Coastal Road Accident : मुंबई कोस्टल रोडवर भरधाव बीएमडब्ल्यूचा भीषण अपघात! हवेत अनेकदा पलटी, तिघांचा मृत्यू; CCTV फुटेज समोर

मुंबई : मुंबईच्या कोस्टल रोडवर रविवारी, २० सप्टेंबर रोजी पहाटे भरधाव BMW कारचा भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत तिघांचा मृत्यू झाला असून एक जण गंभीर जखमी झाला आहे. या अपघाताचा थरारक CCTV व्हिडिओ समोर आला असून, त्यामध्ये कार पुलाच्या कठड्याला धडकून हवेत उडत खाली कोसळताना दिसत आहे.(Mumbai Coastal Road Crash 3 Dead)



नेमका अपघात कसा घडला?


मिळालेल्या माहितीनुसार, पहाटे सुमारे ५ वाजून २० मिनिटांच्या सुमारास ही दुर्घटना घडली. मरीन ड्राइव्हवरून हाजी अलीच्या दिशेने जाणारी BMW कार लोटस जेट्टीजवळ, लाला लजपतराय महाविद्यालयासमोर आली असता चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याचा प्राथमिक अंदाज आहे. CCTV फुटेजमध्ये कार भरधाव वेगात जाताना, पुलाच्या बाहेरील कठड्याला धडकताना आणि त्यानंतर उंच पुलावरून खाली कोसळताना दिसते. खाली सुरू असलेल्या बांधकामाच्या परिसरात कार आदळली. या धडकेमुळे वाहनाचे मोठे नुकसान झाले.(BMW Crash Mumbai)





तीन विद्यार्थ्यांचा मृत्यू, एकाची प्रकृती गंभीर


या BMW कारमध्ये चार जण प्रवास करत होते. अपघातानंतर सर्वांना तातडीने नायर रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी तिघांना मृत घोषित केले, तर चौथ्या तरुणावर गंभीर अवस्थेत उपचार सुरू आहेत. मृतांमध्ये २१ वर्षीय शानय गज्जल, १९ वर्षीय आदित्य जकासनिया आणि १७ वर्षीय धैर्य सेठ यांचा समावेश असल्याचे वृत्त आहे. जखमी तरुणाची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात आले आहे. हे तरुण अहमदाबादचे रहिवासी असून मुंबईत शिक्षण घेत होते, अशी माहिती समोर आली आहे.(Mumbai BMW Accident CCTV Video)



पोलिसांकडून तपास सुरू


प्राथमिक माहितीनुसार, भरधाव वेगामुळे चालकाचे नियंत्रण सुटल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. मात्र, अपघाताचे नेमके कारण अद्याप तपासाधीन आहे. पोलिसांकडून CCTV फुटेज आणि इतर पुराव्यांच्या आधारे पुढील तपास सुरू आहे.(BMW Crash Mumbai)

Comments
Add Comment

Mumbai Accident News: दहिसरमध्ये भीषण अपघात! भरधाव बाईक डिव्हायडरला धडकली; २ आयटी व्यावसायिकांचा मृत्यू

मुंबई: मुंबईमध्ये अपघाताचे सत्र पाहायला मिळत आहेत. कोस्टल रोडवर भरधाव BMW कारच्या भीषण अपघातानंतर दहिसर पूर्वेतही

BEST Bus Fire : मुलुंडमध्ये बेस्ट बस आणि ट्रॅव्हल बसची समोरासमोर धडक; बसच्या बोनेटला आग, चालक जखमी

मुंबई : मुंबईतील मुलुंड पश्चिम परिसरात रविवारी पहाटे बेस्ट बस आणि खासगी ट्रॅव्हल बसची समोरासमोर धडक होऊन अपघात

Ashish Shelar : काळाचौकी दुर्घटनेनंतर मंत्री आशिष शेलारांनी घेतली मृतांच्या कुटुंबीयांची भेट; गणेश मंडळांना सुरक्षेच्या नियमांचे पालन करण्याचे आवाहन

मुंबई : काळाचौकी महागणपती मंडळाच्या परिसरात घडलेल्या विजेच्या धक्क्याच्या दुर्घटनेनंतर सांस्कृतिक कार्य

Mumbai Kalachowki Electrocution : काळाचौकी प्रकरणातील स्टॉल चालकावर BNS अंतर्गत गुन्हा दाखल

मुंबई : मुंबईतील काळाचौकी परिसरात गणेशोत्सवादरम्यान घडलेल्या विजेच्या धक्क्याच्या दुर्घटनेत दोघांचा मृत्यू

Mumbai local Train : गणेश विसर्जनासाठी मुंबई लोकलच्या वेळापत्रकात मोठा बदल; 84 लोकलचा थांबा रद्द

मुंबई : गणेश विसर्जनाच्या दिवशी मुंबईतील लोकल प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी आहे. अनंत चतुर्दशीच्या दिवशी

Jogeshwari Ganeshotsav tragedy : मुंबईत गणेश विसर्जनाला गालबोट; जोगेश्वरीत विजेचा धक्का लागून 19 वर्षीय तरुणाचा मृत्यू

मुंबई : गणेशोत्सवाचा उत्साह सुरू असतानाच मुंबईत दोन वेगवेगळ्या ठिकाणी विजेच्या धक्क्याच्या घटना घडल्या आहेत.