जुलाब, त्वचारोग आणि उलट्या....रोकडे चाळकऱ्यांच्या समस्या कधी संपणार?

कल्याणमध्ये दुषित पाण्यामुळे नागरिकांना करावा लागतोय आजारांचा सामना


कल्याण : कल्याण पश्चिमेतील बेतूरकर पाडा येथील शिवाजी नगर, संतोषी माता मंदिर परिसरातील रोकडे चाळीत राहणारे नागरिक दुषित आणि दुर्गंधीयुक्त पाणी पित आहेत. या गढूळ पाण्यामुळे नागरिकांना उलट्या, जुलाब आणि त्वचारोगांना सामोरे जावे लागत आहे. येथे टाकण्यात आलेली पाण्याची लाईन तब्बल ४० वर्षे जुनी असून एकदाही देखभाल न झाल्याने नागरिकांना या समस्यांना सामोरे जावे लागत आहे. याबाबत कार्यकारी अभियंता प्रमोद मोरे तसेच उपअभियंता सोनवणे यांना वारंवार तक्रार करूनही यात काहीच कारवाई होत नसल्याने नागरिक संतप्त झाले आहेत.


शिवाजी नगर परिसरातील ही पाईपलाईन ड्रेनेज लाईन मधून गेली आहे. पाईपलाईन जुनी झाल्याने हि पाईपलाईन जीर्ण झाली असून यामध्ये ड्रेनेजचे पाणी झिरपते. हेच गढूळ पाणी नळाद्वारे नागरिकांच्या घरात येत असल्याने नागरिकांना हे गढूळ पाणी पिण्यावाचून पर्याय नाही.


पाहा नागरिक या पाण्यामुळे निर्माण होणाऱ्या समस्यांबद्दल काय सांगत आहेत....


या समस्येबाबत कल्याण डोंबिवली महानगरपालिकेला वारंवार तक्रार करून देखील पालिका अधिकारी लक्ष देत नसल्याने नागरिकांनी याबाबत शिवसेना उपशहर प्रमुख नगरसेवक मोहन उगले यांच्याकडे समस्या मांडल्यावर पालिका प्रशासनाकडे पाठपुरावा करून हि समस्या निकाली काढण्याचे आश्वासन त्यांनी नागरिकांना दिले आहे.


याबाबत कार्यकारी अभियंता प्रमोद मोरे यांना विचारले असता, पाईपलाईनला अनेक ठिकाणी अनधिकृतरित्या टॅपिंग केल्याने ड्रेनेज मधील पाणी याठिकाणी झिरपत असून नागरिकांची हि समस्या तात्काळ निकाली काढण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

Comments
Add Comment

Nashik : ‘Gen Z’ नव्हे, ‘Green Generation’ बना , गिरीश महाजन यांचे आवाहन ; मिशन ग्रीन मॉन्सून द्वारे साधला विद्यार्थ्यांशी संवाद

Nashik : आजचा काळ ‘Gen Z’ युवकांचा आहे. त्यांच्या हातात मोबाईल, इंटरनेट आणि इन्स्टाग्रामसारखी आधुनिक साधने आहेत; मात्र

बाप्पाच्या दर्शनासाठी Pune Metro सज्ज, गणेशोत्सवात मेट्रोच्या फेऱ्या वाढणार; वाचा एका क्लिकवर वेळापत्रक

पुणे: गणेशोत्सवाच्या काळामध्ये, पुणेकरांना महामेट्रोकडून दिलासा मिळाला आहे. मुंबई- पुण्यामध्ये गणेशोत्सवासाठी

मुंबईत लाडक्या गणरायाची तयारी अंतिम टप्प्यात, विधान परिषदेचे उपसभापती सचिन अहिर यांनी घेतला तयारीचा आढावा

मुंबई: लाडक्या बाप्पाच्या आगमनाला अवघे काही दिवसच शिल्लक असताना आता महाराष्ट्रामध्ये गणेशोत्सवाची लगबग अंतिम

Pune MPSC Student Suicide: पुण्यात स्पर्धा परिक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्याची आत्महत्या, सुसाईड नोटमधलं कारण वाचून सर्वच हादरले...

पुणे: विद्येचे माहेरघर असलेल्या पुण्यामध्ये स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या एका तरुणाने जीवन संपवल्याची

गणेशोत्सवात होणार भक्तांची मोफत आरोग्य तपासणी? कुठे मिळणार फायदा

मुंबई: गणेशोत्सवाच्या काळामध्ये महाराष्ट्र सरकारकडून भक्तांच्या आरोग्याची काळजी घेत 'मुख्यमंत्री सहाय्यता

Ganeshotsav 2026: Mira Bhayandar गणेशमूर्ती विसर्जनासाठी सज्ज, २४ ठिकाणी तलावांचा समावेश; वाचा यादी

मीरा भाईंदर: मीरा भाईंदर महानगर पालिकेकडून गणेशोत्सवाच्या आधीपासूनच गणेशमूर्ती विसर्जनाच्या उपाययोजना