ताप अंगावर काढू नका!


  • राज्यात २ मृत्यू झाल्यावर आरोग्यमंत्र्यांच्या महत्त्वाच्या सूचना

  • त्वरीत मृत्यू होत नाही, उपचार घेतला तर रुग्ण बरा होतो


मुंबई : राज्यातला कोरोनाचा प्रभाव ओसरताच आता H3N2 ची नवी भीती निर्माण झाली आहे. यामुळे सध्या राज्यामध्ये २ मृत्यू झाले आहेत. त्याबद्दल बोलताना राज्याचे आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी घाबरून न जाण्याचे आवाहन केले आहे.


आरोग्यमंत्री सावंत यांनी नागरिकांना ताप अंगावर न काढण्याची सूचना दिली आहे. तसेच राज्यातल्या रुग्णांच्या स्थितीबद्दल माहिती दिली आहे. सावंत म्हणाले, "१२ मार्चला राज्यात ३५२ रुग्ण आहेत. परीक्षा संपल्यावर मित्रांसोबत फिरायला आलेल्या एका विद्यार्थ्याचा मृत्यू झाला. त्याला खासगी रुग्णालयात दाखल केले होते, रात्री १२ वाजता त्याचा मृत्यू झाला. नागपूरमधल्या एका इसमाचाही मृत्यू झाला आहे. H3N2 ने त्वरीत मृत्यू होत नाही, उपचार घेतला तर तो रुग्ण बरा होतो."


राज्य सरकार परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे हे सांगताना तानाजी सावंत म्हणाले, "सर्व रुग्णालयांमध्ये आम्ही याबद्दल अलर्ट दिला आहे. अशा आजाराचा रुग्ण असेल तर त्याच्यावर उपचार करण्याचे निर्देश दिलेले आहेत. नागरिकांना सूचना आहे, जर ताप आला असेल, तर अंगावर काढू नका. तात्काळ डॉक्टरांचा सल्ला घ्या."



या व्हायरसची लक्षणे?


खोकला


अस्वस्थ वाटणं


उलट्या होणं


घशात खवखव


अंगदुखी


बद्धकोष्ठता

Comments
Add Comment

CM Devendra Fadnavis : दुष्काळाचा 'जीआर' उद्या काढणार

- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस; ‘ट्रिगर वन’नुसार निर्णय, हेक्टरी मदत, चारा-पाणीटंचाईवर उपाय आणि रब्बी पेरणीसाठी

Bachchu Kadu News: दिवाळीनंतर राज्य मंत्रिमंडळात फेरबदल? अकार्यक्षम मंत्र्यांना डच्चू मिळणार

मुंबई: महायुती सरकारमध्ये मंत्रिमंडळ फेरबदलाची चर्चा पुन्हा सुरू झाली आहे. शिवसेनेचे आमदार बच्चू कडू यांनी

Pune Crime News : पोलीस दलात खळबळ ! अल्पवयीन मुलांना पट्ट्याने मारहाण अन् जातीवाचक शिवीगाळ करणं भोवलं ; वरिष्ठ अधिकाऱ्यासह 11 पोलिसांना दणका

Pune Crime News : पुण्यातील पोलीस दलात खळबळ उडवून देणारी आणि कायदा-सुव्यवस्थेचे नियम वेशीवर टांगणारी एक अत्यंत संतापजनक

Ganpati Idol Recycling : गणपतीच्या मूर्तीपासून चक्क स्टडी टेबल! नवी मुंबईत POPच्या मूर्तींचा अनोखा पुनर्वापर

नवी मुंबई : गणपती बाप्पाची मूर्ती विसर्जित झाली आणि काही दिवसांनी त्याच मूर्तीचं रूप एखाद्या मुलाच्या

CM Devendra Fadnavis : कर्जमाफीपासून वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांनाही लाभ देणार - मुख्यमंत्री फडणवीस यांची वाशिममध्ये घोषणा

कोरड्या दुष्काळाचा जीआर काढणार, पीकविम्याचे प्रश्नही सोडविण्याचे आश्वासन वाशिम : दुष्काळाने शेतीचे कंबरडे

Pune Metro : पुणेकरांची मेट्रोची प्रतीक्षा वाढली; हिंजवडी- शिवाजीनगर मेट्रोचे उद्घाटने पुन्हा लांबणीवर

पुणे : पुण्यातील वाहतूक कोंडी कमी करण्यासोबतच हिंजवडी आयटी पार्कमधील हजारो कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाच्या