ज्येष्ठ अभिनेत्री चित्रा नवाथे यांचे निधन

मुंबई : ज्येष्ठ अभिनेत्री चित्रा नवाथे यांचे बुधवारी सकाळी निधन झाले आहे. वयाच्या ८९व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. पन्नासच्या दशकात त्यांनी मराठी चित्रपटसृष्टी गाजवली होती. मागील दीड वर्षाहून अधिक काळ मुलुंड येथील सरला नर्सिंग होममध्ये त्यांच्यावर उपचार सुरू होते. तेथेच त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या पार्थिवावर सांताक्रुझ येथील स्मशानभूमीत अंतिम संस्कार करण्यात आले.


आप्त आणि नातेवाईक असूनही चित्रा नवाथे यांनी आपला शेवटचा काळ वृद्धाश्रमात व्यतीत केला होता. चित्रा नवाथे यांची सख्खी बहीण रेखा कामत या देखील प्रसिद्ध अभिनेत्री होत्या. लाखाची गोष्ट या चित्रपटात दोघी बहिणींनी एकत्र काम केले होते.


चित्रा नवाथे यांचे खरे नाव कुसुम सुखटणकर होते. प्रसिद्ध दिग्दर्शक राजा नवाथे यांच्याशी चित्रा यांचा विवाह झाला होता. गदिमांनी त्यांचे कुसुम हे नाव बदलून चित्रा असे ठेवले होते. मुंबईत दादर येथील मिरांडा चाळीत चित्रा यांचे बालपण गेले. मुंबईत भवानीशंकर रोडवरील प्राथमिक शाळेत त्यांचे सातवीपर्यंतचे शिक्षण झाले.


१९५१ मध्ये ‘लाखाची गोष्ट’ हा त्यांचा प्रमुख भूमिका असलेला पहिला चित्रपट होता. त्यानंतर 'वहिनीच्या बांगड्या', 'गुळाचा गणपती', 'देवबाप्पा', 'मोहित्यांची मंजुळा', 'बोलविता धनी' या चित्रपटातून त्यांनी नायिकेच्या भूमिका बजावल्या तर 'बोक्या सातबंडे', 'अगडबम', 'टिंग्या' या चित्रपटात त्यांनी आज्जीच्या भूमिका साकारल्या होत्या. चित्रा आणि राजा नवाथे यांच्या मुलाचे तरुण वयातच अपघाती निधन झाले होते तर पती राजा नवाथे यांचेही २००५ साली आजारपणाने निधन झाले.

Comments
Add Comment

Lalbagcha Raja News: जबरदस्त,'प्रसाद ते उर्जा'; ‘लालबागच्या राजा’च्या प्रसादातील ओल्या कचऱ्यापासून वीज निर्मिती केली जाणार

मुंबई: मुंबईमध्ये अनेक प्रसिद्ध मंडळांकडून दरवर्षी मोठ्या थाटामाटामध्ये गणेशोत्सव साजरा केला जातो. त्यामुळे

Mumbai Accident News: दहिसरमध्ये भीषण अपघात! भरधाव बाईक डिव्हायडरला धडकली; २ आयटी व्यावसायिकांचा मृत्यू

मुंबई: मुंबईमध्ये अपघाताचे सत्र पाहायला मिळत आहेत. कोस्टल रोडवर भरधाव BMW कारच्या भीषण अपघातानंतर दहिसर पूर्वेतही

BEST Bus Fire : मुलुंडमध्ये बेस्ट बस आणि ट्रॅव्हल बसची समोरासमोर धडक; बसच्या बोनेटला आग, चालक जखमी

मुंबई : मुंबईतील मुलुंड पश्चिम परिसरात रविवारी पहाटे बेस्ट बस आणि खासगी ट्रॅव्हल बसची समोरासमोर धडक होऊन अपघात

Coastal Road Accident : मुंबई कोस्टल रोडवर भरधाव बीएमडब्ल्यूचा भीषण अपघात! हवेत अनेकदा पलटी, तिघांचा मृत्यू; CCTV फुटेज समोर

मुंबई : मुंबईच्या कोस्टल रोडवर रविवारी, २० सप्टेंबर रोजी पहाटे भरधाव BMW कारचा भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत

Ashish Shelar : काळाचौकी दुर्घटनेनंतर मंत्री आशिष शेलारांनी घेतली मृतांच्या कुटुंबीयांची भेट; गणेश मंडळांना सुरक्षेच्या नियमांचे पालन करण्याचे आवाहन

मुंबई : काळाचौकी महागणपती मंडळाच्या परिसरात घडलेल्या विजेच्या धक्क्याच्या दुर्घटनेनंतर सांस्कृतिक कार्य

Mumbai Kalachowki Electrocution : काळाचौकी प्रकरणातील स्टॉल चालकावर BNS अंतर्गत गुन्हा दाखल

मुंबई : मुंबईतील काळाचौकी परिसरात गणेशोत्सवादरम्यान घडलेल्या विजेच्या धक्क्याच्या दुर्घटनेत दोघांचा मृत्यू