उष्माघाताच्या बळींनंतरही सरकारला शहाणपण येईना, मंत्रालयाबाहेर गर्दी

मुंबई: काही दिवसांपूर्वी झालेल्या महाराष्ट्र भूषण पुरस्कार कार्यक्रमात उष्माघाताने बळी गेल्यानंतरही सरकारने यातून काही बोध घेतल्याचे चित्र दिसत नाही. आज कडाक्याच्या उन्हाळ्यात भर दुपारी राज्याच्या कानाकोपऱ्यातून मंत्रालयात कामानिमित्त आलेले नागरिक मंत्रालयाबाहेर पास घेण्यासाठी तासनतास ताटकळत उभे असल्याचे चित्र होते. कारण काय तर तांत्रिक अडचणींमुळे पास नाही.


मंत्रालयात विविध कामानिमित्त येणाऱ्या नागरिकांना आत प्रवेशासाठी पास काढावे लागतात. आज या पाससाठी मंत्रालयाबाहेर भर उन्हात लांबच लांब रांगा लागल्या होत्या. पास मिळत नसल्याने नागरिक प्रशासनाच्या कारभाराविरोधात तीव्र संताप व्यक्त करत होते. पास का मिळत नाहीत याचे कारण जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता असे समजले की येथील इंटरनेट बंद पडले आहे. त्यामुळे पास मिळत नव्हते. राज्यातील पुणे, नाशिक, नगर, कोल्हापूर, सोलापूर यांसह अन्य शहरांतून हे नागरिक कामानिमित्त येथे आले होते.

Comments
Add Comment

Ganeshotsav 2026 : गणेश मंडळांसाठी FDAचे नवे नियम; प्रसादासाठीही बिल अन् FSSAI नोंदणी बंधनकारक

मुंबई : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शहरातील सार्वजनिक गणेश मंडळांसाठी अन्न सुरक्षेशी संबंधित नियम अधिक कडक

Ratnakar Mahajan : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रत्नाकर महाजन यांचे निधन; 80 व्या वर्षी पुण्यात घेतला अखेरचा श्वास

पुणे : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी प्रवक्ते रत्नाकर महाजन यांचे शनिवारी सकाळी निधन झाले. पुण्यातील राहत्या

Mumbai Fire : मुंबईत मोनोरेल स्टेशनजवळ इमारतीला भीषण आग; जीटीबी नगर परिसरात घबराट

मुंबई : सायन-कोळीवाडा परिसरातील गुरु तेघ बहादूर (जीटीबी) नगर मोनोरेल स्टेशनजवळ शनिवारी पहाटे एका इमारतीला अचानक

Mumbai Crime : 4 जणांनी विमानातून आणले कोट्यवधींचे सोने, पण एक चूक अन्... मुंबई विमानतळावर कस्टमची सर्वात मोठी कारवाई!

मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरून विदेशी सोन्याची तस्करी करणाऱ्या एका टोळीचा महसूल

BMC : मुंबई महानगरपालिकेचा ‘प्रसाद ते ऊर्जा’ अभिनव उपक्रम

लालबागच्या राजाच्या प्रसादातील ओल्या कचऱ्यापासून महानगरपालिका रुग्णालयांना वीज मुंबई (विशेष प्रतिनिधी) :

KEM Hospital Mumbai : केईएम रुग्णालय आगीपासून अधिक सुरक्षित

फायरप्रुफ बनवण्यासाठी तब्बल साडेदहा कोटींचा केला जाणार खर्च मुंबई (विशेष प्रतिनिधी): मागील कालावधीत अहमदनगर