Anjali Anand News: “वजन कमी कर, त्यानंतर...”, कास्टिंग डायरेक्टरने अभिनेत्रीला दिलेला सल्ला; म्हणाली, “अभिनय सोडण्याचा…”

मुंबई: अभिनेत्री म्हटल्यावर आपल्या नजरेसमोर पटकन स्लिम- ट्रीम असलेली अभिनेत्री नजरेसमोर येते. पण त्याला अपवाद अभिनेत्री अंजली आनंद आहे. अभिनय आणि डान्समधून प्रकाशझोतात आलेल्या अंजलीला इंडस्ट्रीमध्ये स्वत:चं स्थान निर्माण करण्यासाठी खूप स्ट्रगल करावं लागलं. तिने बचत केलेले पैसे सुद्धा संपले होते, सोबतच तिने अभिनय सोडून परदेशामध्ये सेटल होण्याचा निर्णय घेतला होता. 'डब्बा कार्टेल', 'रात जवानी है', 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' अशा वेगवेगळ्या प्रोजेक्टमधून अंजली चाहत्यांच्या भेटीला आली आहे. नुकतंच बॉलिवूड दिग्दर्शिका फराह खान हिने अंजलीच्या मुंबईतील घरी भेट दिली. यावेळी अंजलीने फराहला तिच्या संघर्षाच्या दिवसांबद्दल सांगितले.



बॉलिवूड दिग्दर्शक आणि निर्माता करण जौहरच्या एका चित्रपटामध्ये अंजली आनंदला काम करण्याची संधी मिळाली होती. त्या चित्रपटानंतर अंजलीसाठी इंडस्ट्रीमध्ये काम करण्याचे अनेक संधी तिला उपलब्ध झाली. त्याचदरम्यान तिला 'धमाल 4' हा सुपरहिट चित्रपट सुद्धा मिळाला. या सुपरहिट चित्रपटामध्ये अंजलीने महत्त्वाची भूमिका साकारली आहे. फराह खानच्या ब्लॉगमध्ये अंजलीने तिच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्यातील अनेक किस्से शेअर केले होते. अंजली ब्लॉगमध्ये म्हणाली की, "2020 हे वर्ष माझ्या आयुष्यातील सर्वात कठीण काळ होता. मी देश सोडून आणि अभिनय क्षेत्र सोडून जाण्याच्या विचारात होते. मला कुठूनही चित्रपटाच्या ऑफर येत नव्हत्या. वैश्विक महामारी होती. माझी सर्व सेव्हिंग्स सुद्धा संपायला आली होती. मी 6 महिने एकटीच भाड्याच्या घरात राहत होते."






"मला आठवतंय, माझ्या मैत्रिणी मला गोव्याला घेऊन गेल्या होत्या. त्याच दिवशी मला कास्टिंग डायरेक्टर शानू शर्मा यांचा मेसेज आला होता. 'बेबी... मला फोन कर', असा त्यांनी मला मेसेज सेंड केला होता." त्यानंतर पुढे अंजली म्हणाली की, "मी अनेकदा शानूला भेटलेय. मी केव्हाही तिला भेटते तेव्हा ती मला एकच वाक्य म्हणायची, 'तू वजन कमी कर, त्यानंतर आपण काहीतरी करूया'. खरंतर मला सतत रिजेक्शन मिळत असल्यामुळे मी जवळपास फिल्म इंडस्ट्रीमध्ये काम करण्याचं स्वप्नच सोडून दिलं होतं." अंजलीच्या आईने सुद्धा सांगितले की, जेव्हा अंजली ऑडिशनसाठी घरातून जायची, त्यावेळी तिला अनेकदा वाटायचे की कदाचित यावेळी तिची निवड होणार नाही. ती मनातल्या मनातच म्हणायची, "यावेळी सुद्धा अंजलीची निवड होणार नाही."



"दिग्दर्शक आणि निर्माते करण जौहर यांना भेटायला जाणार असल्याचं मी माझ्या आईला सांगितलं होतं. तर तिच्या सुद्धा मनामध्ये शंका होती. ती म्हणाली, 'तू खरंच करण जोहरला भेटायला चाललीये? तो तुला भेटायला बोलवेल?' तेव्हा मी आईला म्हणाले की, 'अगं हो खरंच, मी खरंच करण जोहरला भेटायला चालले आहे.' करणला माझा प्रोफाईल आणि माझी ऑडिशन खूप आवडली होती. त्यानंतर मला 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' चित्रपट मिळाला.", असं तिने फराहच्या ब्लॉगमध्ये सांगितलंय. अंजलीच्या आईने नंतर स्पष्ट केले की, तिची ती टिप्पणी काळजीपोटी होती, कारण इंडस्ट्रीमध्ये अंजलीला कोणाचाही पाठिंबा किंवा गॉडफादर नव्हता. आज जरीही अंजलीचा इंडस्ट्रीमध्ये कोणीही गॉडफादर नसला तरीही तिने आपल्या कतृत्वाच्या जोरावर स्वत:चे स्थान प्रस्थापित केले आहे.

Comments
Add Comment

Madhuri Dixit : माधुरीच्या ‘कोण होणार करोडपती’ची सातासमुद्रापार क्रेझ; चाहत्यांची प्रतीक्षा संपली, तारीख जाहीर

मुंबई : बॉलिवूडची ‘धकधक गर्ल’ माधुरी दीक्षित आता छोट्या पडद्यावर एका अगदी नव्या आणि रंजक भूमिकेतून

Ramayana Movie Update : 'रामायण' चित्रपटातील 'रॉकिंग स्टार' यशचा रावणाचा राजेशाही लूक प्रदर्शित; प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला!

मुंबई : चित्रपटसृष्टीतील अत्यंत महत्वाकांक्षी आणि बहुप्रतिक्षित असा दिग्दर्शक नितेश तिवारी यांचा आगामी

Awarapan 2 OTT Release : 'इम्रान हाश्मी'चा सुपरहिट सिनेमा आता घरबसल्या पाहता येणार! ‘आवारापन 2’ची OTT रिलीज डेट जाहीर

मुंबई : 'इम्रान हाश्मी'च्या चाहत्यांसाठी मोठी बातमी आहे. थिएटरमध्ये दमदार कमाई करणारा ‘आवारापन 2’ आता OTTवर दाखल

Prahaar Trailer: उज्ज्वल निकम यांच्या बायोपिकचा ट्रेलर मुंबईच्या ऐतिहासिक ठिकाणी रिलीज होणार, प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला...

मुंबई: गेल्या वर्षी बॉक्स ऑफिसवर अनेक बायोपिकने चांगलाच धुमाकूळ घातला. त्या व्यक्तीच्या आयुष्य रूपेरी पडद्यावर

The Paradise Box Office : नानीच्या ‘द पॅराडाईज’ची बॉक्स ऑफिसवर घसरण; 2 दिवसांतच कमाईचा वेग मंदावला

मुंबई : नानी अभिनीत ‘द पॅराडाईज’ चित्रपटाच्या बॉक्स ऑफिस कमाईत दुसऱ्या दिवशी मोठी घट झाली आहे. बुधवारी झालेल्या

Panchayat Series: 'मिर्झापूर'नंतर 'पंचायत' सीरीजचाही चित्रपट बनणार का? 'प्रधान जी'ने दोन वाक्यातच सर्व काही सांगितलं...

मुंबई: ओटीटी गाजवल्यानंतर बॉक्स ऑफिसवर 'मिर्झापूर: द मुव्ही' चित्रपट रिलीज झाला होता. ओटीटी प्रमाणेच त्याला बॉक्स