मुंबईचा आरसीबीवर रॉयल विजय



महिला प्रीमियर लीग



नवी मुंबई (वृत्तसंस्था) : अ‍ॅमेलिया केरच्या अष्टपैलू खेळाच्या जोरावर मंगळवारी मुंबई इंडियन्सने रॉयल चँलेजर्स बंगळुरु संघावर ४ विकेट राखून रॉयल विजय मिळवला. महिला प्रीमियर लीगमध्ये मुंबई इंडियन्सचा हा सहावा विजय आहे.


आरसीबीने दिलेले १२६ धावांचे लक्ष्य गाठताना मुंबईने दमदार सुरुवात केली. हायली मॅथ्यूज (२४ धावा) आणि यश्तिका भाटीया (३० धावा) यांनी ५३ धावांची सलामी करत मुंबईला विजयाच्या वाटेवर नेऊन ठेवले. त्यानंतर हरमनप्रीत कौर, नॅट स्कीवर ब्रंट या झटपट बाद झाल्यामुळे आरसीबीने सामन्यात पुनरागमन केले. अ‍ॅमेलिया केरने नाबाद ३१ धावा तडकावत मुंबईचा विजय निश्चित केला. तिला पूजा वस्त्रकारने १९ धावांची साथ दिली. मुंबईने १६.३ षटकांत ६ फलंदाजांच्या बदल्यात विजयी लक्ष्य गाठले.


तत्पूर्वी सामन्यात टॉस जिंकून मुंबई संघाने प्रथम गोलंदाजी करत आरसीबीला १२५ धावांवर रोखले. अगदी पहिल्या षटकापासून मुंबईने भेदक गोलंदाजी केली. अवघ्या एका धावेवर बंगळुरुची पहिली विकेट पडली. त्यानंतर स्मृती मन्धाना आणि एलिस पेरीने काहीस डाव सावरला. स्मृतीने २४ धावा, तर एलिसा पेरीने २९ धावा केल्या. रिचा घोषने खालच्या फळीत २९ धावा फटकावत बंगळुरुला कसेबसे १२५ धावांपर्यंत पोहचवले. अ‍ॅमेलिया केरने सर्वाधिक ३, तर इस्सी वोंग आणि नॅट ब्रंटने प्रत्येकी २ विकेट्स घेतल्या. तर साईका इशाकने एक विकेट घेतली.

Comments
Add Comment

आयसीसी क्रिकेटचे अनेक नियम बदलले, जाणून घ्या नेमकं काय?

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने क्रिकेट खेळाला आणखी रोमांचक, वेगवान आणि पारदर्शक बनवण्यासाठी नियमांमध्ये आणि

'हे काही क्रिकेट नाही...', 406 धावांचा यशस्वी पाठलाग करूनही टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर नाखूश

भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील दुसरा वनडे सामन्याची ऐतिहासिक नोंद झाली आहे. या सामन्यात वेस्ट इंडिजने 405 धावा

आशियाई क्रीडा स्पर्धेत हॉकीच्या उपांत्य फेरीत भारताने पाकिस्तानला ठेचलं, फायनलमध्ये दणक्यात एन्ट्री

गिफू : आशियाई क्रीडा स्पर्धा 2026 (Asian Games 2026) मध्ये भारतीय पुरुष हॉकी संघाने तुफानी कामगिरी करत अंतिम फेरीत (Final) धडक मारली

W, W, W..! एशियन गेम्स स्पर्धेत अभिषेक शर्माने घेतल्या सलग तीन विकेट, पण हॅटट्रीक नाही; कारण...

एशियन गेम्स स्पर्धेच्या उपांत्या फेरीत भारत आणि श्रीलंका हे संघ आमनेसामने आले होते. या सामन्यात नाणेफेकीचा कौल

एशियन गेम्स 2026 स्पर्धेच्या अंतिम फेरीत भारत पाकिस्तान, सेमीफायनलमध्ये टीम इंडियाने श्रीलंकेचा उडवला धुव्वा

एशियन गेम्स 2026 स्पर्धेच्या उपांत्य फेरीच्या लढती पार पडल्या. पहिल्या उपांत्य फेरीत पाकिस्तान आणि बांगलादेश, तर

Asian Games 2026 : मनू आणि प्रिन्सची चमकदार कामगिरी; सेलिंग स्पर्धेत भारताला रौप्यपदक

 Asian Games 2026 : आशियाई खेळ 2026 च्या 13 व्या दिवशी भारताच्या खात्यात दोन पदकांची भर पडली आहे. महिलांच्या सांघिक स्क्वॅशमध्ये