अल निनोच्या संकटासाठी राज्य सरकार सज्ज: देवेंद्र फडणवीस

पुणे: अल निनोच्या संकटासाठी राज्य सरकार सज्ज असून पाणी फाऊंडेशन, इतर संस्था आणि राज्य सरकार भरीव काम करण्याच्या तयारीत असल्याचे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.


ते म्हणाले, "महाराष्ट्रातील ५० टक्के भागात कमी पाऊस पडतो. हा भाग अवर्षणप्रवण आहे. त्यातच आता अनेक हवामान संस्था हे वर्ष अल निनोचे असू शकते असा अंदाज व्यक्त करत आहेत. जर तसे असेल तर आपल्याला जलसंधारणाशिवाय पर्याय नाही. पाण्याचा थेंब न थेंब साठवावा लागणार आहे. वैरण विकास करावा लागेल. त्यादृष्टीने पाणी फाउंडेशन चांगले काम करत आहेत. त्यामुळे पाणी फाउंडेशन आणि आणखीही चांगले काम करणाऱ्या संस्थांना बरोबर घेऊन आम्ही काम करणार आहोत."


फडणवीस यांनी पुण्यात प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले, ''जलयुक्त शिवार योजनेत २० हजार गावांत जलसंधारणाची कामे केली. त्यातून ३७ लाख हेक्टर जमीन सिंचनाखाली आली. त्यानंतर ही योजना बंद केली होती. आता आम्ही ही योजना पुन्हा सुरू केली आहे. या योजनेच्या पहिल्या टप्प्यात पाच हजार गावे घेतली आहेत. या गावांमध्ये जलसंधारणाची कामे केली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले''.


दरम्यान, सध्या राज्यात अवकाळी पावसाने शेतीचं मोठं नुकसान केलं आहे. मागील दोन ते तीन दिवसापासून राज्यात अनेक ठिकणी अवकाळी पावसासह जोरदार गारपीट झाली आहे. त्यामुळे राज्यात थंड वातावरण झाले होते. परंतु या अवकाळी नंतर राज्यात उन्हाचा चटका वाढणार वाढणार आहे. त्यामुळे राज्यातील अनेक भागात उष्णतेची लाट येण्याचा इशारा भारतीय हवामान विभागाने दिला आहे.

Comments
Add Comment

Chhatrapati Sambhajinagar : पावसाची प्रतीक्षा संपली, पण काळाचा घाला! मराठवाड्यात वीज पडून ५ जणांचा मृत्यू, शेतकऱ्यांमध्ये संमिश्र वातावरण

छत्रपती संभाजीनगर : गेल्या अनेक दिवसांपासून पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या मराठवाड्यातील काही भागांत अखेर

Mumbai Goa Highway : मुंबई-गोवा महामार्गावर काळजाचा ठोका चुकवणारा अपघात! केमिकल टँकर २५० फूट दरीत कोसळला

Mumbai Goa Highway : मुंबई-गोवा महामार्गावरील खेड तालुक्यातील धोकादायक भोस्ते घाटात केमिकलने भरलेला टँकर भीषण अपघातात दरीत

Maharashtra Weather Update : महाराष्ट्रात १९ सप्टेंबरला पावसाचा जोर वाढणार? १३ जिल्ह्यांना यलो अलर्ट; वादळी वाऱ्यांसह पावसाचा अंदाज

मुंबई : महाराष्ट्रात १९ सप्टेंबर रोजी काही भागांत पावसाचा जोर राहण्याची शक्यता आहे. हवामान विभागाच्या

ST Bus Accident : गडचिरोलीत एसटी बसचा भीषण अपघात! अनियंत्रित बस उलटून २०-२५ प्रवासी गंभीर जखमी

गडचिरोली : गडचिरोली-चामोर्शी मार्गावर शिवणी (Gadchiroli Bus Accident) नदीच्या पुलाजवळ एसटी बसचा एक अत्यंत दुर्दैवी अपघात घडला

FDA चा पुण्यातील 'द न्यू पुना क्लब'ला दणका; फरशीवर उंदरांची विष्ठा, अस्वच्छता पाहून अधिकारीही चक्रावले

पुणे: महाराष्ट्रामध्ये अन्न- औषध प्रशासनाचे अधिकारी सध्या सक्रिय असल्याचे पाहायला मिळत आहे. सणासुदीनिमित्त

Pune Traffic News: पुणेकरांनो, गणपती दर्शनासाठी जाताय? ‘या’ ६ रस्त्यांवर पार्किंगला बंदी!

पुणे: गणेशोत्सवाच्या काळामध्ये पुणेकरांना वाहतूकीच्या समस्या उद्भवण्याची शक्यता आहे. जर तुम्ही पुण्यामध्ये