सिलिकॉन व्हॅलीनंतर आता अमेरिकेतील आणखी एक बँक दिवाळखोर

वॉशिंग्टन : सिलिकॉन व्हॅली बँकेच्या दिवाळखोरीनंतर आता अमेरिकेची सिग्नेचर बँकही दिवाळखोर झाली आहे. याची झळ अमेरिकेसह जगभरातील अनेक स्टार्टअप्सना जाणवू लागली आहे.


गेल्या २ दिवसात अमेरिकेत २ बँका बंद पडल्या असूनही अमेरिकेच्या बाजारात मात्र तेजी आहे. ठेवीदारांचे पैसे सुरक्षित असून ते त्यांचे पैसे काढू शकतील, अशी ग्वाही अमेरिकी सरकारने दिली आहे.


ब्लूमबर्गच्या अहवालानुसार, यूएस सेंट्रल बँक फेडरल रिझर्व्ह आणि फेडरल डिपॉझिट इन्शुरन्स फंड तयार करण्यासाठी प्रयत्न करत आहे. सिलिकॉन व्हॅली बँक दिवाळखोरीनंतर सध्या बिकट अवस्थेत असलेल्या बँकांकडे अधिक ठेवी ठेवण्यासाठी हा निधी वापरता येईल, असे नियामकांना वाटते.


फेडरल रिझर्व्ह आणि फेडरल डिपॉझिट इन्शुरन्स कॉर्प सारख्या नियामकांचा असा विश्वास आहे की असा निधी तयार केल्याने लोकांमध्ये आत्मविश्वास निर्माण होईल.


हे पाऊल बँकिंग व्यवस्थेवर ठेवीदारांचा विश्वास पुन्हा प्रस्थापित करेल आणि दहशतीची परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यास मदत करेल. यासाठी नियामकांनी बँकिंग जगतातील अनेक अधिकाऱ्यांशी चर्चाही केली आहे.


दरम्यान, लेहमन ब्रदर्सच्या प्रकरणानंतर संपूर्ण बँकिंग जग हादरले असताना २००८च्या संकटाची पुनरावृत्ती तर होणार नाही, अशी भीतीही व्यक्त केली जात आहे. अशी परिस्थिती टाळण्यासाठी अमेरिकन सरकार आणि अधिकाऱ्यांनी पूर्व तयारी सुरू केली आहे.


ब्लूमबर्गच्या वृत्तानुसार, सिलिकॉन व्हॅली बँकेच्या बुडण्यामुळे विशेषत: भांडवल आणि स्टार्टअपवर लक्ष केंद्रित करणाऱ्या बँकांसाठी परिस्थिती चिंताजनक बनली आहे. सिलिकॉन व्हॅली बँक बुडल्यामुळे अशा इतर बँकांनाही फटका बसत आहे.


फेडरल रिझर्व्ह आणि फेडरल डिपॉझिट इन्शुरन्स कॉर्पोरेशन हे संकट थांबवण्याचा प्रयत्न करत आहेत आणि यासाठी पर्यायी निधी योजना तयार करण्यावर भर देण्यात येत आहे.


हे प्रकरण इतके गंभीर झाले आहे की अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांनाही हस्तक्षेप करावा लागला आहे. बँक बुडल्याची बातमी कळल्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजे शनिवारी राष्ट्राध्यक्ष बायडेन यांनी कॅलिफोर्नियाचे गव्हर्नर गॅविन न्यूजम यांच्याशी बोलले.


दोघांनी सिलिकॉन व्हॅली बँक बुडवण्याबाबत आणि त्यामुळे निर्माण होणाऱ्या प्रतिकूल परिस्थितीला तोंड देण्यासाठी उपाययोजनांबाबत चर्चा केली.

Comments
Add Comment

Aleema Khan Arrest : लाँग मार्चची धास्ती की दबावतंत्र? पाकिस्तानात इम्रान खान यांच्या बहीण अलीमा खान यांना अटक

इस्लामाबाद: पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्या अडचणीत सातत्याने वाढ होत असून, आता

Drone Attack : युक्रेनचा रशियावर आतापर्यंतचा सर्वात मोठा ड्रोन महाहल्ला; मॉस्कोसह विविध शहरांना लक्ष्य, १,१०० ड्रोन पाडल्याचा रशियाचा दावा

मॉस्को : युक्रेनने रशियावर १,००० हून अधिक ड्रोनच्या मदतीने भीषण हल्ला केला आहे. रशियात संसदीय निवडणुकीचा तिसरा

Neela Vikhe Patil : विखे पाटील घराण्यातील कन्या स्वीडनच्या संसदेत; अहमदनगरच्या नीला विखे पाटलांची उत्तुंग भरारी

स्वीडन : अहमदनगरमधील विखे पाटील कुटुंबातील कन्या नीला विखे पाटील यांची स्वीडनच्या संसदेत

Hossein Pedran : देशाशी गद्दारी थेट जीवावर बेतली... इस्रायलला गोपनीय लष्करी माहिती पुरवल्याच्या आरोपाखाली इराणी गुप्तहेराला फाशी

Hossein Pedran : इस्रायलच्या गुप्तचर संस्थेला संवेदनशील लष्करी माहिती पुरवल्याच्या आरोपाखाली इराणने होसैन पदरान याला

Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांचा सीएनएन, एमएसएनबीसी आणि पॉलिटिकोला व्हाइट हाऊसमध्ये प्रवेशबंदीचा इशारा; आणखी माध्यमांवरही कारवाईचे संकेत

वॉशिंग्टन : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी CNN, MS NOW आणि Politico या तीन प्रमुख वृत्तसंस्थांना व्हाइट

Kursk Nuclear Plant Attack: रशियाच्या कुर्स्क अणुऊर्जा प्रकल्पावर ड्रोन हल्ला; IAEA कडून चिंता व्यक्त, अणुसुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर

मॉस्को : रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्धादरम्यान अणुऊर्जा प्रकल्पाच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा