Ganpati Idol Recycling : गणपतीच्या मूर्तीपासून चक्क स्टडी टेबल! नवी मुंबईत POPच्या मूर्तींचा अनोखा पुनर्वापर

नवी मुंबई : गणपती बाप्पाची मूर्ती विसर्जित झाली आणि काही दिवसांनी त्याच मूर्तीचं रूप एखाद्या मुलाच्या अभ्यासाच्या टेबलात बदललं, तर ही कल्पना निश्चितच वेगळी वाटेल. मात्र, नवी मुंबईत POPच्या गणेशमूर्तींच्या पुनर्वापरातून असा अभिनव प्रयोग करण्यात आला आहे. विसर्जनानंतर कचऱ्यात जाणाऱ्या POPच्या मूर्तींचा योग्य पद्धतीने पुनर्वापर करून त्यापासून विद्यार्थ्यांसाठी स्टडी टेबल तयार करण्यात आली आहेत. (Ganpati Idol Recycling)


गणेश विसर्जनानंतर POPच्या मूर्तींचं नेमकं काय होतं, हा प्रश्न पर्यावरण कार्यकर्ते मल्हार कळंबे यांना पडत होता. समुद्र किंवा कृत्रिम तलावातून बाहेर काढलेल्या मूर्ती अखेर कचऱ्यात जात असतील, तर समस्या पूर्णपणे सुटत नाही; केवळ तो कचरा नजरेआड होतो, अशी त्यांची भूमिका आहे.



यातूनच डॉ. बिनिश देसाई यांच्या तांत्रिक सहकार्याने २०२४ मध्ये दादर चौपाटीवर या प्रयोगाचा पायलट प्रोजेक्ट सुरू करण्यात आला. सुरुवातीच्या टप्प्यात POPपासून टेबल लॅम्प आणि पेन स्टँड यांसारख्या वस्तू तयार करण्यात आल्या. त्यानंतर या उपक्रमाला अधिक व्यापक स्वरूप देत गणेशमूर्तींपासून थेट स्टडी टेबल तयार करण्याचा प्रयोग करण्यात आला. (Ganpati Idol Recycling)



३२०० किलो मूर्तींचं रिसायकलिंग; ७६० स्टडी टेबल तयार


२०२५च्या प्रकल्पात सुमारे ३२०० किलो गणेशमूर्तींचं रिसायकलिंग करण्यात आलं. या पुनर्प्रक्रियेतून तब्बल ७६० स्टडी टेबल तयार करण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे. नवी मुंबईतही सुमारे ७०० POP गणेशमूर्तींमधून १५०० किलो पुनर्प्रक्रिया केलेल्या POPचा वापर करून स्टडी टेबल तयार करण्यात आल्याची नोंद आहे.


या प्रक्रियेत विसर्जनानंतर मूर्ती आधी फोडून त्यातील POP वेगळा केला जातो. त्यानंतर त्याची पावडर तयार करून त्यात विशेष ऑर्गेनिक ग्लू मिसळला जातो. हे मिश्रण ठराविक आकाराच्या मोल्डमध्ये भरून सुकवल्यानंतर त्यापासून नवीन उत्पादन तयार केलं जातं. (Ganpati Idol Recycling)




बाप्पाच्या मूर्तीपासून शिक्षणाला आधार


या उपक्रमामागे पर्यावरणाबरोबरच एक भावनिक संदेशही आहे. गणपतीला बुद्धी आणि विद्येची देवता मानलं जातं. त्यामुळे बाप्पाच्या मूर्तीपासून तयार झालेल्या वस्तूचा उपयोग एखाद्या मुलाच्या शिक्षणासाठी व्हावा, ही या संकल्पनेमागची भावना आहे. (Ganpati Idol Recycling)


मात्र, हा प्रकल्प POPच्या गणेशमूर्तींना प्रोत्साहन देण्यासाठी नसल्याचं स्पष्ट करण्यात आलं आहे. पर्यावरणपूरक मूर्तींचा वापर वाढवणं हा प्रमुख उद्देश आहे. त्याचवेळी सध्या अस्तित्वात असलेल्या POPच्या मूर्तींचं विसर्जनानंतर योग्य व्यवस्थापन आणि पुनर्वापर करणंही आवश्यक असल्याचं या उपक्रमातून अधोरेखित होतं.


विसर्जनानंतर बाप्पाची गोष्ट संपत नाही; योग्य पुनर्वापरातून ती एखाद्या मुलाच्या शिक्षणाला नवी दिशा देऊ शकते, असा संदेश या अनोख्या प्रयोगातून मिळतो. (Ganpati Idol Recycling)


Comments
Add Comment

CM Devendra Fadnavis : दुष्काळाचा 'जीआर' उद्या काढणार

- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस; ‘ट्रिगर वन’नुसार निर्णय, हेक्टरी मदत, चारा-पाणीटंचाईवर उपाय आणि रब्बी पेरणीसाठी

Bachchu Kadu News: दिवाळीनंतर राज्य मंत्रिमंडळात फेरबदल? अकार्यक्षम मंत्र्यांना डच्चू मिळणार

मुंबई: महायुती सरकारमध्ये मंत्रिमंडळ फेरबदलाची चर्चा पुन्हा सुरू झाली आहे. शिवसेनेचे आमदार बच्चू कडू यांनी

Pune Crime News : पोलीस दलात खळबळ ! अल्पवयीन मुलांना पट्ट्याने मारहाण अन् जातीवाचक शिवीगाळ करणं भोवलं ; वरिष्ठ अधिकाऱ्यासह 11 पोलिसांना दणका

Pune Crime News : पुण्यातील पोलीस दलात खळबळ उडवून देणारी आणि कायदा-सुव्यवस्थेचे नियम वेशीवर टांगणारी एक अत्यंत संतापजनक

CM Devendra Fadnavis : कर्जमाफीपासून वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांनाही लाभ देणार - मुख्यमंत्री फडणवीस यांची वाशिममध्ये घोषणा

कोरड्या दुष्काळाचा जीआर काढणार, पीकविम्याचे प्रश्नही सोडविण्याचे आश्वासन वाशिम : दुष्काळाने शेतीचे कंबरडे

Pune Metro : पुणेकरांची मेट्रोची प्रतीक्षा वाढली; हिंजवडी- शिवाजीनगर मेट्रोचे उद्घाटने पुन्हा लांबणीवर

पुणे : पुण्यातील वाहतूक कोंडी कमी करण्यासोबतच हिंजवडी आयटी पार्कमधील हजारो कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाच्या

Kolhapur Accident News: कानातील इअरबड्स ठरले जीवघेणे ! रेल्वे रुळावर इअरबड्स लावले अन् क्षणात होत्याचं नव्हतं झालं ; 17 वर्षीय तरुणीचा मृत्यू

Kolhapur Accident News : रेल्वे रुळावरून चालताना मोबाईलवर बोलणे आणि कानात इअरबड्स असणे एका १७ वर्षीय तरुणीच्या जीवावर