एसी लोकलचे दरवाजे न उघडल्याने रेल्वे प्रवासी संतापले

ठाण्याची विरारमध्ये पुनरावृत्ती


विरार : मध्य रेल्वेच्या ठाणे रेल्वे स्थानकात एसी लोकलचे दरवाजे न उघडल्याने प्रवाशांना थेट कळवा कारशेडमध्ये जावे लागले होते. अशाच प्रकारे सोमवारी रात्री पश्चिम रेल्वेच्या नालासोपारा रेल्वे स्थानकातही दरवाजे न उघडल्याने प्रवाशांनी विरार स्थानकात प्रचंड गोंधळ घातला.


सोमवारी रात्री साडेअकरा वाजता नालासोपारा स्थानकात एसी लोकलचे दरवाजेच उघडले नाहीत. त्यामुळे मोठा गोंधळ पाहायला मिळाला. सोमवारी रात्री ११.३० च्या सुमारास मुंबईहून विरारकडे जाणारी एसी ट्रेन नालासोपारा रेल्वेस्थानकात थांबली. मात्र, त्यावेळी ट्रेनचे दरवाजेच उघडले नाहीत. त्यानंतर एसी लोकल विरार स्थानकात जाऊन थांबली. तेव्हा संतप्त प्रवाशांनी विरार स्थानकात चांगलाच गोंधळ घातला.


नालासोपारा स्थानकात दरवाजे न उघडल्याने प्रवाशांची एकच तारांबळ उडाली. भयभीत झालेल्या प्रवाशांनी याचे व्हिडिओ काढून सोशल मीडियावर व्हायरल केले. त्यानंतर ही एसी लोकल विरार स्थानकात थांबली तेव्हा प्रवाशांच्या संतापाचा भडका उडाला. संतप्त प्रवाशांनी एसी लोकलच्या मोटरमनला ट्रेनच्या केबिनमध्ये कोंडून ठेवले. अखेर रेल्वे पोलिसांच्या हस्तक्षेपानंतर मोटरमनची सुटका करण्यात आली.


नालासोपारा स्थानकात एसी ट्रेनचे दरवाजे का उघडले नाहीत, याचे नेमके कारण अद्याप समोर आलेले नाही. हा प्रकार मोटरमनच्या चुकीमुळे का तांत्रिक बिघाडामुळे घडला, हे अद्याप स्पष्ट होऊ शकलेले नाही. याबाबतची तक्रार काही प्रवाशांनी विरार स्टेशन मास्तरकडे केली आहे.


मात्र, विरार स्टेशन मास्तरांनी या घटनेचा इन्कार केला असून गार्डने दरवाजे उघडल्याचे सांगितले आहे. या गोंधळाची रेल्वेनं दखल घेतली असून चौकशीचे आदेश दिल्याचे समजते.

Comments
Add Comment

Banganga Tank: मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी केली बाणगंगा तलावाची पाहणी, पितृपक्षामध्ये पर्यावरणपूरक पिंडदान करण्याचे केले आवाहन

मुंबई: दक्षिण मुंबईतील वाळकेश्वर येथील ऐतिहासिक आणि पौराणिक महत्त्व लाभलेल्या बाणगंगा तलावात दूषित पाण्यामुळे

‘विकसित भारत’च्या महामार्गावर मुंबईच असणार आघाडीवर; भाजपा आमदार अमीत साटम यांचा ठाम विश्वास

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दूरदर्शी नेतृत्वाखाली देश जेव्हा 2047 पर्यंत ‘विकसित भारत’ बनण्याचे स्वप्न उराशी

Mission 2027: मुंबईत मेट्रोच्या कामांना गती मिळणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ॲक्शन मोडमध्ये!

मुंबईकरांना ट्रॅफिकच्या त्रासातून मुक्त करण्यासाठी आणि दळणवळणाला बुलेट गती देण्यासाठी राज्य सरकारने आता कंबर

Eknath Shinde On Smit Machchhar: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून कॅप्टन स्मित यांचे कौतुक; म्हणाले...

मुंबई: दुबईहून इस्त्राईलकडे जाणाऱ्या 'फ्लाय दुबई' कंपनीच्या विमानामध्ये सह वैमानिकाने कॅप्टन स्मित मच्छार

IAS Officer Transfer: CM देवेंद्र फडणवीस यांचा मोठा निर्णय, राज्यातील तीन बड्या IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या

मुंबई: राज्य सरकारने सोमवारी तीन सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या

Eastern Freeway News: ठाण्यातून 20 मिनिटांत मुंबई गाठता येणार, ईस्टर्न फ्रीवेवरून प्रवास सुसाट, कधी सुरु होणार नवा मार्ग?

मुंबई: मुंबई- ठाणे प्रवास करणाऱ्या प्रवाशांना कायमच वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागते. विशेषत: नोकरदारांना या