मुंबई : मुंबईतील मुलुंड पश्चिम परिसरात रविवारी पहाटे बेस्ट बस आणि खासगी ट्रॅव्हल बसची समोरासमोर धडक होऊन अपघात झाला. या धडकेनंतर बेस्ट बसच्या बोनेटच्या भागात आग लागली. या दुर्घटनेत बसचा चालक जखमी झाला असून, त्याला उपचारानंतर रुग्णालयातून घरी सोडण्यात आले. या घटनेमुळे परिसरात काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. मिळालेल्या माहितीनुसार, हा अपघात २० सप्टेंबर रोजी पहाटे सुमारे ५ वाजून ५० मिनिटांनी मुलुंड पश्चिमेतील रेली वुल्फ परिसरात घडला. बेस्ट बस क्रमांक ७७१५ ही बस सीप्झ येथून तीन हात नाक्याच्या दिशेने जात होती. या बसचा मार्ग ४९६/३१ असा होता. याचदरम्यान समोरून येणाऱ्या खासगी ट्रॅव्हल बसशी तिची जोरदार धडक झाली.(BEST Bus Fire Mulund)
मेट्रोच्या कामामुळे एकेरी वाहतूक
मुलुंडमधील रेली वुल्फ परिसरात मेट्रोच्या बांधकामामुळे एकेरी वाहतूक व्यवस्था लागू करण्यात आली होती. या मार्गावरून प्रवास करत असताना दोन्ही बसची समोरासमोर धडक झाल्याचे वृत्त आहे. मात्र, अपघाताचे नेमके कारण आणि त्यासाठी कोण जबाबदार आहे, याबाबत तपासातून अधिक स्पष्टता येणे अपेक्षित आहे.(BEST Bus Fire Mulund)
मुंबई : मुंबईच्या कोस्टल रोडवर रविवारी, २० सप्टेंबर रोजी पहाटे भरधाव BMW कारचा भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत तिघांचा मृत्यू झाला असून एक जण गंभीर जखमी ...
धडकेनंतर बसच्या बोनेटला आग
अपघातानंतर बेस्ट बसच्या बोनेटच्या भागातून आग लागली. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन बसमधील वाहकाने अग्निशामक यंत्राच्या मदतीने आग विझवण्याचा प्रयत्न केला. त्याच्या प्रयत्नांमुळे अग्निशमन दल घटनास्थळी पोहोचण्यापूर्वीच आग नियंत्रणात आणण्यात आली. त्यामुळे आगीचा अधिक फैलाव टळला.(BEST Bus Fire Mulund)
चालक जखमी; उपचारानंतर डिस्चार्ज
या अपघातात बेस्ट बसचा चालक संदीप नामदेव करंडे (वय ४०) यांच्या पोटाला आणि उजव्या पायाला दुखापत झाली. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारानंतर त्यांना घरी सोडण्यात आल्याची माहिती आहे. अपघातग्रस्त बेस्ट बस मुलुंड डेपोमध्ये तपासणीसाठी नेण्यात आली. दरम्यान, ट्रॅव्हल बसच्या चालकाविरोधात मुलुंड पोलीस ठाण्यात स्टेशन डायरी नोंद करण्यात आल्याचे वृत्त आहे. या अपघातामुळे मुलुंड परिसरातील वाहतूक व्यवस्था आणि रस्त्यावरील सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.(BEST Bus Fire Mulund)