'हे काही क्रिकेट नाही...', 406 धावांचा यशस्वी पाठलाग करूनही टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर नाखूश

भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील दुसरा वनडे सामन्याची ऐतिहासिक नोंद झाली आहे. या सामन्यात वेस्ट इंडिजने 405 धावा केल्या आणि 406 धावांचं लक्ष्य टीम इंडियासमोर ठेवलं. खरं तर हे लक्ष्य खूपच कठीण होतं. पण टीम इंडियाने हे कठीण वाटणारं लक्ष्य फक्त 2 विकेट गमवून पूर्ण केलं. त्यामुळे या सामन्याची चर्चा होत आहे. या सामन्यात दोन्ही सघांनी मिळून 800हून अधिक धावा केल्या. तसेच चार फलंदाजांनी शतक आणि कर्णधार शुभमन गिलने द्विशतक ठोकलं. वनडे क्रिकेट इतिहासात दुसऱ्यांदा 400 पार धावा गाठण्याचा विक्रम प्रस्थापित झाला आहे. त्यामुळे टीम इंडियाच्या कामगिरीचं कौतुक होत आहे. मात्र टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर मात्र या विजयावर नाखूश आहे. त्याला कारणही तसंच आहे. गुवाहाटीतील खेळपट्टीवर गोलंदाजांना जराही मदत झाली नाही. सामन्यानंतर स्टार स्पोर्ट्सशी बोलताना गौतम गंभीर म्हणाला की, 'खरं सांगायचं तर बॅट आणि बॉलमध्ये सामना व्हायला पाहीजे. पण हे काही क्रिकेट नाही, ही फक्त फलंदाजी आहे.'

काय म्हणाला गौतम गंभीर?


टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर म्हणाला की, 'तुम्ही जरा विचार करा की, एक नवा गोलंदाज या विकेटवर गोलंदाजी करत आहे. समोरचा संघ 400 धावा करते आणि आम्ही त्या धावांचा यशस्वीरित्या पाठलाग करतो. हे एक मोठा विक्रम आहे. क्रिकेटप्रेमी आणि ब्रॉडकास्टरसाठी हे चांगलं आहे. पण माझ्यासारख्या खऱ्या क्रिकेटप्रेमीला हे काही रुचणारं नाही. एक प्रशिक्षक म्हणून मी गोलंदाजांप्रती सहानुभूती ठेवेले. या खेळपट्टीवर गोलंदाजी करणं काही योग्य नाही. गोलंदाजांना मदत होऊ शकेल असं काही करायला हवं.'



गौतम गंभीरने पुढे सांगितलं की, 'तु्म्ही प्रत्येक वेळी गोलंदाजांसाठी असं कठोर वागू शकत नाही. कारण कारण कधीकधी आकडेवारी खराब असली तरी ती त्यांच्या खराब गोलंदाजीचे प्रतिबिंब नसते. तो फक्त योग्य ठिकाणी गोलंदाजी करू शकतो. दोन नवीन चेंडू, ३० यार्डांच्या आत पाच क्षेत्ररक्षक आणि आजकाल होणारी जोरदार फलंदाजी पाहता, गोलंदाजांकडे फारसे पर्याय उरत नाहीत.'

आकिब नबीचं उदाहरण देत गौतम गंभीरने सांगितलं की, 'तो त्याचा पहिला सामना खेळत होता. त्याला पाठिंबा देणं गरजेचं आहे. कारण या सामन्यात गोलंदाजासाठी खूप काही नव्हतंच.' आकिब नबीने पदार्पणाच्या सामन्यात 8.5 षटकं टाकली आणि 84 धावा दिल्या. त्याला एकही विकेट घेता आली नाही. त्याने 9.50 च्या इकोनॉमी रेटने धावा दिल्या.
Comments
Add Comment

आशियाई क्रीडा स्पर्धेत हॉकीच्या उपांत्य फेरीत भारताने पाकिस्तानला ठेचलं, फायनलमध्ये दणक्यात एन्ट्री

गिफू : आशियाई क्रीडा स्पर्धा 2026 (Asian Games 2026) मध्ये भारतीय पुरुष हॉकी संघाने तुफानी कामगिरी करत अंतिम फेरीत (Final) धडक मारली

W, W, W..! एशियन गेम्स स्पर्धेत अभिषेक शर्माने घेतल्या सलग तीन विकेट, पण हॅटट्रीक नाही; कारण...

एशियन गेम्स स्पर्धेच्या उपांत्या फेरीत भारत आणि श्रीलंका हे संघ आमनेसामने आले होते. या सामन्यात नाणेफेकीचा कौल

एशियन गेम्स 2026 स्पर्धेच्या अंतिम फेरीत भारत पाकिस्तान, सेमीफायनलमध्ये टीम इंडियाने श्रीलंकेचा उडवला धुव्वा

एशियन गेम्स 2026 स्पर्धेच्या उपांत्य फेरीच्या लढती पार पडल्या. पहिल्या उपांत्य फेरीत पाकिस्तान आणि बांगलादेश, तर

Asian Games 2026 : मनू आणि प्रिन्सची चमकदार कामगिरी; सेलिंग स्पर्धेत भारताला रौप्यपदक

 Asian Games 2026 : आशियाई खेळ 2026 च्या 13 व्या दिवशी भारताच्या खात्यात दोन पदकांची भर पडली आहे. महिलांच्या सांघिक स्क्वॅशमध्ये

Asian Games 2026 : 10 सुवर्णपदकांनंतरही भारताची चिंता कायम; आशियाई क्रीडा स्पर्धेत 28 गोल्डचा टप्पा अजूनही दूर

 Asian Games 2026 : आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताच्या पदकांची कमाई सुरू आहे. 30 सप्टेंबर रोजी भारतीय खेळाडूंनी एकाच दिवसात 4

भारताचा ऐतिहासिक विजय, वेस्ट इंडिजविरुद्ध 406 धावांचं विजयी लक्ष्य गाठलं

भारताने दुसऱ्या वनडे सामन्यात ऐतिहासिक विजय मिळवला. वेस्ट इंडिजने विजयासाठी 406 धावांच आव्हान ठेवलं होतं. हे