CM Devendra Fadnavis : दुष्काळाचा 'जीआर' उद्या काढणार

- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस; ‘ट्रिगर वन’नुसार निर्णय, हेक्टरी मदत, चारा-पाणीटंचाईवर उपाय आणि रब्बी पेरणीसाठी मदत देणार


मुंबई : राज्यातील पिकांची गंभीर स्थिती आणि मोठ्या प्रमाणातील दुष्काळसदृश परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी दुष्काळ जाहीर करण्यासंदर्भातील शासन आदेश काढण्यात येणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी दिली. दुष्काळ संहितेतील ‘ट्रिगर वन’नुसार हा निर्णय घेतला जाणार असून, एखादा दुष्काळग्रस्त भाग त्यातून राहिल्यास ‘ट्रिगर थ्री’नुसार त्याचा समावेश केला जाईल, असे फडणवीस यांनी स्पष्ट केले. (CM Devendra Fadnavis)


अमरावती विमानतळावर माध्यमांशी संवाद साधताना फडणवीस यांनी राज्यातील पिकांच्या परिस्थितीचा आढावा मांडला. सोयाबीनसह काही भागातील कापूस, उडीद आणि तूर या पिकांवर संकट निर्माण झाल्याचे त्यांनी सांगितले. शेतकऱ्यांना कोणत्या प्रकारे मदत करता येईल, यासाठी सरकारकडून प्रयत्न सुरू असल्याचेही त्यांनी नमूद केले. (CM Devendra Fadnavis)


prahaar.in/2026/09/24/evidence-in-the-disha-salian-case-handed-over-to-the-cbi-pen-drive-submitted-by-her-father-satish-salian-demand-for-immediate-action-against-the-guilty/


दुष्काळ जाहीर करताना राज्यातील मोठ्या प्रमाणात प्रभावित झालेल्या भागांचा समावेश केला जाईल, असे फडणवीस यांनी सांगितले. दुष्काळी परिस्थितीत शेतकऱ्यांना विविध प्रकारची मदत करावी लागणार असून, विशेषतः चारा आणि पाणीटंचाईच्या प्रश्नावर कार्यवाही केली जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.


अन्नधान्याची कमतरता भासू नये यासाठीही सरकारकडून उपाययोजना करण्यात येतील. शेतकऱ्यांना थेट हेक्टरी मदत देण्याची तयारी असून, त्यांच्या मुलांच्या शिक्षणात खंड पडू नये यासाठीही उपाययोजना केल्या जातील, असे फडणवीस यांनी सांगितले. ज्या भागात पाणी उपलब्ध होऊ शकते, त्या ठिकाणी रब्बी हंगामाची पेरणी करता यावी यासाठीही मदत करण्याचा सरकारचा प्रयत्न असेल. (CM Devendra Fadnavis)



गंभीर परिस्थितीत रोजगाराची उपलब्धता वाढविण्यासाठी जास्तीत जास्त कामे हाती घेण्याचा सरकारचा प्रयत्न असेल, असेही फडणवीस यांनी सांगितले. त्यामुळे दुष्काळग्रस्त भागातील शेतकरी आणि ग्रामीण भागातील नागरिकांना रोजगार उपलब्ध करून देण्यावरही सरकारचा भर राहणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. (CM Devendra Fadnavis)

Comments
Add Comment

Bachchu Kadu News: दिवाळीनंतर राज्य मंत्रिमंडळात फेरबदल? अकार्यक्षम मंत्र्यांना डच्चू मिळणार

मुंबई: महायुती सरकारमध्ये मंत्रिमंडळ फेरबदलाची चर्चा पुन्हा सुरू झाली आहे. शिवसेनेचे आमदार बच्चू कडू यांनी

Pune Crime News : पोलीस दलात खळबळ ! अल्पवयीन मुलांना पट्ट्याने मारहाण अन् जातीवाचक शिवीगाळ करणं भोवलं ; वरिष्ठ अधिकाऱ्यासह 11 पोलिसांना दणका

Pune Crime News : पुण्यातील पोलीस दलात खळबळ उडवून देणारी आणि कायदा-सुव्यवस्थेचे नियम वेशीवर टांगणारी एक अत्यंत संतापजनक

Ganpati Idol Recycling : गणपतीच्या मूर्तीपासून चक्क स्टडी टेबल! नवी मुंबईत POPच्या मूर्तींचा अनोखा पुनर्वापर

नवी मुंबई : गणपती बाप्पाची मूर्ती विसर्जित झाली आणि काही दिवसांनी त्याच मूर्तीचं रूप एखाद्या मुलाच्या

CM Devendra Fadnavis : कर्जमाफीपासून वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांनाही लाभ देणार - मुख्यमंत्री फडणवीस यांची वाशिममध्ये घोषणा

कोरड्या दुष्काळाचा जीआर काढणार, पीकविम्याचे प्रश्नही सोडविण्याचे आश्वासन वाशिम : दुष्काळाने शेतीचे कंबरडे

Pune Metro : पुणेकरांची मेट्रोची प्रतीक्षा वाढली; हिंजवडी- शिवाजीनगर मेट्रोचे उद्घाटने पुन्हा लांबणीवर

पुणे : पुण्यातील वाहतूक कोंडी कमी करण्यासोबतच हिंजवडी आयटी पार्कमधील हजारो कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाच्या

Kolhapur Accident News: कानातील इअरबड्स ठरले जीवघेणे ! रेल्वे रुळावर इअरबड्स लावले अन् क्षणात होत्याचं नव्हतं झालं ; 17 वर्षीय तरुणीचा मृत्यू

Kolhapur Accident News : रेल्वे रुळावरून चालताना मोबाईलवर बोलणे आणि कानात इअरबड्स असणे एका १७ वर्षीय तरुणीच्या जीवावर