भिवंडीत खाटूश्याम मंदिरात महिला चोरट्यांचा डाव! दर्शनासाठी आलेल्या आजींचे 14 तोळे सोन्याचे दागिने लंपास

भिवंडी तालुक्यातील ठाकराचा पाडा येथील खाटूश्याम मंदिरात दर्शनासाठी आलेल्या एका 67 वर्षीय ज्येष्ठ महिलेच्या पिशवीतून 14 तोळे सोन्याचे दागिने चोरीला गेल्याची धक्कादायक घटना समोर आली होती. या प्रकरणी कोनगाव पोलिसांनी कसून तपास करत दोन महिला चोरट्यांना बेड्या ठोकल्या असून, त्यांच्याकडून संपूर्ण सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात यश मिळवले आहे.

भिवंडी: भिवंडी तालुक्यातील ठाकराचा पाडा परिसरातील प्रसिद्ध खाटूश्याम मंदिरात देवाच्या दर्शनासाठी आलेल्या एका 67 वर्षीय ज्येष्ठ महिलेला भामट्या महिला चोरट्यांनी लुटल्याची घटना घडली. गर्दीचा फायदा घेऊन तब्बल 14 तोळे सोन्याचे दागिने लांबवणाऱ्या दोन महिलांना कोनगाव पोलिसांनी जेरबंद केले आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, 10 नोव्हेंबर रोजी सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास 67 वर्षीय स्मिता रायचंद जिवानी या खाटूश्याम मंदिरात दर्शनासाठी आल्या होत्या. मंदिरामध्ये असलेल्या प्रचंड गर्दीचा आणि गोंधळाचा फायदा घेत चतुर महिला चोरट्यांनी त्यांच्या पिशवीतील पर्स अलगद लांबवली. त्या पर्समध्ये सोन्याचे मौल्यवान दागिने होते. जेव्हा स्मिता यांना आपली पर्स चोरीला गेल्याचे लक्षात आले, तेव्हा त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली. या प्रकरणी त्यांनी तात्काळ कोनगाव पोलीस ठाण्यात जाऊन रीतसर तक्रार दाखल केली.



पोलिसांची धाडसी कारवाई आणि सीसीटीव्हीचा वापर


गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन कोनगाव पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली. महिलांच्या शोधासाठी पोलिसांनी परिसरातील तब्बल 100 ते 105 सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तासनतास तपासले. या तांत्रिक तपासाच्या आणि गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी कल्याण पश्चिमेकडील मिलिंदनगर आणि गौरीपाडा रोड परिसरातून रेशमा संतोष कसबे आणि सखु किसन कांबळे या दोन महिलांना ताब्यात घेतले. पोलिसी खाक्या दाखवताच त्यांनी चोरीची कबुली दिली.


पोलिसांनी केलेल्या चौकशीत धक्कादायक माहिती समोर आली आहे. या दोन्ही महिला गर्दीच्या धार्मिक ठिकाणी किंवा जत्रेत जाऊन ज्येष्ठ महिलांना आपले मुख्य लक्ष्य बनवत असत. गर्दीचा फायदा घेऊन त्यांच्याकडील सोन्याचे दागिने, पर्स आणि रोख रक्कम लुटण्याची त्यांची सवय होती. पोलिसांनी या महिलांच्या ताब्यातून चोरीस गेलेले सर्वच्या सर्व 14 तोळे सोन्याचे दागिने सुरक्षितपणे हस्तगत केले आहेत. मंदिरासारख्या पवित्र ठिकाणी झालेल्या या चोरीमुळे भाविकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते, मात्र पोलिसांनी अवघ्या काही दिवसांतच या प्रकरणाचा छडा लावल्याने नागरिकांनी सुटकेचा श्वास सोडला आहे.

Comments
Add Comment

Western Railway: पश्चिम रेल्वेवरील वसई रोड आणि वैतरणा स्थानकांदरम्यान रात्रकालीन ब्लॉक, रविवारची स्थिती काय?

पालघर: पश्चिम रेल्वेवर येत्या शनिवारी आणि रविवारी रात्रकालीन मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळे

Eknath Shinde vs Rahul Gandhi: रोज नवा 'फेक नॅरेटिव्ह' रचायचा, हाच गांधी यांचा 'फुल-टाइम' उद्योग, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची खरमरीत टीका

मुंबई: राहुल गांधी यांना सध्या 'मोदी फोबिया'ने इतके पछाडले आहे, त्यांना उठता-बसता, जागता-झोपता फक्त नरेंद्र

Mumbai Local Mega Block:  15 नोव्हेंबरला लोकलचा मेगा ब्लॉक; ठाणे-कल्याणसह पनवेल-वाशी मार्गावर वाहतुकीत बदल

Mumbai Local Mega Block: मध्य रेल्वेच्या मुंबई विभागात, विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे करण्यासाठी दिनांक 15 नोव्हेंबर

Mumbai Local: 26 ऑक्टोबरच्या मध्य रेल्वेवरील कांजूरमार्ग स्थानकावरील दुर्घटनेमागील नेमकं कारण काय? रेल्वेचा प्राथमिक निष्कर्ष समोर

मुंबई: कांजुरमार्ग रेल्वे स्थानकाजवळ सिग्नलिंग आणि दूरसंचार (S&T) यंत्रणेमध्ये बिघाड झाल्यामुळे गेल्या

Apple oxidation process : सफरचंद कापल्यावर काही वेळात काळं पडतं? रंग बदलू नये म्हणून काय करावं?

Apple oxidation process : सफरचंद हे फळ अतिशय आरोग्यदायी आहे. घरात कोणी आजारी असेल किंवा कोणत्या आजारी व्यक्तीला बघायला जातो

Microsoft 365 ची सेवा पुन्हा रुळावर! Outlook सेवा पूर्ववत; जगभरातील युजर्सना मोठा दिलासा!

मुंबई: नोकरदारांसाठी दिलासादायक बातमी आहे. गेल्या 18 तासांपासून बंद असलेलं मायक्रोसॉफ्ट आऊटलूक (Microsoft Outlook)ची सेवा