Ganeshotsav 2026 : गणेश मंडळांसाठी FDAचे नवे नियम; प्रसादासाठीही बिल अन् FSSAI नोंदणी बंधनकारक

मुंबई : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शहरातील सार्वजनिक गणेश मंडळांसाठी अन्न सुरक्षेशी संबंधित नियम अधिक कडक करण्यात आले आहेत. मुंबईतील सुमारे 12,000 सार्वजनिक गणेश मंडळांना अन्न व औषध प्रशासनाकडे (FDA) नोंदणी करावी लागणार आहे. तसेच प्रसाद किंवा सामुदायिक जेवणासाठी वापरण्यात येणाऱ्या अन्नपदार्थांची खरेदी करताना बिल आणि संबंधित विक्रेत्याची FSSAI नोंदणीची माहिती जतन करावी लागणार आहे.


यासंदर्भात FDAच्या अधिकाऱ्यांनी गणेश मंडळांच्या प्रतिनिधींसोबत बैठक घेतली. या बैठकीत प्रसाद आणि सामुदायिक भोजन तयार करताना कोणत्या नियमांचे पालन करावे लागेल, याबाबत मंडळांना माहिती देण्यात आली. लहान-मोठ्या सर्व मंडळांना हे नियम लागू असतील, असं स्पष्ट करण्यात आलं आहे.



नियमांनुसार, प्रसादासाठी वापरले जाणारे दूध, धान्य, भाजीपाला किंवा इतर अन्नपदार्थ FSSAI नोंदणीकृत विक्रेत्यांकडूनच खरेदी करावे लागतील. या खरेदीची बिलं मंडळांना जपून ठेवावी लागणार आहेत. त्यामुळे मंडळांनी अन्नपदार्थ खरेदी करताना विक्रेत्याची नोंदणी आणि आवश्यक कागदपत्रे तपासणं गरजेचं आहे.


या नियमांमुळे विशेषतः लहान गणेश मंडळांसमोर अडचणी निर्माण होण्याची शक्यता आहे. अनेक लहान मंडळे व्यावसायिक केटरर्सऐवजी स्थानिक स्वयंसेवकांच्या मदतीने प्रसाद किंवा जेवण तयार करतात. त्यामुळे नवीन नियमांची अंमलबजावणी करण्यासाठी आणखी वेळ द्यावा, अशी मागणी काही मंडळांच्या प्रतिनिधींनी केली होती. मात्र, यावर्षीपासूनच नियमांचे पालन करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.


प्रसाद किंवा अन्नपदार्थ कोणी दान केले तरी त्याची नोंद ठेवावी लागणार आहे. उदाहरणार्थ, एखाद्या व्यक्तीने किंवा संस्थेने 50 किलो लाडू दान केले असल्यास ते कोणी दिले आणि ते कुठे तयार करण्यात आले, याची माहिती मंडळाकडे असणं आवश्यक असेल. भाजीपाला किंवा इतर वस्तूंची खरेदी केल्यास त्याचे बिलही जतन करावे लागणार आहे.


महिला बचत गटांकडून तयार करण्यात येणाऱ्या अन्नपदार्थांबाबतही नियम स्पष्ट करण्यात आले आहेत. अशा गटाकडून अन्न खरेदी करणाऱ्या मंडळांना गटाच्या परवान्याची प्रत, खरेदीची पावती आणि अन्नपदार्थ संबंधित गटानेच तयार केल्याचं घोषणापत्र ठेवावं लागणार आहे.


अन्न हाताळणाऱ्या स्वयंसेवकांसाठीही स्वच्छतेच्या नियमांचे पालन बंधनकारक करण्यात आलं आहे. पारंपरिक पद्धतीने अन्न वाढणाऱ्या स्वयंसेवकांना काही पोशाखांबाबत सवलत देण्यात आली असली तरी टोपी, हातमोजे आणि मास्क यांसारख्या स्वच्छतेच्या उपाययोजना आवश्यक असतील. तसेच अन्न हाताळणाऱ्या व्यक्तीकडे वैध वैद्यकीय प्रमाणपत्र असणंही गरजेचं आहे.


Comments
Add Comment

ससून डॉकचा कायापालट करून देशातील आदर्श गोदी बनवणार - मंत्री नितेश राणे; कोळंबी सोलणाऱ्या मच्छीमार महिलांना सुरक्षा किटचे वाटप

मुंबई : ससून डॉकचा सर्वांगीण कायापालट करून देशातील आदर्श गोदी बनवण्याचा राज्य सरकारचा प्रयत्न आहे.

जिओच्या दमदार लिस्टिंगनंतर अंबानी कुटुंब सिद्धिविनायकाच्या चरणी; मुकेश अंबानींनी घेतले बाप्पाचे दर्शन

मुंबई: जिओ प्लॅटफॉर्म्सने शेअर बाजारात धमाकेदार एंट्री केली असून, गुंतवणूकदारांना मालामाल केले आहे. जिओचा शेअर

महापालिका कर्मचाऱ्यांना ३३ हजार रुपये दिवाळी भेट; महापौरांच्या अध्यक्षतेखाली बैठकीत एकूण २ हजार रुपयांची वाढ झाली मंजूर

मुंबई: मुंबई महापालिकेच्या वतीने प्रशासनाच्या वतीने परस्पर निर्णय देत ३२ हजार रुपये सानुग्रह अनुदान देण्याचा

मुंबईकरांनो, पुढचे सात दिवस पाणी उकळून, गाळून प्या !

मुंबई (विशेष प्रतिनिधी) मुंबई महानगरपालिकेला पाणीपुरवठा करणाऱ्या पिसे - पांजरापूर मधील येवई येथील महासंतुलक

Mahaparinirvan Din 2026: महापरिनिर्वाण दिनानिमित्त प्रशासन सज्ज! विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांचे महत्त्वाचे निर्देश

मुंबई: भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 70 व्या महापरिनिर्वाण डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 70 व्या

Mumbai Police : मुंबई पोलिसांची सुरक्षा अधिक मजबूत! लादेनचा शोध घेण्यास मदत करणारी श्वानप्रजात ताफ्यात होणार दाखल

Mumbai News: मुंबई पोलिसांच्या श्वान पथकात बेल्जियन मॅलिनॉइस जातीच्या कुत्र्यांची संख्या वाढवण्याची तयारी सुरू आहे.