Mumbai Municipal Corporation : चौदा फुटाच्या वर झोपड्यांचे बांधकाम, स्वतः तोडा नाहीतर महापालिकेचा हातोडा

१ ऑक्टोबर पासून महापालिकेची थेट कारवाई


मुंबई (विशेष प्रतिनिधी) : येत्या १ ऑक्टोबर ते ३१ डिसेंबर २०२६ या कालावधीत बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाकडून झोपडपट्टी परिसरातील अनधिकृत बांधकामांविरोधात विशेष मोहीम आयोजित करण्यात येत आहे. या अंतर्गत, १४ फूट आणि त्यापेक्षा अधिक उंचीच्या झोपड्यांवर कारवाई करण्यात येईल. तत्पूर्वी, झोपडपट्टी क्षेत्रातील अनधिकृत बांधकामे तिथे वास्तव्यास असलेल्या संबंधित रहिवाश्यांनी स्वतःहून तात्काळ तोडावीत अन्यथा कठोर कारवाई करण्यात येईल, असे आवाहन मुंबई महानगरपालिका प्रशासनाकडून करण्यात येत आहे. (Mumbai Municipal Corporation)


मुंबई महानगरपालिका आयुक्त अश्विनी भिडे यांच्या निर्देशांनुसार, अतिरिक्त आयुक्त (शहर) प्राजक्ता वर्मा - लवंगारे यांच्या मार्गदर्शनात, सह आयुक्त (दक्षता) देवेंदर सिंग यांच्या नेतृत्वात अनधिकृत बांधकामांविरोधात कारवाई केली जात आहे. याच अनुषंगाने, झोपडपट्टी परिसरातील अनधिकृत बांधकामांचे निष्कासन करण्यासाठी या मोहिमेचे आयोजन करण्यात येत आहे. (Mumbai Municipal Corporation)



मुंबई शहर आणि उपनगरात एकूण २ लाख २३ हजार १५० झोपड्या आहेत. त्यापैकी ३९ हजार १११ झोपड्या १४ फूट आणि त्यापेक्षा अधिक उंचीच्या असल्याचे निर्दशनास आले आहे. यापैकी ३ हजार ३४८ झोपड्या शहर विभाग, ४ हजार ५३६ झोपड्या पश्चिम उपनगरे आणि ३१ हजार २२७ झोपड्या पूर्व उपनगरांत स्थित आहेत. दरम्यान, ४ हजार ५८४ झोपड्यांवर यापूर्वी निष्कासनाची कारवाई करण्यात आली आहे. ६११ झोपड्यांना नोटीस बजावण्यात आल्या आहेत. उर्वरित झोपड्यांत वास्तव्यास असलेल्या रहिवाश्यांनी संबंधित बांधकामे स्वतःहून तात्काळ निष्कासित करावीत अन्यथा त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल, असे महानगरपालिका प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात येत आहे. (Mumbai Municipal Corporation)



दरम्यान, मुंबईत अनधिकृत बांधकामांविरोधात महानगरपालिकेच्या विविध प्रशासकीय विभागांकडून (वॉर्ड) सातत्याने कारवाई सुरू आहे. दिनांक २४ ऑगस्ट ते १५ सप्टेंबर २०२६ या कालावधीत एकूण १२८ अनधिकृत बांधकामांवर निष्कासनाची कारवाई करण्यात आली. तर, १४० अनधिकृत बांधकामांविरोधात कारवाई नियोजित आहे. तथापि, नागरिकांनी अनधिकृत बांधकामे करू नयेत तसेच अशाप्रकारचे बांधकाम केले असल्यास ते स्वतःहून तात्काळ हटवावेत. अन्यथा, त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल, असे प्रशासनाकडून कळविण्यात येत आहे. (Mumbai Municipal Corporation)

Comments
Add Comment

Railway Megablock Update: प्रवाशांनो रविवारी ठाणे- कल्याण मार्गिकेवर मेगाब्लॉक; हार्बर- पश्चिम मार्गिकेची स्थिती काय?

मुंबई: रविवारी २० सप्टेंबर रोजी, मध्य रेल्वेवरील ठाणे- कल्याण मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळे जर

Ganeshotsav 2026 : "आम्ही पण मुंबईकर"! परळच्या चिटणीस कुटुंबाचा देखावा; समुद्री जीवांच्या संरक्षणासाठी गणेशोत्सवातून हाक

मुंबई : मुंबई म्हटलं की डोळ्यांसमोर येतात त्या उंचच उंच इमारती, लोकल ट्रेनची गर्दी आणि गजबजलेले रस्ते! पण याच

IIT Bombay Student Death : परीक्षेदरम्यान चॅटजीपीटी वापरल्याचा प्रकार; विद्यार्थ्याच्या मृत्यूनंतर कॅम्पसमध्ये आंदोलन

मुंबई : मुंबईतील पवई येथील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (IIT Bombay) मध्ये द्वितीय वर्षात शिकणाऱ्या १९ वर्षीय

Disha Salian Case : सतीश सालियन मातोश्रीवर जाणार; आदित्य ठाकरेंच्या अटकेची मागणी

मुंबई : दिशा सालियन मृत्यू प्रकरणावरून महाराष्ट्रातील राजकीय वातावरण पुन्हा तापण्याची शक्यता आहे. दिशा सालियन

Lalbaugcha Raja : लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी गेलेल्या भाविकावर काळाचा घाला; रांगेतच प्राण सोडल्याने हळहळ

मुंबई : गणेशोत्सवाच्या उत्साहात मुंबईतील लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी देशभरातून भाविक येत आहेत. मात्र,

IoT Water Meter : पाण्याची हातोहात होणारी चोरी येणार उघड; टँकर भरणा केंद्रावर बसवणारी आयओटी आधारीत इनलाइन अल्टासॉनिक जलमापके

प्रत्येक नोंदीची माहिती एक्वा सर्व्हरला मिळणार त्वरीत मुंबई (विशेष प्रतिनिधी) : महापालिकेच्या विविध ठिकाणी