाच सामन्यांची टी20 मालिका होत आहे. या मालिकेसाठी दोन्ही संघ सज्ज