Chhatrapati Sambhajinagar : पावसाची प्रतीक्षा संपली, पण काळाचा घाला! मराठवाड्यात वीज पडून ५ जणांचा मृत्यू, शेतकऱ्यांमध्ये संमिश्र वातावरण

छत्रपती संभाजीनगर : गेल्या अनेक दिवसांपासून पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या मराठवाड्यातील काही भागांत अखेर पावसाने हजेरी लावली आहे. गुरुवारी (१७ सप्टेंबर) झालेल्या पावसामुळे काही भागांतील शेतकऱ्यांना दिलासा मिळाला असला, तरी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात वीज पडण्याच्या दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये एका दाम्पत्यासह पाच जणांचा मृत्यू झाला. या दुर्घटनांमध्ये अन्य चार जण जखमी झाले आहेत.(Marathwada Lightning Strike)



मराठवाड्यातील ३१ महसूल मंडळांत जोरदार पाऊस


विभागीय आयुक्त कार्यालयाच्या अहवालानुसार, मराठवाड्यातील बीड, लातूर, नांदेड, परभणी आणि हिंगोली या पाच जिल्ह्यांतील ३१ महसूल मंडळांमध्ये गुरुवारी एका दिवसात ६५ मिलिमीटरपेक्षा अधिक पावसाची नोंद झाली. परभणी जिल्ह्यातील झरी महसूल मंडळात सर्वाधिक १२६ मिलिमीटर पाऊस झाला. त्यानंतर बीड जिल्ह्यातील परळी तालुक्यातील सिरसाळा येथे ११२.५ मिलिमीटर, तर परभणीतील पेडगाव येथे १११.५ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांमध्ये गुरुवारी सरासरी ५.४ ते ४१.८ मिलिमीटर पाऊस पडला.(Marathwada Lightning Strike)



वीज पडून पाच जणांचा दुर्दैवी मृत्यू


छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील कन्नड तालुक्यातील वाघुळखेडा येथे पावसापासून बचाव करण्यासाठी झाडाखाली थांबलेल्या तीन जणांवर वीज कोसळली. या दुर्घटनेत हमिदा सय्यद, तस्लीम सय्यद आणि अलमिरा सय्यद यांचा मृत्यू झाला. अन्य तीन जण जखमी झाले. दुसरी घटना सिल्लोड तालुक्यातील दहिगाव येथे घडली. पावसापासून बचाव करण्यासाठी झोपडीमध्ये आसरा घेतलेल्या मनोहर दुधे आणि त्यांच्या पत्नी पार्वताबाई यांच्यावर वीज कोसळली. या दुर्घटनेत दोघांचा मृत्यू झाला, तर त्यांचा मुलगा पंढरीनाथ जखमी झाला.(Chhatrapati Sambhajinagar)



पावसाची तूट कायम


मराठवाड्यातील पावसाची परिस्थिती अद्याप चिंताजनक आहे. पावसाळ्यात या विभागात सरासरी ६७९.५ मिलिमीटर पाऊस अपेक्षित असतो. मात्र, आतापर्यंत ४२३.३ मिलिमीटर म्हणजेच अपेक्षित पावसाच्या ६२.३ टक्के पावसाची नोंद झाली आहे. त्यामुळे पावसाची तूट ३७.३ टक्के आहे. दीर्घ खंडानंतर झालेल्या पावसामुळे काही भागांतील खरीप पिकांना दिलासा मिळण्याची आशा निर्माण झाली असली, तरी शेती आणि पाणीटंचाईचे संकट पूर्णपणे दूर झालेले नाही.(Chhatrapati Sambhajinagar)

Comments
Add Comment

Mumbai Goa Highway : मुंबई-गोवा महामार्गावर काळजाचा ठोका चुकवणारा अपघात! केमिकल टँकर २५० फूट दरीत कोसळला

Mumbai Goa Highway : मुंबई-गोवा महामार्गावरील खेड तालुक्यातील धोकादायक भोस्ते घाटात केमिकलने भरलेला टँकर भीषण अपघातात दरीत

Maharashtra Weather Update : महाराष्ट्रात १९ सप्टेंबरला पावसाचा जोर वाढणार? १३ जिल्ह्यांना यलो अलर्ट; वादळी वाऱ्यांसह पावसाचा अंदाज

मुंबई : महाराष्ट्रात १९ सप्टेंबर रोजी काही भागांत पावसाचा जोर राहण्याची शक्यता आहे. हवामान विभागाच्या

ST Bus Accident : गडचिरोलीत एसटी बसचा भीषण अपघात! अनियंत्रित बस उलटून २०-२५ प्रवासी गंभीर जखमी

गडचिरोली : गडचिरोली-चामोर्शी मार्गावर शिवणी (Gadchiroli Bus Accident) नदीच्या पुलाजवळ एसटी बसचा एक अत्यंत दुर्दैवी अपघात घडला

FDA चा पुण्यातील 'द न्यू पुना क्लब'ला दणका; फरशीवर उंदरांची विष्ठा, अस्वच्छता पाहून अधिकारीही चक्रावले

पुणे: महाराष्ट्रामध्ये अन्न- औषध प्रशासनाचे अधिकारी सध्या सक्रिय असल्याचे पाहायला मिळत आहे. सणासुदीनिमित्त

Pune Traffic News: पुणेकरांनो, गणपती दर्शनासाठी जाताय? ‘या’ ६ रस्त्यांवर पार्किंगला बंदी!

पुणे: गणेशोत्सवाच्या काळामध्ये पुणेकरांना वाहतूकीच्या समस्या उद्भवण्याची शक्यता आहे. जर तुम्ही पुण्यामध्ये

Yavatmal Crime News : घरासमोरची कार ठरली चिमुकल्यासाठी काळ, चिमुकल्याचा उपचारादरम्यान मृत्यू ; नेमकं घडलं काय ?

Yavatmal Crime News : घरासमोर खेळत असलेल्या अवघ्या चार वर्षांच्या चिमुकल्याचा कारमध्ये अडकून दुर्दैवी मृत्यू झाल्याची