जोगेश्वरीत फर्निचर मार्केटला लागलेल्या आगीत २०-२५ दुकाने जळून खाक

मुंबई : मुंबईच्या पश्चिम उपनगरातील जोगेश्वरी पश्चिम जवळील ओशिवरा घास कम्पाऊंडमधील फर्निचर गोडाऊनला लागलेली आग आटोक्यात आली आहे. सध्या अग्निशमन दलाच्या जवानांकडून फायर कूलिंगचे काम सुरु आहे.


आग आटोक्यात आली असली तर यात तब्बल २० ते २५ फर्निचरची दुकाने जळून खाक झाली आहेत. मात्र, ही आग नेमकी कशामुळे लागली याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.



ओशिवरा घास कम्पाऊंडमधील फर्निचर गोडाऊनला आज (१३ मार्च) सकाळी अकराच्या सुमारास ही भीषण आग लागली. लाकूड गोदाम आणि फर्निचरचे शॉप असल्यामुळे काही वेळातच आगीने पेट घेतला होता. अग्निशमन दलाकडून लेव्हल तीनच्या आगीचा कॉल देण्यात आला होता. सुदैवाने ही आग आटोक्यात आली आहे. अग्निशमन दलाच्या जवानांनी दीड तास शर्थीचे प्रयत्न करुन आगीवर नियंत्रण मिळवले.


जोगेश्वरीतील ओशिवरा येथे फर्निचरची मोठी बाजारपेठ आहे. या आगीत सकाळच्या दरम्यान लाकूड गोदामाला भीषण आग लागली. या आगीने काही वेळातच रौद्र रुप धारण केले आणि परिसरात एकच खळबळ उडाली. या घटनेची माहिती मिळताच, अग्निशमन दलाच्या गाड्या त्वरित घटनास्थळी दाखल झाल्या. ही आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाच्या तब्बल १२ ते १४ गाड्यांचा ताफा घटनास्थळावर पोहोचला होता. तब्बल दीड तासांमध्ये आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाला यश आले.





या आगीचा व्हिडीओ मराठमोळी अभिनेत्री क्रांती रेडकरने आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन शेअर केला आहे. तरी, या व्हिडीओमध्ये आगीचे प्रमाण किती भीषण आहे हे दिसून येते.


मुख्य रस्त्यावरच ही आगीची घटना घडली असल्यामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी देखील या ठिकाणी झाल्याचे पाहायला मिळाले. वाहतूक पोलिसांनी काहीवेळासाठी एस. व्ही. रोड वाहतुकीसाठी बंद केला होता. या ठिकाणी असणारे दुकानदार या भीषण आगीपासून आपल्‍या दुकानातील माल वाचवण्यासाठी ते बाहेर काढताना धडपड असल्‍याचे चित्र या ठिकाणी पाहायला मिळाले.

Comments
Add Comment

Thane Crime: गुटखा तस्करीचा पर्दाफाश! कळवा पोलिसांकडून दोन वॅगनआरसह लाखोंचा मुद्देमाल जप्त

ठाणे: कळवा पोलिसांनी गुटख्याचा अवैध पद्धतीने व्यापार करणाऱ्यांवर मोठी कारवाई केलेली आहे. पोलिसांनी सापळा रचून

Mumbai Traffic: सिद्धिविनायकाच्या जाणाऱ्या भाविकांसाठी महत्त्वाची बातमी, मंदिर परिसरात वाहतुकीचे निर्बंध

मुंबई: मुंबईतील प्रभादेवी परिसरामध्ये असलेल्या सिद्धिविनायक मंदिराच्या परिसरामध्ये २९ सप्टेंबरला वाहतूक

Mumbai Metro Accident: मेट्रोच्या बांधकामावेळी विक्रोळीत आणखी एक बळी, लोखंडी बॅरिकेट अंगावर पडून एकाचा मृत्यू

मुंबई: मुंबईतील विक्रोळीमध्ये मेट्रोच्या कामावेळी एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. विक्रोळीतील

IIT Bombay student suicide news : ChatGPT चा वापर अन् दुर्दैवी अंत! IIT बॉम्बेच्या विद्यार्थ्याच्या आत्महत्येने खळबळ; नक्की काय घडलं ?

मुंबई : IIT बॉम्बेचा विद्यार्थी साहिल वाकोडे याच्या दुर्दैवी आत्महत्येच्या प्रकरणाला आता एक नवीन वळण मिळालं आहे.

IIT Mumbai : 'आयआयटी मुंबई'तील विद्यार्थ्याच्या मृत्यूनंतर मानसिक आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर; परीक्षेतील ChatGPT प्रकरण केंद्रस्थानी

मुंबई : आयआयटी मुंबईतील ऊर्जा विज्ञान आणि अभियांत्रिकी विभागातील दुसऱ्या वर्षाचा विद्यार्थी साहिल वाकोडे याचा

Mumbai Municipal Corporation : चौदा फुटाच्या वर झोपड्यांचे बांधकाम, स्वतः तोडा नाहीतर महापालिकेचा हातोडा

१ ऑक्टोबर पासून महापालिकेची थेट कारवाई मुंबई (विशेष प्रतिनिधी) : येत्या १ ऑक्टोबर ते ३१ डिसेंबर २०२६ या कालावधीत