CM Devendra Fadnavis : कर्जमाफीपासून वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांनाही लाभ देणार - मुख्यमंत्री फडणवीस यांची वाशिममध्ये घोषणा

कोरड्या दुष्काळाचा जीआर काढणार, पीकविम्याचे प्रश्नही सोडविण्याचे आश्वासन


वाशिम : दुष्काळाने शेतीचे कंबरडे मोडले असताना कर्जमाफीपासून वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांनाही कर्जमाफी देण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी वाशिममध्ये केली. २०१६-१७ मधील कर्जमाफीचा लाभ न मिळालेल्या शेतकऱ्यांना आता कर्जमाफी दिली जाईल, असे फडणवीस यांनी स्पष्ट केले. त्याचबरोबर कोरड्या दुष्काळाचा शासन निर्णय लवकरच काढण्यात येणार असून पीकविम्याशी संबंधित प्रश्नही मार्गी लावण्याची ग्वाही त्यांनी दिली.


दुष्काळी परिस्थितीची पाहणी करण्यासाठी फडणवीस बुधवारी लातूर, धाराशिव आणि सोलापूर जिल्ह्यांच्या दौऱ्यावर होते. त्यानंतर गुरुवारी त्यांनी वाशिम जिल्ह्यातील मसाल गावात शेतकऱ्यांशी संवाद साधला. पिकांचे नुकसान, पाण्याची टंचाई आणि जनावरांच्या चाऱ्याची समस्या याबाबत शेतकऱ्यांनी त्यांच्यासमोर व्यथा मांडल्या. फडणवीस यांनी शेतकऱ्यांचे म्हणणे ऐकून घेत त्यांना सरकार त्यांच्या पाठीशी असल्याचा विश्वास दिला.


“तुम्ही काळजी करू नका. सरकार तुमच्या पाठीशी आहे. आम्ही तुम्हा सर्वांना मदत करणार आहोत. तुमचे प्रश्न सोडवणार आहोत,” असे फडणवीस यांनी शेतकऱ्यांना सांगितले. दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर कोरड्या दुष्काळाचा जीआर काढण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तसेच पीकविम्याच्या प्रश्नांवरही मार्ग काढण्यात येईल, असे आश्वासन दिले.


२०१६-१७ मधील कर्जमाफीच्या वेळी ज्या शेतकऱ्यांना लाभ मिळाला नाही, त्या सर्वांना कर्जमाफी देण्याची घोषणा फडणवीस यांनी केली. “वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांनाही मदत करणार आहोत. तुम्ही काळजी करू नका,” असे त्यांनी सांगितले. राज्यात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत कर्जमाफीची प्रक्रिया सुरू असून ऑगस्टमध्ये दुसऱ्या हप्त्यात ६.३६ लाख शेतकऱ्यांच्या खात्यांमध्ये ५ हजार ८६ कोटी रुपये जमा करण्यात आले आहेत.



काळजी करू नका, सरकार तुमच्या पाठीशी !


- मुख्यमंत्र्यांनी फडणवीस यांचा ताफा मसाल गावातून जात असताना शेतकऱ्यांनी हात उंचावून त्यांचे लक्ष वेधले. मुख्यमंत्री यांनी ताफा थांबवून पुन्हा शेतकऱ्यांशी संवाद साधला. “मी तुम्हा सर्वांना मदत करणार आहे. तुमचे प्रश्न सोडवणार आहे. तुम्ही काळजी करू नका,” असे त्यांनी सांगितले. या वेळी शेतकऱ्यांनी फडणवीस यांच्या समर्थनार्थ घोषणा दिल्या.


- दरम्यान, सोयाबीनचे पीक मोठ्या प्रमाणावर नष्ट झाले असून हिरव्या दिसणाऱ्या शेंगांमध्येही दाणे नसल्याचे मुख्यमंत्र्यांनी नमूद केले. दुष्काळाचा शासन निर्णय काढून पिण्याचे पाणी, जनावरांसाठी चारा, अन्नधान्य तसेच रब्बी पिकांसाठी मदत देण्याचे आश्वासन त्यांनी दिले होते. दुष्काळाची मदत डीबीटीद्वारे शेतकऱ्यांच्या खात्यात देण्याची भूमिकाही त्यांनी मांडली.

Comments
Add Comment

Devendra Fadnavis Farmer Visit: शेतकऱ्याच्या घरी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची दिवाळी; भाऊबीजेला अरुणाताईंची खास विनंती

Nagpur:  दिवाळीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज संपूर्ण दिवसभर नागपूर येथील दुष्काळग्रस्त

शेतीच्या बांधावर जाऊन मुख्यमंत्र्यांनी केली शेतातील पिकांची पाहणी; कापूस व तूर पिकांच्या नुकसानी संदर्भात शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी

पावसाअभावी शेतातील कापूस व तुरीची झाडे सुकत असून अशा परिस्थितीत कापसाची शेती करणारा शेतकरी हवालदिल झाला आहे.

दिव्यांग बांधवांसोबत दिवाळी साजरी करताना उपमुख्यमंत्री शिंदे भावुक, म्हणाले, ''हीच खरी दिवाळी''

आपल्या लोकांच्या आयुष्यातील अडचणी दूर करून त्यांच्या मनात आशेचा दिवा लावणे हीच खरी दिवाळी असल्याचे मत

आयएसआयएस प्रकरणात पुण्यातील डॉक्टरला सहा वर्षांची शिक्षा, कोर्ट म्हणाले - समाजाला धडा मिळाला पाहिजे

बंदी घातलेल्या दहशतवादी संघटना आयएसआयएसशी संबंधित प्रकरणात पुण्यातील एका डॉक्टरला विशेष न्यायालयाने सहा

मुख्यमंत्र्यांचा शेतकऱ्यांना दिलासा, शेतातील विंधन विहिरींवरील बंदी हटवली; झाडे जगविण्यासाठी मोठी घोषणा

महाराष्ट्र: सध्या राज्यभरात आणि विशेषतः ग्रामीण भागात तीव्र दुष्काळी परिस्थिती पाहायला मिळत आहे. यावर मात

दिवाळीत हुडहुडी भरणार की घामाघूम होणार? हवामानाबाबत आली अत्यंत महत्त्वाची अपडेट!

दिवाळीचा सण जवळ येत असताना राज्यातील हवामानात लक्षणीय बदल होत आहेत. एका बाजूला दिवसा कडक ऊन चटका देत असले, तरी