‘महाराष्ट्र शाहीर’ चित्रपटात राज्यगीत...

मुंबई: राज्य सरकारने काही दिवसांपूर्वी ‘जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा’ या गाण्याला राज्यगीताचा दर्जा मिळाला. त्यावेळी ‘महाराष्ट्र शाहीर’ या आगामी चित्रपटामध्ये ‘जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा’ हे गीत असणार आहे, अशीही माहिती केदार शिंदे यांनी दिली होती. त्यांनी सांगितलं की, अजय-अतुल हे या गाण्याला संगीतबद्ध करणार आहेत. ‘जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा’ या गाण्याला राज्यगीताचा दर्जा मिळाल्यानंतर केदार शिंदे यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली होती. या पोस्टमध्ये त्यांनी शाहीर साबळे यांच्यासोबतचा एक फोटो शेअर केला.


शाहीर साबळे यांचे जन्मशताब्दी वर्ष ३ सप्टेंबर २०२२ ते ३ सप्टेंबर २०२३ दरम्यान साजरे होत आहे. त्यांच्या जन्मशताब्दी वर्षात रिलीज होणाऱ्या ‘महाराष्ट्र शाहीर’ या चित्रपटाची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत. नुकताच केदार शिंदे यांनी महाराष्ट्र शाहीर चित्रपटाचा एक खास व्हीडिओ सोशल मीडियावर शेअर केला. या व्हीडिओला त्यांनी दिलेल्या कॅप्शनने अनेकांचे लक्ष वेधले. केदार शिंदे यांनी सोशल मीडियावर शेअर केलेल्या व्हीडिओमध्ये अंकुश चौधरी हा शाहीर साबळे यांच्या भूमिकेत दिसत आहे. या व्हीडिओला त्यांनी कॅप्शन दिले आहे, ‘फडकेल नव्याने भगवा, महाराष्ट्र पुन्हा गर्जेल, जनतेचा बुलंद आवाज... लेखणीतूनी बरसेल...देऊनी डफावर थाप... ललकारत होते जाहीर...अर्पितो तुम्हाला तुमचे... तुमचाच... ‘महाराष्ट्र शाहीर’... शाहीर साबळे ह्यांची भव्य जीवनगाथा २८ एप्रिल २०२३ पासून चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.


‘महाराष्ट्र शाहीर’ या चित्रपटाचे दिग्दर्शन केदार शिंदे यांनीच केले आहे. तर या चित्रपटाची निर्मिती संजय छाब्रिया आणि बेला केदार शिंदे यांनी केली आहे. या चित्रपटात अंकुशसोबतच अतुल काळे, अमित डोलावत, सना केदार शिंदे हे कलाकार देखील प्रमुख भूमिका साकारणार आहेत. अजय-अतुल यांनी महाराष्ट्र शाहीर या चित्रपटामधील गाण्यांचे संगीत दिग्दर्शन केले आहे.

Comments
Add Comment

Box Office Collection: सिद्धार्थ-तमन्नाच्या ‘द वन’ आणि नानीच्या ‘द पॅराडाईज’ चित्रपटाची कोट्यवधींची कमाई!

मुंबई: चित्रपटांच्या विश्वात सध्या बॉक्स ऑफिसवर सुगीचे दिन सुरू असून, प्रेक्षकांचा चित्रपत्रांना भरघोस

Rakul Preet Singh News: रकुल प्रीत सिंग, निर्माता वासू भगनानीशी संबंधित 12 ठिकाणी IT चे छापे, तपास सुरू; नेमकं प्रकरण काय?

मुंबई: आयकर विभागाच्या मुंबई शाखेने अभिनेत्री रकुल प्रीत सिंग सोबत तिचे सासरे आणि निर्माते वाशु भगनानी यांच्या

Ranbir Kapoor Angry: "खूपच बोलतोयस तू..." पापाराझीचं वागणं पाहून रणबीर कपूर भडकला; Video Viral

मुंबई: अभिनेता रणबीर कपूर सध्या 'रामायण' आणि 'लव्ह अँड वॉर' या अपकमिंग चित्रपटामुळे चांगलाच प्रकाशझोतात आहे. सध्या

Madhuri Dixit : माधुरीच्या ‘कोण होणार करोडपती’ची सातासमुद्रापार क्रेझ; चाहत्यांची प्रतीक्षा संपली, तारीख जाहीर

मुंबई : बॉलिवूडची ‘धकधक गर्ल’ माधुरी दीक्षित आता छोट्या पडद्यावर एका अगदी नव्या आणि रंजक भूमिकेतून

Anjali Anand News: “वजन कमी कर, त्यानंतर...”, कास्टिंग डायरेक्टरने अभिनेत्रीला दिलेला सल्ला; म्हणाली, “अभिनय सोडण्याचा…”

मुंबई: अभिनेत्री म्हटल्यावर आपल्या नजरेसमोर पटकन स्लिम- ट्रीम असलेली अभिनेत्री नजरेसमोर येते. पण त्याला अपवाद

Ramayana Movie Update : 'रामायण' चित्रपटातील 'रॉकिंग स्टार' यशचा रावणाचा राजेशाही लूक प्रदर्शित; प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला!

मुंबई : चित्रपटसृष्टीतील अत्यंत महत्वाकांक्षी आणि बहुप्रतिक्षित असा दिग्दर्शक नितेश तिवारी यांचा आगामी