रोहित शर्माने तिसऱ्या वनडे सामन्यात 92 धावा केल्यानंतरही सुनील गावस्कर नाखुश; असं कारण देत म्हणाले...

भारत आणि वेस्ट इंडिजविरुद्धच्या वनडे मालिकेत रोहित शर्माची बॅट चांगलीच तळपली. रोहित शर्माने आपल्या खेळीने टीकाकारांची तोंड बंद केली. पहिल्या वनडे सामन्यात फार काही करता आलं नाही. मात्र दुसऱ्या वनडे सामन्यात शतक ठोकलं आणि तिसऱ्या वनडे सामन्यात शतक अवघ्या 8 धावांनी हुकलं. त्यामुळे रोहित शर्माच्या चाहत्यांना दु:ख झालं. दुसरीकडे, माजी क्रिकेटपटू सुनील गावस्कर यांनी मात्र नाराजी व्यक्त केली आहे. इतकंच काय तर रोहित शर्माला एक टार्गेट दिलं आहे. सुनील गावस्कर यांनी सांगितलं की, रोहित शर्मा जेव्हा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त होईल, तेव्हा त्याच्या शतकांची संख्या त्याच्या वयापेक्षा जास्त असावी. रोहित शर्माने वेस्ट इंडिजविरुद्ध शतक ठोकलं असतं तर आज त्याच्या शतकांची संख्या ही 35 असू शकली असती. रोहित शर्माने आंतरराष्ट्रीय वनडे क्रिकेटमध्ये 291 सामने खेळले असून 49.27च्या सरासरीने 12,120 धावा केल्या आहेत. त्याने 35 शतकं आणि 63 अर्धशतकं ठोकली आहेत.

काय म्हणाले सुनील गावस्कर?


सुनील गावस्कर यांनी जियोस्टारशी बोलताना सांगितलं की, 'रोहित शर्मा 92 धावांवर बाद झाला. मी निराश झालो होते की तो शतक पूर्ण करू शकला नाही. वनडे वर्ल्डकप 2027 नंतर तो आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम ठोकण्याची शक्यता असू शकते. पण जेव्हा रोहित शर्मा क्रिकेट सोडण्याचा निर्णय घेईल तेव्हा मला वैयक्तिकरित्या असं वाटतं की, त्याच्या वनडे शतकांची संख्या त्याच्या वयापेक्षा जास्त असावी. जर असं झालं तर त्याचं क्रिकेट करिअर कसं होतं? त्याने आपलं स्टँडर्स कसं ठेवलं आहे, हे दिसून येईल.'


..शेवटच्या वर्षात मला हवी तितकी शतकं करता आली नाही


सुनील गावस्कर पुढे म्हणाले की, 'रोहित शर्माने हा टप्पा गाठावा अशी माझी इच्छा आहे. माझ्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकिर्दीच्या शेवटच्या वर्षामध्ये मला हवी तितकी शतकं करता आली नाही. मी तीन वेळा 90पेक्षा जास्त धावांवर असताना बाद झालो. जर मी ती शतके केली असती तर माझ्या शतकांची संख्या ही माझ्या वयाइतकी म्हणजे 38 झाली असती.' आता रोहित शर्मा थेट न्यूझीलंडविरुद्धच्या वनडे मालिकेत खेळताना दिसणार आहे. आता न्यूझीलंडमध्ये त्याची कामगिरी कशी असेल याकडे क्रीडाप्रेमींचं लक्ष लागून आहे.
Comments
Add Comment

IND vs WI T20: प्लेइंग 11 मध्ये वैभव सूर्यवंशी असेल की नाही? गौतम गंभीरने एका वाक्यात विषय संपवला

एशियन गेम्स 2026 स्पर्धेत भारताने श्रेयस अय्यरच्या नेतृत्वात जेतेपद पटकावलं आणि सुवर्ण पदकावर नाव कोरलं. भारताने

वनडे वर्ल्डकप 2027 स्पर्धेसाठी भारताचा अर्धा संघ निश्चित! आकाश चोप्राने 6 नाव केली जाहीर

आयसीसी वनडे वर्ल्डकप स्पर्धेचं बिगुल वाजलं आहे. आयसीसीने या स्पर्धेचं वेळापत्रक जाहीर केलं असून दोन गटातील

भारताने वेस्ट इंडिजविरुद्धची वनडे मालिका जिंकली, पण एक चूक महागात पडली; संपूर्ण संघाला भरावा लागला दंड

भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात तीन सामन्यांची वनडे मालिका पार पडली. या मालिकेतील पहिल्या दोन सामन्यात भारताने

IND vs WI: भारत वेस्ट इंडिज टी20 सामन्यासाठी खास पिच, इंग्लंडच्या रिचर्सच्या आधारावर देखरेख!

भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात 6 ऑक्टोबरपासून पाच सामन्यांची टी20 मालिका होत आहे. या मालिकेसाठी दोन्ही संघ सज्ज

Team India Schedule: वनडे मालिका संपली, आता टीम इंडिया खेळणार 10 टी-20 सामने; कुठे- कधी पाहा संपूर्ण Schedule

मुंबई: एशियन गेम्स 2026 मध्ये (Asian Games 2026) भारत विरूद्ध वेस्ट इंडिज यांच्यातील वन डे सामना खेळवल्यानंतर क्रिकेट

Asian Games 2026 : भारताचा विजयाचा डंका! २१ सुवर्णपदकांसह मिळवली एकूण ८५ पदके

आशियाई क्रीडा स्पर्धा २०२६ आज समाप्त झाली असून भारताने यावर्षी विजयाचा डंका वाजवलाय. एकूण ८५ पदकं भारतीय