ठाणे जिल्ह्यात ८८.८६ टक्के मतदान

ठाणे: कोकण विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी आज ठाणे जिल्ह्यात शांततेत मतदान झाले. जिल्ह्यात साधारणपणे ८८.८६ टक्के मतदान झाले. मतमोजणी गुरुवार २ फेब्रुवारीला सकाळी ८ वाजल्यापासून नवी मुंबईत सुरु होणार आहे, अशी माहिती शिक्षक मतदारसंघाचे सहायक निवडणूक निर्णय अधिकारी तथा ठाण्याचे जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांनी दिली.


कोकण विभाग शिक्षक मतदारसंघातील निवडणुकीची मतदान प्रक्रिया निर्भय व मुक्त वातावरणात पार पाडण्यासाठी मतदानाच्या दिवशी सर्व मतदान केंद्रांवर सूक्ष्म निरीक्षक यांची नियुक्ती करण्यात आली होती. तसेच मतदान केंद्रांवर व्हिडीओग्राफी व वेबकास्टींगद्वारे लक्ष ठेवण्यात आले होते, असे उपजिल्हा निवडणूक अधिकारी अर्चना कदम यांनी सांगितले.


मतदान संपल्यावर मतदान अधिकारी/ कर्मचारी यांच्यामार्फत सर्व मतपेट्या पोलीस बंदोबस्तासह जिल्हा मुख्यालय येथे एकत्रित करण्यात येऊन नंतर एकत्रितपणे त्या नवी मुंबईतील आगरी कोळी संस्कृती भवन, नेरुळ (पश्चिम) येथील मतमोजणीच्या ठिकाणी स्ट्राँग रुममध्ये जमा करण्यात येत आहेत.



१३ हजार ५९५ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला


कोकण विभाग शिक्षक मतदार संघात पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदूर्ग हे पाच जिल्हे समाविष्ट आहेत. कोकण विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी आज सकाळी ८ वाजेपासून ते ४ वाजेपर्यंत मतदान पार पडले. या निवडणुकीकरीता नव्याने तयार करण्यात आलेल्या मतदार यादीत नाव समाविष्ट असलेल्या शिक्षक मतदारांनी आज मतदानाचा हक्क बजावला. ठाणे जिल्ह्यातील एकूण २० मतदान केंद्रांवर मतदान प्रक्रिया पार पडली. अनेक ठिकाणी मतदारांनी सकाळपासून रांगा लावून मतदानाचा हक्क बजावला. ठाणे जिल्ह्यात एकूण १५ हजार ३०० शिक्षक मतदार होते. यामध्ये ६ हजार २९ पुरुष व ९ हजार २७१ स्त्री मतदारांचा समावेश आहे. आज झालेल्या मतदानात एकूण १३ हजार ५९५ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.
Comments
Add Comment

भिवंडीत खाटूश्याम मंदिरात महिला चोरट्यांचा डाव! दर्शनासाठी आलेल्या आजींचे 14 तोळे सोन्याचे दागिने लंपास

भिवंडी: भिवंडी तालुक्यातील ठाकराचा पाडा परिसरातील प्रसिद्ध खाटूश्याम मंदिरात देवाच्या दर्शनासाठी आलेल्या एका

ठाणे हादरले! पहाटे उथळसर परिसरात प्रसिद्ध बार अँड रेस्टॉरंटमध्ये भीषण आग; घटनेत सुदैवाने जिवितहानी नाही!

ठाणे: ठाणे शहरातून एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. शुक्रवारी, 13 नोव्हेंबर 2026 रोजी पहाटेच्या सुमारास ठाणे

ठाणेकरांनो पाणी जपून वापरा! आता सोमवारी 'या' भागांत 24 तास नळ कोरडे राहणार; वाचा संपूर्ण यादी

ठाणे: ठाणे शहरातील नागरिकांसाठी एक अत्यंत महत्त्वाची आणि चिंतेची बातमी समोर आली आहे. संभाव्य दुष्काळसदृश

ठाणे गावदेवी मार्केट आग दुर्घटना; सागर शिंदेंच्या पत्नीला अनुकंपा तत्त्वावर नोकरी

ठाणे : ठाण्यातील नौपाडा भागातील गोखले रोडवरील गावदेवी भाजी मार्केट इमारतीला 21 मे 2026 रोजी पहाटे तीन वाजताच्या

Thane Railway Station: ठाणेकरांचा रेल्वे प्रवास होणार सोपा! फलाट 5-6 वर नवा एस्केलेटर, फलाट 2 वर मोफत स्वच्छतागृह

Thane Railway Station: मध्य रेल्वेचे ठाणे हे प्रमुख आणि गर्दीचे स्थानक म्हणून ओळखले जाते. ठाण्यावरून पनवेल, सीएसएमटी, कर्जत,

Titwala Crime: मालमत्तेच्या वादातून मुलाने केला वडील आणि भावावर गोळीबार, टिटवाळ्यात खळबळ

मालमत्तेच्या वादातून एका तरुणाने स्वतःच्याच वडिलांवर आणि भावावर गोळीबार केल्याची धक्कादायक घटना टिटवाळ्यात