IND vs WI: भारत वेस्ट इंडिज टी20 सामन्यासाठी खास पिच, इंग्लंडच्या रिचर्सच्या आधारावर देखरेख!

भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात 6 ऑक्टोबरपासून पाच सामन्यांची टी20 मालिका होत आहे. या मालिकेसाठी दोन्ही संघ सज्ज आहेत. या मालिकेतील पहिला सामना लखनौमध्ये होत आहे. पण या मालिकेतील तिसऱ्या सामन्यासाठी खास खेळपट्टी असणार आहे. हा सामना इंदुरच्या होळकर स्टेडियममध्ये होणार असून या मैदानातील खेळपट्टी चर्चेचा विषय आहे. कारण भारत वेस्ट इंडिज तिसऱ्या टी20 मालिकेसाठी आधुनिक पद्धतीने खेळपट्टी तयार करण्यात येत आहे. त्यामुळे या खेळपट्टीत असं काय खास आहे? असा प्रश्न पडल्याशिवाय राहणार नाही.  क्रीडाप्रेमी या खेळपट्टीची चर्चा करत आहे. मीडिया रिपोर्टनुसार, होळकर मैदनातील खेळपट्टी तयार करण्यासाठी अत्याधुनिक रोलर्स वापरले जात आहे. खेळपट्टीसाठी 200, 500 आणि 750 किलोग्रॅमचे रोलर्स वापरले जात आहेत. हे रोलर्स हाताने चालवल्या जाणाऱ्या रोलर्सपेक्षा मोठे असून त्याचा वापर पहिल्यांदाच होत आहे.

अत्याधुनिक रोलर्सचा वापर होतो तरी कसा?


अत्याधुनिक रोलर्स काम कसे करतात? हा प्रश्न देखील मनात येतो. तर अत्याधुनिक रोलर्समुळे खेळपट्टीवर माती, ओलावा, गवत आणि चेंडूची उसळी याचा वैज्ञानिक पद्धतीने रिसर्च केलं जातं. इंग्लंड अँड वेल्स क्रिकेट बोर्ड आणि इंग्लंडच्या क्रॅनफिल्ड युनिवर्सिटीने केलेल्या संशोधनात खेळपट्टीवरील ओलावा, मातीची स्थिती आणि रोलरच्या दाबाचा पृष्ठभागावर होणार परिणाम याचा अभ्यास केला गेला आहे. त्यामुळे खेळपट्टीचा अंदाज घेऊन रोलर फिरवणं फायद्याचं ठरतं. सध्या क्रिकेटच्या खेळपट्टीवर वजनदार रोलर फिरवला जातो. त्यामुळे खेळपट्टी अधिक टणक होते आणि फलंदाजांना लाभ मिळतो. नव्या तंत्रानुसार, खेळपट्टीवरील ओलावा आणि इतर गोष्टी लक्षात घेऊन रोलिंग केलं जातं. त्यामुळे खेळपट्टीचा समतोल राखला जाईल.


बीसीसीआयच्या आदेशानंतर आधुनिक रोलरचा वापर


इंदुरच्या खेळपट्टीवर 200, 500 आणि 750 किलो वजनाचे तीन आधुनिक रोलर्सचा वापर केला जात आहे. हे रोलर्स चेन्नईहून मागवले आहे. या रोलर्सचा वापर मैदानातील स्थिती आणि हवामानाचा अंदाज घेण्यासाठी केला जाऊ सकतो. मध्य प्रदेशचे क्रिकेट असोसिएशनने सांगितलं की, नव्या रोलरमुळे खेळपट्टीत सुधारणा करता येईल. यामुळे चांगल्या दर्जाच्या खेळपट्टी तयार करण्यास मदत होईल. बीसीसीआयने दिलेल्या आदेशानंतर रोलर्सची व्यवस्था करण्यात आली आहे.
Comments
Add Comment

वनडे वर्ल्डकप 2027 स्पर्धेसाठी भारताचा अर्धा संघ निश्चित! आकाश चोप्राने 6 नाव केली जाहीर

आयसीसी वनडे वर्ल्डकप स्पर्धेचं बिगुल वाजलं आहे. आयसीसीने या स्पर्धेचं वेळापत्रक जाहीर केलं असून दोन गटातील

भारताने वेस्ट इंडिजविरुद्धची वनडे मालिका जिंकली, पण एक चूक महागात पडली; संपूर्ण संघाला भरावा लागला दंड

भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात तीन सामन्यांची वनडे मालिका पार पडली. या मालिकेतील पहिल्या दोन सामन्यात भारताने

Team India Schedule: वनडे मालिका संपली, आता टीम इंडिया खेळणार 10 टी-20 सामने; कुठे- कधी पाहा संपूर्ण Schedule

मुंबई: एशियन गेम्स 2026 मध्ये (Asian Games 2026) भारत विरूद्ध वेस्ट इंडिज यांच्यातील वन डे सामना खेळवल्यानंतर क्रिकेट

Asian Games 2026 : भारताचा विजयाचा डंका! २१ सुवर्णपदकांसह मिळवली एकूण ८५ पदके

आशियाई क्रीडा स्पर्धा २०२६ आज समाप्त झाली असून भारताने यावर्षी विजयाचा डंका वाजवलाय. एकूण ८५ पदकं भारतीय

India vs Australia WCL 2026: शेर अभी जिंदा हैं...युवराज सिंगच्या फलंदाजीने ऑस्ट्रेलिया संघाला धूळ चारली

'शेर अभी जिंदा हैं' हा डायलॉग जर आताच्या घडीला कोणाला लागू होत असेल तर तो आहे भारतीय क्रिकेटपटू युवराज सिंग. एका

Asian Games 2026: आशियाई क्रीडा स्पर्धा 2026 पदकतालिकेत भारताची ऐतिहासिक कामगिरी; 21 सुवर्णपदकांसह पटकावले चौथे स्थान

मुंबई : आयची-नागोया येथे झालेल्या 20 व्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताने चांगली कामगिरी केली. 14 दिवसांच्या या