आकाश चोप्राने निवडलेले सहा खेळाडू कोण?
आकाश चोप्राने वनडे वर्ल्डकप स्पर्धेसाठी निवडलेल्या संघावर बोट दाखवण्याची संधीही नाही. कारण निवडलेल्या सहा खेळाडूंचा अनुभव आणि फॉर्म जबरदस्त आहे. निवडलेल्या सहा खेळाडूंमध्ये रोहित शर्मा, शुभमन गिल आणि विराट कोहली यांचं नाव टॉपला आहे. आकाश चोप्राने युट्यूब चॅनेवर स्पष्ट केलं की, 'मी जेव्हा फलंदाजीचा क्रम पाहतोतेव्हा 2023 आणि 2027 फार अंतर नाही. रोहित शर्मा आणि शुभमन गिल ओपनिंग करतील. हे दोघं 2023 वर्ल्डकप संघात होते. त्यांचा फॉर्म जबरदस्त आहे आणि वर्ल्डकपपर्यंत त्यांचा फॉर्म चांगला असेल, अशी आशा करूयात. विराट कोहली तिसऱ्या क्रमांकावर असेल.त्याचा फॉर्म पुढच्या वर्षापर्यंत मुद्दा असेल, असं मला वाटत नाही.'
भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात तीन सामन्यांची वनडे मालिका पार पडली. या मालिकेतील पहिल्या दोन सामन्यात भारताने विजय मिळवला होता. त्यामुळे ही मालिका ...
चौथ्या आणि पाचव्या खेळाडूसाठी या खेळाडूंवर विश्वास
आकाश चोप्राने चौथ्या क्रमांकासाठी श्रेयस अय्यरचं नाव घेतलं आहे. श्रेयस अय्यर मधल्या फळीची बाजू भक्कमध्ये सांभाळेल असा खेळाडू आहे. श्रेयस अय्यरने या क्रमांकावर 47हून अधिकच्या सरासरीने 2000 धावा केल्या आहेत. पाचव्या क्रमांकावर विकेटकीपर फलंदाज म्हणून केएल राहुलचं नाव घेतलं आहे. कारण विकेटकीपर फलंदाज म्हणून त्याला पसंती असेल. त्याने पाचव्या क्रमांकावर फलंदाजी करताना 68.58 च्या सरासरीनेधावा केल्या आहे. तसेच 4 शतकं आणि 10 अर्धशतकं ठोकली आहेत.
सहाव्या स्थानासाठी खेळाडूचं नाव घेतलं, पण..
आकाश चोप्राने सहावा खेळाडू म्हणून अष्टपैलू हार्दिक पांड्याचं नाव घेतलं आहे. सध्या हार्दिक पांड्या दुखापतग्रस्त असून रिकव्हर होण्यासाठी प्रयत्न करत आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या आगामी मालिकेतही त्याचं खेळणं कठीण आहे. पण वनेड वर्ल्डकप स्पर्धेसाठी सहाव्या क्रमांकाचा खेळाडू म्हणून हार्दिक पांड्या योग्य पर्याय असल्याचं मत आकाश चोप्राने व्यक्त केलं आहे. पण हार्दिक पांड्याचा फॉर्म कसा आहे? याबाबत अंदाज नसल्याचं आकाश चोप्राने स्पष्ट केलं.