गडचिरोली : गडचिरोली-चामोर्शी मार्गावर शिवणी (Gadchiroli Bus Accident) नदीच्या पुलाजवळ एसटी बसचा एक अत्यंत दुर्दैवी अपघात घडला आहे. गडचिरोली डेपोतून पोटेगावच्या दिशेने प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या राज्य परिवहन महामंडळाच्या बसचा अपघात होऊन बस थेट रस्त्याखालील खोल भागात उलटली. या भीषण दुर्घटनेत साधारण २० ते २५ प्रवासी जखमी झाले असून, त्यातील २ ते ३ जणांना गंभीर दुखापत झाल्याची माहिती समोर येत आहे.
रस्त्याच्या अपूर्ण कामामुळे चालकाचे नियंत्रण सुटले
जखमींवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू
अपघाताचा मोठा आवाज होताच परिसरातील स्थानिक नागरिकांनी तात्काळ घटनास्थळाकडे धाव घेतली आणि बसमध्ये अडकलेल्या प्रवाशांना बाहेर काढण्याचे मदतकार्य सुरू केले. या दुर्घटनेत अनेक प्रवाशांच्या डोक्याला, चेहऱ्याला आणि हाता-पायाला लहान-मोठ्या दुखापती झाल्या आहेत. घटनेची माहिती मिळताच रुग्णवाहिका मागवून सर्व जखमींना गडचिरोलीतील जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे, जिथे त्यांच्यावर वैद्यकीय उपचार सुरू आहेत.
पोलीस प्रशासन घटनास्थळी दाखल
अपघाताची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांनी तातडीने घटनास्थळी पोहोचून अपघातग्रस्त भागातील वाहतूक सुरळीत केली. पोलिसांनी या घटनेची नोंद घेतली असून, अपघाताचे नेमके कारण आणि रस्त्याच्या कामातील निष्काळजीपणा या सर्व बाजूंचा अधिक तपास पोलीस करत आहेत.