मुंबई : कृषी उत्पन्न बाजार समित्या आता केवळ शेतमालाच्या खरेदी-विक्रीचे केंद्र न राहता रोजगारनिर्मिती, व्यापारवृद्धी आणि स्थानिक अर्थव्यवस्थेला ...
मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणावर गणेशोत्सव साजरा केला जातो. सणानिमित्त मिठाई, खवा, पनीर, तूप, खाद्यतेल, फरसाण, रवा, बेसन, मैदा, सुकामेवा यांसह आदी खाद्यपदार्थांमध्ये भेसळ होण्याची शक्यता असते. हीच शक्यता लक्षात घेत अन्न- औषध प्रशासनाने राज्यामध्ये धडक कारवाईचा सपाटा लावला आहे. अन्नपदार्थाच्या उत्पादकांपासून ते किरकोळ विक्रेता दुकानांची सुद्धा एफडीएकडून तपासणी केली जात आहे. ज्या आस्थापनांमध्ये तरतुदींचे उल्लंघन होत असल्याचे आढळून येईल, त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा अन्न व औपध प्रशासनाकडून देण्यात आला आहे. मुंबईमध्ये तब्बल ३८ अन्न अस्थापनांच्या तपासण्या करत ४७ खाण्याच्या गोष्टींचे सॅम्पल गोळा केले.
- श्री सिद्धिविनायक आणि लालबागच्या राजाचे घेणार दर्शन मुंबई : भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन बुधवारी मुंबई दौऱ्यावर येणार असून, ते सिद्धिविनायक ...
निकृष्ट दर्जाचा संशय असलेल्या ठिकाणीच एफडीएने कडून कारवाई करण्यात आली आहे. हजारो किलोंचा मुद्देमाल जप्त करत फुड सॅम्पल विविध ठिकाणी तपासणीसाठी पाठवण्यात आले आहे. अनेक अस्थापनांमध्ये, सैल स्वरूपामध्ये अन्नाची विक्री, अयोग्य साठवणूक, अपूरे लेबलिंग आढळल्यामुळे, निकृष्ठ दर्जाचे अन्नपदार्थ यांसह अनेक वेगवेगळ्या कारणामुळे एफडीएने कारवाई केलेली आहे. दुग्धजन्य पदार्थांशिवाय, एफडीएकडून गुटखा, पान मसाला, सुंगधित तंबाखू, सुंगधित सुपारीसह अन्य वेगवेगळ्या पदार्थांवरही कारवाई करण्यात आली. या धडक कारवाईतही करोडो रूपयांचा माल हस्तगत करण्यात आला आहे. गणेशोत्सवानंतर पुढेही अनेक सणांची रेलचेल असणार आहे. त्यामुळे सणांच्या पार्श्वभूमीवर ही कारवाई करण्यात येत असल्याची माहिती एफडीएकडून देण्यात आली आहे.