बस झाले दौरे, नुकसान भरपाई द्या!


  • संतोष जाधव


सटाणा : मागिल आठवड्यात बागलाण तालुक्याला सर्वत्र गारपिटीने व अवकाळी पावसाने झोडपल्याने बळीराजाचे अतोनात नुकसान झाले आहे. आधीच सुलतानी संकटात सापडलेला बळीराजा या गारपिटीने अस्मानी संकटात सापडला आहे. या नुकसानीची पहाणी करण्यासाठी व बळीराजाला दिलासा देण्यासाठी बळीराजाच्या थेट बांधावर राज्याचे मुख्यमंत्री, खासदार, आमदार, माजी आमदार यांनी पायधूळ झाडली. आश्वासनांची खैरात केली. बळीराजाला थेट नुकसान भरपाई मात्र अद्याप मिळाली नाही. आर्थिक मदत कधी देणार अशी याची वाट दुःखाच्या खाईत सापडलेला बळीराजा आजही बघतो आहे.


मागिल काही दिवसांपासून बागलाण तालुक्यातील सर्वच भागात जोरदार गारपिट व अवकाळी पाऊस पडल्याने मोठ्या प्रमाणात कांदा, टोमॅटो, द्राक्ष, डाळिंब, पपई, आंबे, यांचे नुकसान झाले होते. मागील आठवड्यात तालुक्यात सर्वदूर कांदा काढण्याचे काम सुरू होते. नेमका तोच हाती आलेला कांदा डोळ्यादेखत वाहून गेल्याने शेतकरी राजा हतबल झाला आहे.


कोसळणारे कांद्याचे भाव, कवडीमोल दराने विकले जाणारे द्राक्ष, हाती येत असलेले डाळींब व आंबे हे या गारपिटीचे व अवकाळी पावसाचे बळी ठरले. यामुळे बळीराजाचे कंबरडे मोडले होते. केवळ नुकसान झालेल्या पिकाकडे हताश होऊन बघण्याशिवाय बळीराजाकडे पर्याय नवताच.


या अवकाळी गारपिटीची दखल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अयोध्येत घेतली आणि ते थेट तालुक्यातील निताणे, आखतवाडे, बिजोटे येथील शेतकऱ्यांच्या बांधावर नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे व अधिकारी वर्गाचा लवाजमा सोबत घेऊन तीन दिवसात पंचनामे करून तसा तातडीने अहवाल पाठवावा असे आदेश देवून मुंबईच्या दिशेने रवाना झाले.


मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री दादा भुसे, भाजपाचे राज्य अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, खासदार सुभाष भामरे, आमदार दिलीप बोरसे, माजी आमदार संजय चव्हाण यांनी तालुक्यातील नुकसानग्रस्त भागात थेट बांधावर जावून या नुकसानीचा फक्त आढावा घेतला व लवकरात लवकर नुकसान भरपाई मिळवून देवू असे आश्वासन शेतकऱ्यांना देत फोटो सेशन करून गेले.


अगदी मुख्यमंत्री ते माजी आमदार यांनी दिलेले आश्वासन कधी पुर्ण होणार? नुकसानभरपाई थेट आर्थिक संकटात सापडलेल्या बळीराजाला कधी मिळणार? याकडे तालुक्यातील बळीराजाचे लक्ष लागले आहे. बस झाले पहाणी दौरे, आता आर्थिक मदत करा, असा टाहो बळीराजा फोडतो आहे.

Comments
Add Comment

Maharashtra weather : पावसाची उघडीप कायम! १६ सप्टेंबरला असं राहिल हवामान; शेतकरी संकटात

Maharashtra weather : महाराष्ट्रात सप्टेंबरच्या मध्यातही पावसाची उघडीप कायम असल्याचे चित्र आहे. मागील काही दिवस बंगालच्या

Maharashtra Mahakhanij 2.0: खनिज चोरी रोखण्यासाठी महाराष्ट्रात 'डिजिटल' क्रांती; 'महाखनिज २.०' वेबसाईटचे लोकार्पण

मुंबई: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते खनिजांची चोरी आणि गळती रोखण्यासाठी डिजिटल प्रणालीचे लोकार्पण

Amruta Fadnavis : गणरायाच्या दर्शनासाठी अमृता फडणवीस महापौर निवासस्थानी; तावडे कुटुंबीयांकडून स्वागत

मुंबई : गणेशोत्सवाच्या मंगलमय वातावरणात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी १५

Food- Drug Administration Action: अन्न- औषध प्रशासनाची राज्यभर धडक कारवाई, मुंबई- पुण्यातील अनेक अस्थापनांची परवाने निलंबित

मुंबई: ऐन गणेशोत्सवाच्या काळामध्ये अन्न- औषध प्रशासनाने मुंबई आणि पुण्यामध्ये हॉटेल आणि रेस्टॉरंटवर धडक कारवाई

Navi Mumbai International Airport : नवी मुंबई विमानतळावर नवा विक्रम, ९० टन आयात माल घेऊन Boeing 777F दाखल

नवी मुंबई : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाने (NMIA) आंतरराष्ट्रीय कार्गो सेवेत महत्त्वाचा टप्पा गाठला आहे. १५

Hirakani Kaksha Maharashtra : स्तनदा मातांसाठी एसटीचा मोठा निर्णय! राज्यभरातील एसटी बसस्थानकांवर उभारणार १२५ ‘हिरकणी कक्ष’

मुंबई : महाराष्ट्रातील महिला प्रवाशांसाठी विशेषतः स्तनदा मातांसाठी सुरक्षित, स्वच्छ आणि खासगी सुविधा उपलब्ध