Neela Vikhe Patil : विखे पाटील घराण्यातील कन्या स्वीडनच्या संसदेत; अहमदनगरच्या नीला विखे पाटलांची उत्तुंग भरारी


स्वीडन : अहमदनगरमधील विखे पाटील कुटुंबातील कन्या नीला विखे पाटील यांची स्वीडनच्या संसदेत रिक्सदाग खासदार म्हणून निवड झाली आहे. महाराष्ट्रातील सहकार आणि राजकीय क्षेत्राशी जोडलेल्या कुटुंबातील या कन्येने स्वीडिश राजकारणात मिळवलेले हे यश कौतुकास्पद मानले जात आहे.



नीला यांचा जन्म स्वीडनमध्ये झाला असला तरी त्यांचे बालपण आणि प्राथमिक शिक्षण काही काळ अहमदनगर येथे झाले. त्यांचे वडील डॉ. अशोक विखे पाटील व्यावसायिक कारणांमुळे स्वीडनमध्ये स्थायिक झाले होते. नीला यांनी नंतर स्वीडन, स्पेन आणि युरोपमधून उच्च शिक्षण पूर्ण केले. त्यांनी गॉथेनबर्ग स्कूल ऑफ बिझनेसमधून अर्थशास्त्र आणि कायद्याची पदवी घेतली, तर माद्रिद येथील विद्यापीठातून एमबीए केले. त्यांना इंग्रजी, स्वीडिश आणि स्पॅनिश या भाषा उत्तम बोलता येतात.

राजकारणात येण्यापूर्वी त्यांनी पंतप्रधान कार्यालयात वित्त, करप्रणाली आणि गृहनिर्माण या विषयांवर सल्लागार म्हणून काम पाहिले आहे. तसेच स्टॉकहोम सिटी कौन्सिल आणि ग्रीन पार्टीमध्ये विविध जबाबदाऱ्या सांभाळल्या आहेत. अवघ्या १६ व्या वर्षी त्यांनी सोशल डेमोक्रॅटिक पार्टीचे सदस्यत्व घेतले होते. संसदेत निवडून आल्यानंतर आता बालकल्याण आणि पर्यावरणाच्या मुद्द्यांवर विशेष लक्ष देणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे.

आपल्या या यशाबद्दल बोलताना त्यांनी आजोबा बाळासाहेब विखे पाटील यांच्या आठवणींना उजाळा दिला. लहानपणीच आजोबांनी आपल्याला राजकारणाची आणि अर्थकारणाची आवड निर्माण करून दिली होती, असे त्या म्हणाल्या. स्वीडनमध्ये राहत असल्या तरी भारताशी आणि महाराष्ट्राशी आपले नाते नेहमीच खास राहिले आहे, अशी भावना त्यांनी व्यक्त केली.

स्वीडनमध्ये नुकत्याच झालेल्या निवडणुकीत विरोधी डाव्या पक्षांच्या आघाडीने निसटते बहुमत मिळवले आहे. ३४९ जागांच्या या संसदेत विरोधी आघाडीला १७६ जागा मिळाल्या आहेत. या राजकीय बदलांनंतर नीला विखे पाटील आता स्वीडनच्या संसदेत लोकप्रतिनिधी म्हणून कार्यभार सांभाळतील.

Comments
Add Comment

इस्रायल निवडणूक आयोगाचा निर्वाळा: मतदानात गैरप्रकार नाही, नेतन्याहूंचा आरोप फेटाळला

इस्रायलच्या केंद्रीय निवडणूक आयोगाने गेल्या आठवड्यात झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत कोणताही गैरप्रकार किंवा

होर्मुझच्या सामुद्रधुनीत भारताला मोठा दिलासा! इराणकडून भारतासह 4 देशांच्या जहाजांना निर्बंधांतून सूट

मुंबई : पश्चिम आशियातील संघर्षाच्या पार्श्वभूमीवर होर्मुझच्या सामुद्रधुनीतून जहाजांच्या वाहतुकीवर निर्बंध

US Midterm Election: मध्यावधी निवडणुकीत ट्रम्प यांचा रिपब्लिकन पक्ष का पराभूत झाला? ही आहेत पाच कारणं

अमेरिकेतील मध्यावधी निवडणुकांची गेल्या काही दिवसांपासून चर्चा होती. या निवडणुकीत रिपब्लिकन आणि डेमोक्रॅट्स हे

US Midterm Election : मिडटर्म निवडणुकीत रिपब्लिकन पक्षाला मोठा फटका ! ट्रम्प म्हणाले, ‘मी मैदानात असतो तर...

US Midterm Election : अमेरिकेतील मिडटर्म निवडणुकीत रिपब्लिकन पक्ष पिछाडीवर पडल्यानंतर राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी

Nepal Helicopter Crash: नेपाळमध्ये लँडिंगदरम्यान दोन हेलिकॉप्टरची धडक; एक भारतीय ठार

नेपाळच्या सोलुखुम्बु जिल्ह्यातील फेरिचे हेलिपॅडवर उतरताना दोन हेलिकॉप्टर एकमेकांवर आदळल्याने एका भारतीय

Indian ship attacked in Oman sea : ओमानच्या समुद्रात भारतीय मालवाहू जहाजावर हवाई हल्ला; एका भारतीय खलाशाचा मृत्यू, १३ जण सुखरूप

ओमानच्या किनाऱ्याजवळ एका भारतीय व्यापारी जहाजावर अचानक हवाई हल्ला झाल्याची अत्यंत चिंतेची बातमी समोर आली आहे.