वीजचोरी करणाऱ्या जीन्स वॉशिंग कंपनीविरुद्ध गुन्हा दाखल

कल्याण (वार्ताहर) : उच्चदाब ग्राहकांच्या (थ्री-फेज) वीज पुरवठा तपासणीसाठी मंडल स्तरावर स्थापन करण्यात आलेल्या विशेष पथकाने वीजचोरी पकडलेल्या जीन्स वाशिंग कंपनीविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. टिटवाळ्यातील गुरवली पाडा स्थित या कंपनीने मीटर बायपास करून तब्बल २५ लाख ८५ हजार रुपयांची वीजचोरी केल्याचे निष्पन्न झाले. जागामालक व कंपनीच्या चालकाविरुद्ध वीज कायदा २००३ च्या कलम १३५ अन्वये मुरबाड पोलिसांनी गुन्ह्याची नोंद केली आहे.


वीज ग्राहक विकास बबन दळवी व वापरकर्ता ब्रिजमोहन प्रजापती अशी याप्रकरणी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. पथकाने १७ जानेवारीला गुरवली पाड्यातील काळू नदी ब्रिजजवळील क्रमांक ५३६/१३ गाळाच्या वीजपुरवठ्याची तपासणी केली. सखोल तपासणी केली असता मीटरकडे येणारी केबल छतावर कट करून टॅपिंग केल्याचे आढळले. मीटर टाळून टॅपिंग केलेल्या केबलच्या साहाय्याने वीजचोरी सुरू असल्याचे दिसून आले. त्यानुसार वीजचोरीचे देयक भरण्याबाबत नोटीस बजावण्यात आली. मात्र विहित मुदतीत रकमेचा भरणा न झाल्याने दिलेल्या फिर्यादीनुसार मुरबाड पोलीस ठाण्यात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल झाला असून पोलीस निरिक्षक प्रसाद पांढरे पुढील तपास करीत आहेत.


या कारवाईत सहाय्यक अभियंते धनंजय पाटील, अभिषेक कुमार, कनिष्ठ अभियंता अपर्णा शेलार-सकपाळ, तंत्रज्ञ विजय बावणे, बाह्यस्त्रोत कर्मचारी जयेश वावरे यांनी सहकार्य केले.

Comments
Add Comment

Thane News : अनधिकृत गौण खनिज उत्खनन भोवले; ठाण्यात 52 जणांसह कंपन्यांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश

Thane News: ठाणे तालुक्यात अनधिकृत गौण खनिज उत्खनन, साठवणूक आणि वाहतूक केल्याप्रकरणी दंडाची रक्कम न भरणाऱ्या 52 जणांवर

'सत्तेसाठी बाळासाहेबांचा वापर'; उद्धव ठाकरेंवर आनंद परांजपे यांचा हल्लाबोल

ठाणे:  मुख्यमंत्री होण्यासाठी हिंदुत्व आणि बाळासाहेबांचे विचार सोडून काँग्रेससोबत युती केल्याबद्दल उद्धव

खासगी टँकरच्या पाण्याचे दर ठरवा, GPS ट्रॅकिंग सक्तीचे करा; निरंजन डावखरे यांची मागणी

शहरात सध्या १० टक्के पाणीकपात सुरू आहे. त्यामुळे अनेक भागात पाण्यासाठी नागरिकांची धावपळ सुरू आहे. याच

Thane News : कल्याण-डोंबिवली आणि उल्हासनगरकरांनो काळजी घ्या! 19 नोव्हेंबरच्या मध्यरात्रीपासून 24 तास पाणीपुरवठा बंद

ठाणे : महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने (MIDC) बारवी जलशुद्धीकरण प्रकल्पातील देखभाल आणि दुरुस्तीच्या कामासाठी

Mumbra Crime: मुंब्रा पोलिसांकडून डिजिटल अरेस्ट रॅकेटचा पर्दाफाश; 71 वर्षीय वृद्धाची 3.55 लाखांची फसवणूक

मुंब्रा पोलिसांनी डिजिटल अरेस्ट या एका मोठ्या सायबर खंडणी रॅकेटचा यशस्वीपणे पर्दाफाश केला असून, दोन संशयितांना

Thane Development Plan: ठाणे जिल्ह्यात शाळा-रुग्णालयांचा कायापालट; 800 कोटींचा विकास आराखडा

ठाणे: राज्याचे उपमुख्यमंत्री आणि ठाणे जिल्हा पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली ठाणे जिल्ह्यातील